स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे!

         


 आपल्या भारताच्या संविधानाने कलम १९ नुसार आपल्यला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे.   मात्र हे स्वातंत्र्य अनिर्बध दिलेले नाही  तर त्यावर काही बंधने दिलेली आहेत जी शासन परिस्थिनुसार वाढवू अथवा कमी करू शकते आपल्या लोकशाहीतील काळा अध्याय असलेल्या आणीबाणीत आपण त्याच्या अनुभव घेतलेलाच आहे आपण सध्या  देखील आणीबाणी नसताना ही  बंधने लक्षात घेतली पाहिजे आपण घटनेने दिलेले स्वातंत्र्य उपभोगताना हे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे याची जाण ठेवणे अत्यावश्यक आहे तरच आपण देशाचे जवाबदार नागरिक म्हणायला लायक ठरू 

हे सर्व सांगायचे कारण म्हणजे युट्युब या सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला एक टॅलेन्ट हंट कार्यक्रम या कार्यक्रमात विनोद सादर करताना अत्यंत अयोग्य भाषेचा वापर केला गेला असल्याने मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला आहे आसाम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून या कार्यक्रमांच्या निर्मात्यांच्या विरोधात पोलिसी कारवाई

सुरु करण्यात आलेली आहे यावरून या घटनेचे गांभीर्य लक्षात येईल 

पुस्तके किंवा पारंपरिक टीव्हीला काही मर्यादा आहेत टीव्हीवरील अर्धा किंवा एक तासाचा कार्यक्रम संपल्यावर पुन्हा तो कार्यक्रम बघायचा झाल्यास किंवा त्या कार्यक्रमाच्या पुढील भाग बघायचा झाल्यास काही तास तरी वाट बघावी लागले पुस्तकाला पानाची मर्यादा आहे याउलट सोशल मीडियाला मर्यादा नाहीयेत्यावरील मनोरंजन कितीही वेळ चालू राहू शकते मोबाईल किंवा लॅपटॉपची बॅटरी संपत आलीये असे वाटले तर ते उपकरण एका बाजूला चार्जिंगला लावून यातून मनोरंजन करता येऊ शकते युट्युबचा व्हिडीओ डाउनलोड केल्यावर ता डेटा पॅकची देखील समस्या उरत नाही मोबाईल आज सर्वांकडे असल्याने आणि डेटा पॅक इतर देशांपेक्षा मोठ्या प्रमाणत स्वस्त असल्याने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो ऑस्टेलिया सारखा सोशल मीडियाबाबतचा कायदा आपल्याकडे नसल्याने याचा मोठा प्रभाव आहे याबाबत सध्यातरी आपल्या देशात कोणतीही सेंसॉर बोर्ड सारखी यंत्रणा नाहीये.

यूट्युबचा अल्गोरिदम विचारात घेतल्यास आपण ज्या प्रकारचे व्हिडीओ वारंवार बघतो त्याच प्रकारच्या व्हिडीओचे सजेशन आपल्याला येतात. चांगल्याकडे बघण्यापेक्षा मानवी मन वाइटाकडे सहजतेने ओढले जाते.शिव्या शिकवायचा क्लास भारतात कुठेही नाही पण त्या चटकन येतात.श्लोक पाठ करायचे कष्ट घ्यावे लागतात हे आपण

रोजच्या आयुष्यात जगताना नेहमी बघतो. आपण शिवराळ कंटेन तयार केल्यास त्यास मोठ्या प्रमाणात व्ह्यु मिळतील मात्र त्यामुळे एक मोठा वर्ग वाइटच बघण्याच्या सवयीत जावू शकेल. जे भविष्याचा विचार करता अत्यंत धोक्याचे आहे. त्यामुळे यावर कंटेन तयार करताना मोठी काळजी घेतली पाहिजे. जी ना घेतल्याने हा वाद निर्माण झाला आहे 

लेखाच्या सुरवातीलाच सांगितले त्या प्रमाणे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे या तत्वाचे पालन आपण सगळ्यानींच करण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे हे नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास