अँड बुरखा रन नाशिकच्या हुन्नहरी तरुणाची निर्मिती

                        सध्याचे जग ते तंत्रज्ञानाचे जग आहे . या तंत्रज्ञाच्या जगात कालचे ज्ञान आज जुने झालेले असते . मग ते मनोरंजनबाबाबत का असेना . सुरवातीला मोठं मोठ्या चित्रपटगृहात मोठं मोठ्या स्क्रीनन लावून चित्रपट दाखवले जात , नंतर उदय झाला घराघरातील स्क्रीनचा अर्थात टेलिव्हिजनच्या युगाचा . आता टेलिव्हिजनवरील मालिका हा प्रकार मागे पडला असून आताचा जमाना आहे वेब सिरींजचा ,
                       कायम सर्व क्षेत्रात अर्गभागी असणारे नाशिकचे हुन्नहरी तरुण या क्षेत्रात तरी मागे कसे  राहतील ?  मागील गेल्या कैक वर्षांपासून व्हिडीओ एडिटिंग करणारे आणि नाशिकच्या हौशी रंगभूमीतील  अढळ ध्रुव ताऱ्याचे  स्थान प्राप्त असणाऱ्या जितेंद्र सोनार आणि त्यांच्या सौंदर्य निर्मिती चमूने याही क्षेत्रात  आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे  नुकतीच त्यांनी "अँड दी बुरखा रन ." हि वेबमालिका तयार केली  आहे . अदिल शेख यांचे उत्तम दिग्दर्शन या चित्रपटाला आहे ..
यात दाखवली आहे आहे एक घुसमट . एका खलनायकामुळे होणारी प्रेमी जीवनाची होणारी ससेहोलपट . भिन्न धर्मीय प्रेमी युगल आणि त्यांना विरोध करणारा खलनायक .
                  फक्त बुरखा नाही तर मनाची घुसमट काय असते.. सांगणारा चित्रपट.. फक्त हिंदू मुस्लिम नाही, बुरख्या मधल्या सुंदर डोळ्यांवर असलेलं निरागस प्रेम.. क्रूर आणि घाणेरडा खलनायक जो प्रत्येकामध्ये काही अंशी असतो त्या विरुद्ध लढा... फक्त मैत्री नाही.. सत्य आणि प्रेम या साठी लढणारे मित्र.. बहीण भावाच प्रेम...  बापाचं मुलांवर असलेलं प्रेम.. अनाथ मुलावर केलेली दया.. या सर्व भावना आणि त्यातील पैलू अगदी अलगद पणे स्पर्ष केलेला सिनेमा... अँड दी बुरखा रन.. यात काय नाही यात आहे टोळी युद्ध प्रेमाचा मिलाफ एका चित्रपटला हवी अशी साजेशी गाणी सुमधुर संगित..सस्पेंस आणि बरेच काही
गेले सुमारे वर्षभर जितेंद्र आणि त्याचा सौंदर्य निर्मिती संपूर्ण टीमने   वर्षभर अथक प्रयत्न करून बनवलेली ही  आठ भागातील कलाकृती .  नक्की बघा इतरांना पण सांगा लेखाच्या शेवटी याची युट्युब लिंक दिली आहे  याची युट्युब लिंक दिली आहे
भाग पहिला
 https://youtu.be/2sGgCHDMn1k
भाग दुसरा
https://youtu.be/3n_LkfB1Hi4
भाग तिसरा
https://youtu.be/PiOH76t63Ss
भाग चौथा
https://youtu.be/spLjpIo9ppI
भाग पाचवा
https://youtu.be/VfBIx1MrqDs
भाग सहावा
https://youtu.be/lh4T7B9-i9U
भाग सातवा
https://youtu.be/7BuZpNgZesk
भाग आठवा  https://www.youtube.com/watch?v=oY4RVe9waik


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?