प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ......

 माझ्या ओळखीचे एक आजोबा आहेत .ते आम्हा तरुणांच्या मोबाईलप्रेमावर सातत्याने  बोलत असतात ते म्हणतात, 'अरे तुमच्या हातात जेवहा बघावा तेव्हा मोबाईल मोबाईल आणि फक्त मोबाईल अरे जरा वाचत जा'' वाचनाचे महत्व सांगताना या आजोंबाच्या हक्काचे पेटंट म्हणता येईल वाक्य असतेच असते किंबहुना जर त्यांनी वाचनाचे महत्व सांगताना त्यांनी ते वाक्य बोलले नाही तर त्यांना आठवण करून द्यावी का ? की तुम्ही तुमचे नेहमीचे वाक्य बोलला नाहीत विसरले की काय ? तर आजोबांचे ते हुकुमी वाक्य मुळातील समर्थ रामदास स्वामींचे आहे.  ते म्हणजे ................  प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ...... ते नेहमी सांगतात अरे  मी नाही पण समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे म्हणून तरी वाचा 

मात्र हे आजोबा हे सांगताना एक गोष्ट विसरतात किंबहुना त्यांच्या मुद्दा जोरकसपाने पुढे यावा म्हणून त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करतात असे म्हणा हवेतर तो म्हणजे मुळात समर्थ रामदास स्वामींना हा उपदेश करण्याची गरज का वाटावी ? माझ्यामते  लोकांची मुळातच वाचनाची प्रवृत्ती नसावी.आज मोबाइलमुले वाचन कमी झालंय असे

म्हणतात त्यावेळी दुसरे काही करणे असतील . त्याहीवेळी वाचणारी जनता कमीच असल्याने समर्थाना प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ......हा उपदेश करावा लागला असेल.

समर्थ रामदास स्वामींच्या  काळातही लोकांना वाचनाची सवय लावावी लागत होती. म्हणजेच वाचनाचा अभाव हा नव्या युगाचा दोष नसून, मानवी स्वभावाशी निगडित एक सातत्यपूर्ण प्रवृत्ती आहे, असे आपण म्हणू शकतो ना ?  लोकांच्या वाचनाचा मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर आपण असे म्हणू शकतो की, मानवाला सहजसोपे, त्वरित आनंद देणारे आणि कमी कष्टात मिळणारे पर्याय अधिक आकर्षित करतात. वाचन मात्र एकाग्रता, संयम आणि सातत्याची मागणी करते. त्यामुळे अनेकजण वाचनाकडे दुर्लक्ष करतात. पूर्वीच्या काळातही लोकांच्या आयुष्यात शेती, व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या यांना प्राधान्य होते; त्यामुळे अभ्यासपूर्ण वाचनासाठी वेळ आणि प्रेरणा कमी पडत असे. म्हणूनच समर्थ रामदास स्वामीं सारख्या संतांनी  आणि विचारवंतांनी वाचनाचे महत्त्व समजला पटवण्याचा प्रयत्न केला. 

 पूर्वीच्या काळातील कीर्तन, प्रवचन किंवा भागवत सप्ताह. या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असे. लोक कथा आणि अभंग मन लावून ऐकत; परंतु त्या मागील ग्रंथजसे की दासबोध, भागवत, रामायण स्वतः हुन  वाचणाऱ्यांची संख्या तुलनेने कमीच  असे .  “ऐकणे” लोकांना अधिक सोपे वाटत होते वाचन विचारांना परिपक्व करते,

निर्णयक्षमता वाढवते आणि व्यक्तिमत्त्व घडवते.हा मुद्दा लोकांनी समजून घ्यायला हवा  पुर्वी कीर्तन, यामुळे लोक वाचन करायला नाखूष असत आज कीर्तन प्रवचन यांची जागा मोबाईलने घेतली आहे इतकाच तो काय फरक  माणसाची मूलभूत प्रवृत्ती मुळातून बदलली नाहीये पूर्वी सुद्धा वाचनबाबत अनास्था होती आज देखील आहेमात्र त्यामुळे पूर्वी होती त्या प्रमाणे आजदेखील . सखोल, चिंतनशील वाचनाची गरज आजही महत्त्वाची ठरतेय 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास