सिंहगड रोड पुणे शहरातील एक आधुनिकता आणि पारंपरिकता यांच्या अनोखा संगम
मी पहिल्यांदा शिक्षणासाठी आणि नंतर नोकरी निमित्ताने पुणे शहरात आलो. त्याला आता ४ते५ वर्षांहुन जास्त दिवस होऊन गेले आहेत.मात्र रोजच्या आयुष्यात बिझी असल्याने म्हणा किंवा अन्य काही अडचणींमुळे म्हणा पुणे शहराचा एक अत्यंत मर्यादित भाग असलेल्या टिळक रोड, सदाशिव पेठ पलीकडे फारसे पुणे शहर फिरलो नव्हतो.नाही म्हणायला काही न्युजपेपरमध्ये पुणे शहरातील विविध उपनगरांचा पेठांतील गमतीजमंती मात्र आवर्जुन वाचायचो. मात्र जसे काठावर उभे राहुन पोहणे शिकण्यात मज्जा नाही.तसेच फक्त याविषयी वाचून काही अर्थ नाही,या गोष्टी स्वत: अनुभवायला हव्यात,हेही समजत होते. त्यावेळी कधीना कधि या गोष्टी स्वत:अनुभवयाचा हे मी ठरवले होते.मात्र त्यावेळी काही कारणाने ते शक्य झाले नाही.आता पुणे शहरात बराच काळ काढल्यावर नोकरीत बऱ्यापैकी स्थैर्य आल्यावर मी ठरवून वेळ काढत पुणे शहरातील विविध भागांना भेट देत असल्याचे तूम्हाला माहिती झाले असेलचं तर याच मालिकेत मी नुकतीच सिंहगड रोड परिसराला भेट दिली त्यासाठी नेहमीप्रमाणे पुणे महानगर परिवहन महामंडळ (पी.एम.पी.एम.एल.)चा एक दिवसाचा पास काढला.सकाळी लवकरच मी स्वारगेटहुन सुरूवा...