मानवी आयुष्यातील नात्यांचे महत्त्व उलगडणारा चित्रपट '“अमृत

 


आज २०२६ साली सुद्धा गावाच्या साधारणतः मध्यभागी असलेल्या महादेवाच्या मंदिराला केंद्र मानून एक दीड  किलोमीटरचे वर्तुळ काढले तर संपूर्ण गाव येऊ शकेल अश्या धार्मिक महत्त्व असलेल्या त्रंबकेश्वर या शहरातील एका ब्राह्मण कुटूंबियातील धोंडोपंत फाळके (दादासाहेब फाळके ) यांनी ११३ वर्षांपूर्वी भारतात आणलेले चित्रपट हे तंत्र मोठे विलक्षण आहे. मानवी आयुष्यतील रंजकता, दाहकता यांचे प्रभावीपणे सादर करणे. समाजाला उपयोगी पडेल असा संदेश समोरच्याला आपणास उपदेश केला आहे याची थेट जाणीव न होता समजेल अश्या पद्धतीने देण्यासह व्यक्तीचे मनोरंजन करण्यात चित्रपटाचा हात कोणी धरू शकणार नाही, असे मला वाटतंय.   संगीत नाटक, एकपात्री नाटक,  दोन अंकी नाटक, फिरता रंगमंच असलेले नाटक तमासातील वगनाट्य आणि यासारखे कोणतेही प्रकार घेतले तरी त्यास चित्रपटाची सर येणे निव्वळ  अशक्यच .  आपल्या भारताला अनेक उत्तोमत्तम आशयघन चित्रपटाची मोठी परंपरा आहे . याच अभिंनदनास्पद वाटचालीतील अनेक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे अमृत 

“अमृत हा १९८६ साली प्रदर्शित झालेला अत्यंत संवेदनशील आणि आशयघन हिंदी आहे.  मानवी आयुष्यातील नात्यांचे महत्त्व उलगडणारा चित्रपट म्हणून आपण अमीरत कडे सहजतेने बघू शकतो. मोहन कुमार दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते  निर्मिती अरविंद सेन आहेत चित्रपटातली प्रमुख कलाकाराचा विचार करता, राजेश

खन्ना, स्मिता पाटील हे नायक आणि नायिकेचे पात्र साकारत असून अन्य प्रमुख कलाकारांमध्ये अरुण इराणी आणि शफी इमानदार यांची नावे घेता येतात. चित्रपटाची कथा अमृत आणि राधा या दोन वृद्ध व्यक्तींच्या अवतीभवती फिरते. हे. दोघेही कुटुंबीयांकडून होणारी उपेक्षा, दुर्लक्ष आणि भावनिक तुटलेपणा यामुळे  एकाकी जीवन जगत असतात. अमृतला स्वतःच्या मुलांकडून अपेक्षित आदर ,तर राधालाही तिच्या कुटुंबाकडून आधार मिळत नाही. अशा परिस्थितीत ते एकमेकांच्या सहवासात येतात आणि नात्यांच्या चौकटींपलीकडील एक जिव्हाळ्याचा, समजुतीचा संबंध निर्माण करतात. चित्रपटात वृद्धत्व, कुटुंबव्यवस्थेतील बदल आणि मानवी नात्यांचे सूक्ष्म पैलू प्रभावीपणे टिपले आहेत; 

या चित्रपटातील गाण्याचा विचार करता 'दुनिया मै कितना गम है' हे गाणे  अत्यंत महत्त्वाचे आहे . मोहम्मद अझीझ यांनी आवाज दिलेल्या या गाण्याची रचना आनंद बक्षी यांनी केले आहे . स्वतःच्या दुःखाकडे लक्ष देत त्याबाबत रडत बसण्यापेक्षा इतरांच्या दुःखाकडे बघत, अरे त्यांच्यापेक्षा माझे दुःख कमी आहे असे लक्षात घेऊन

त्याबाबत आंनद मानण्याच्या मेसीज देणाऱ्या या गाण्याला आपल्या म्युझिकने चार चांद लावले आहेत ते लक्ष्मीकांत -प्यारेलाल यांनी.“दुनिया में कितना ग़म है, मेरा ग़म कितना कम है” ही ओळ जीवनाकडे सकारात्मक आणि व्यापक दृष्टीकोनातून पाहण्याचा संदेश देते. स्वतःच्या दुःखापेक्षा जगातील इतरांच्या वेदना अधिक मोठ्या आहेत, ही जाणीव या गीतातून होते. चित्रपटातील वृद्धत्व, एकाकीपणा आणि कुटुंबातील उपेक्षा या पार्श्वभूमीवर हे गाणे अधिक प्रभावी ठरते. विशेषतः Rajesh Khanna यांच्या अभिनयामुळे गीतातील भावना अधिक तीव्रतेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात.

साधेच मात्र मनावर मोठे परिणाम करणारे संगीत, रोजच्या आयुष्यात जगताना अनुभवायास येणारे  प्रसंग     सहजतेने गुणगुणता येतील अश्या पद्धतीने गाण्यात मांडलेले असणे   आणि आयुष्यातील मानवी भावना रंजकतेने उलगडणारा  आशय यामुळे “अमृत” हा चित्रपट आणि त्यातील हे गीत आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान राखून आहेत.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास