सिंहावलोकन २०२४ सार्वजनिक वाहतूक
लवकरच आपण ग्रेनियन कॅलेंडर २०२४निरोप देवून नवीन ग्रेनियन वर्ष २०२५मध्ये प्रवेश करु.या नव्या वर्षात प्रगतीचे विकासाचे नविन ध्येय गाठताना आपण सरत्या वर्षात कुठे होते.हे माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी मी सरत्या २०२४या वर्षाचा क्षेत्र आणि विषयनिहाय आढावा घेत आहे.या लेखात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बघूया.
सार्वजनिक वाहतूक ही कोणत्याही देशासाठी अत्यंत महत्तवाची बाबा आहे देशातील सर्वच लोक खासगी वाहने घेऊ शकत नाहीत तसेच देशातील रस्त्यांचा विवचार करता हे योग्य देखील ठरत नाही भारतासारख्या देशात तर हि बाब अनेक नवीन समस्या निर्माण करते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक असणे आवश्यक आहे तसेच तीत्या त्या प्रदेशातील वाहतुकीचा भर सहन करण्यास सक्षम देखील असावी लागते वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता त्या क्लॉनुरूप वाढ तसेचग आधुनिकता येणे आवश्यक आहे आपल्या भारतातील सार्वजनिकव्यवस्था याचा विचार करता वेगाने बदलत आहे अधिक सक्षम होत आहे सरत्या वर्षात भारतातील सार्वजनिक व्यवस्था कोणत्या प्रकारे बदलली याचा विचार करूया भारतात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा विचार करता रेल्वे आणि सार्वजनिक बसवाहतुकीचा विचार करता येतो दोन्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल; याववर्षी झाले
रेल्वेचा विचार करता, देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल्या उधमपूर बारामुल्ला श्रीनगर रेल लिंक या प्रकल्पाचे काम यावर्षी वेगाने झाले आजमितीस या प्रकल्पाचे सुमारे ९८ ते ९९ टक्के काम पूर्ण झाले असून नवीन वर्षाच्या सुरवातीला या रेल्वेमार्गावर सुरक्षेतेच्या चाचण्या होऊन मार्चपर्यंत या रेल्वेमार्ग प्रत्यक्षात प्रवाशी वाहतूक सुरु होईल . या वर्षी अत्याधुनिक असलेल्या वंदे भारत या रेल्वे अनेक मार्गावर सुरुझाल्या इंटरसिटी वाहतूक वेगाने सुरु व्हावी या साठी वांटे मेट्रो हि नवी सेवा रेल्वेकडून सुरु करण्यात आली अमृत भारत ही नवी सेवा देखील सुरु करण्यात आली यावर्षी रेल्वे रुळावरून घसरण्याचा घटना काहीश्या वाढल्या या घटनांवरून विरोधी पक्षांनी सला धारेवर धरले
बस वाहतुकीचा विचार करतामी आपल्या महाराष्ट्र एसटीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने इलेट्रीकवर चालणाऱ्या रक्तवर्णी लाल रंगाच्या ९ मीटर तर पोपटी हिरव्या रंगसंगीतील १२ मित्राच्या बसेस यावेळी इ शिवाइ या ब्रँडनेम अंतर्गत मोठ्या परसामंत सुरु करण्यात आल्या तसेच डिझेलचा वापर कमी करण्यासाठी दवरूप नैसर्गिक वायू अर्थात एल एन जी वर आधारित बसेस सुरु करण्यात आला सध्या हा प्रयोग सुरु असून याती मिळालेल्या माहितीच्या आधारे एसटी महामंडळ पुढील निर्णय घेणार आहे याखेरीज एसटी महामंडळाकडून या पूर्वी अमलात येणाऱ्या बस तयार करणाऱ्या कंपन्यांकडून फक्त चेसिस विकत घेऊन त्यावर बस बांधण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत, थेट तयार स्वरूपाच्या २४०० बसेस विकत घेण्याच्या निणर्य घेण्यात आला यामुळे महामंडळाला बसे व्यवहारात आणण्याच्या प्रक्रियसे गती देण्यात आली
एकंदरीतभारतातील सार्वजनिक बसव वाहतूक तर मोठ्या प्रमाणात बदलले हेच खरे


टिप्पण्या