आपल्या देवाविषयीच्या संकल्पना विस्तारणारे गाणे,
दोनच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे . व्हाट्सएपच्या एका ग्रुपवर मराठीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या देऊळबंद २ या चित्रपटावर चर्चा सुरु होती.चर्च करता करता गाडी याच चित्रपटाच्या नावाशी सारखेपणा असलेल्या देऊळ या चित्रापाशी येऊन थांबली .चर्चा भुरकट आहे हे लक्षात अळ्यांचे ऍडमिनने चर्चा लगेच थांबवली .मात्र त्यावेळी माझ्या मनात सुरु असलेले विचार चक्र अजून सुरूच आहे .तसे बघायला गेले तर हा विषय आपणास काही नवीन नाही हिंदीतील गोष्टच सोडा आपल्या मराठीत देखील हा विषय कल्पकतेने मांडण्यात आला आहे . आपल्या मराठीच्या उत्तमोत्तम गाण्याच्या खजिन्यातील एक असलेले 'देव देव्हाऱ्यात नाही देव नाहोती देवालयी' हे झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातील गाणे हे याचे एक उत्कृष्ट उदाहरणच म्हणता येईल
‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी’ हे मराठी गाणे आपल्यास काय सांगते ? याचा एका ओळीचा सारांश सांगायचं झाल्यास, देव ही केवळ मूर्ती, मंदिर किंवा देव्हाऱ्यात मर्यादित असलेली संकल्पना नाही. उलट, देव हा प्रत्येक सजीवात, प्रत्येक चांगल्या कृतीत आणि माणसाच्या अंतःकरणात वास करतो.
आपण अनेकदा देवाला शोधण्यासाठी मंदिरात जातो, पूजा-अर्चा करतो, पण खऱ्या अर्थाने देवत्व आपल्याच वर्तनात, विचारात आणि आचरणात असते. जर माणूस प्रामाणिक, दयाळू, आणि सत्यनिष्ठ असेल, तर तो स्वतःच देवाच्या जवळ असतो. देव हा बाहेर नसून आपल्या अंतर्मनात आहे, समाजात जे लोक दुःखी, गरजू किंवा अन्यायग्रस्त आहेत, त्यांना मदत करणे म्हणजेच देवाची सेवा होय. केवळ विधी, परंपरा किंवा बाह्य आडंबर यांना महत्त्व न देता, माणुसकी जपणे हेच खरे धर्म आहे, असा मेसेज या गाण्यातून गदिमांनी मोठ्या खुबीने दिला आहे सुधारीत फडके यांनी या गाण्याला आपला आवाज आणि संगीत देऊन ही गोष्ट आपल्याला चटकन समजलीच पाहिजे या लेव्हलवर नेऊन ठेवली आहे
एकूणच, हे गाणे आपल्याला स्वतः विषयी विचार करायला भाग पाडते. . देव शोधण्यासाठी बाहेर भटकण्यापेक्षा, आपल्या वागण्यात, कृतीत आणि विचारात सकारात्मक बदल घडायला हवा . मानवतेतच देव आहे, आणि प्रत्येक माणसात देवत्व आहे, ही शिकवण आपणास हे गाणे देते. मराठी भाषेत किती गोडवा आहे हे या गाण्यातून
आपल्यास समजतेया गाण्यासारखी मोठा संदेश देणारी गाणी तुम्हाला माहिती असेल तर मला सांगाल का ? मी त्याचा वेळात वेळ काढून अभ्यास करेल आणि त्याविषयी तोडक मोडक का होईना सांगण्याचा प्रयत्न करेल मी तुमच्या प्रतिसादाची वाट बघतोय बाय



टिप्पण्या