सिंहावलोकन :२०२४ नैसर्गिक आपत्ती
लवकरच नविन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष २०२५सुरु होईल. त्यावेळी सरत्या २०२४मध्ये आपणास काय अडचणी आल्या, काय आनंदाचे क्षण आपण अनुभवले याचा धांडोळा घेतल्यास आपण नविन वर्षाचे स्वागत अधिक उत्तमपणे करु शकु ना ?हीच बाब हेरत मी सरत्या वर्षातील घटनांचा,प्रसंगाचा क्षेत्रनिहाय विषयनिहाय आढावा घेत आहे.या लेखात आपण सरते वर्ष २०२४मध्ये कोणत्या नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागले.याचा आढावा घेवूया.नैसर्गिक आपापतीचा मानवावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात पुर्नवसन करावे लागत असल्याने प्रशाकीय यंत्रणेवर देखील मोठा ताण येतो त्यामुळे त्या महत्वाच्या ठरतात
आपण नैसर्गिक आपत्तीचे भूगर्भात घडणाऱ्या घडामोडीमुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि हवामानाच्या बदलामुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती असे वर्गीकरण करून शकतो . भूगर्भात होणाऱ्या आपत्तीमध्ये भूकंप, ज्वालामुखी यांचा समावेश करता येईल तर हवामान बदलामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीत आपण अवर्षण दुष्काळ, पूर बेमोसमी पाऊस , या सारख्या घडामोडींचा समावेश करू शकतो .भारताला सरत्या २०२४ वर्षात दोन्ही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला
सरते वर्ष २०२४ मध्ये भारतात लहान रिक्टर स्केलच्या आणिक भूकंपाची नोंद झाली भूकंपाची तीव्रता कमी असल्याने यामध्ये प्राणहानी झाली नाही मात्र संख्येचा विचार करता भारतात या वर्षी अनेक भूकंप आले भारतात अंदमान निकोबार बेट समूहात एकमेक ज्वालामुलखीं असल्याने भारतात यावर्षी ज्वालामुखीच्या घटना घडलेल्या नाहीत मात्र जगभरचा विचार करता आयसलँड येथील ज्वालामुखीची घटना घडली त्यामुळे युरोपातील विमान आणि जहाज वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली
मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी हवामान बदलाच्या संकटाला भारताला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागले यावेळी बेमोसमी पावसाच्या (अवकाळी पाऊस ) अनेक घटना घडल्या. तसेच यावर्षी महाराष्ट्रात पावसाचे उशिरा आगमन झाले दक्षिण भारतात यावेळी पावसाने मोठे नुकसान केले यावेळी पासचा मुक्काम लांबला त्यामुळे थंडीचेही आगमन बराच लांबले यावेळी जवळपास डिसेंबरच्या सुमारास थंडीचे महाराष्ट्रात आगमन झालेमार्च महिन्यात पडलेल्या पावसाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
एकंदरीत भारताला मोठ्या नुकसान करणाऱ्या नैसर्गिक आपत्ती जर अनुभवायला मिळाल्या नसल्या तरी एकूण संख्येचा विचार करता मोठ्या संख्येने नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला


टिप्पण्या