विविध मान्यवरांच्या पदस्पर्शाने पावन भुमीतील एक दिवस
क्रातीसिंह नाना पाटील, भारताचे संरक्षण आणि अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील,राज्याचे महत्त्वाचे गृहमंत्री आर आर पाटिल, महाराष्ट्राच्या संस्कृतिक वारस्याचे आधारस्तंभ माडगुळकर आणि मंगेशकर परिवार, थोर उद्योजक लक्ष्मणराव किलोरस्कर, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, अण्णा भाउ साठे, ज्येष्ठ क्रीडापटु विजय हजारे, आपल्या क्षेत्रातील मातब्बर मंडळी, यांचे क्षेत्र वेगवेगळे असले तरी यांच्यात एक समान धागा आहे. या सर्व मंडळीचा या ना त्या कारणाने सांगली शहर आणि परिसराशी संबंध आला आहे. महाराष्ट्राच्या आर. टी.ओ चा विचार करता महाराष्ट्रात एम एच १० या नावाने प्रसिद्ध असलेल्या या परिसराला मी नुकतीच भेट दिली. खुपच छान अनुभव होता तो.
तर वाचक मित्र
मैत्रीणींनो, ऑफिसच्या विकली ऑफच्या दिवशी
साधरणत: २००किमी अंतरावरील शहराला
एका दिवसात फिरण्याचा माझा
छंद आहे, हे
आपणास एव्हाना माहिती
झाले असेलच. अनेकांना ऑफिसच्या विकली
ऑफच्या दिवशी मस्तपणे ताणून
देयला आवडत असले
तरी मला पुढच्या आठवड्यातील ताण
तणावाला लढायला ताकद या
फिरण्यातून मिळत असल्याने मी
फारच महत्त्वाचे कारण
असेल तरच सहसा
घरी थांबतो. लांबवर
जाणे शक्य झाले
नाही तरी जवळपासच्या एखाद्या ठिकाणी
जातोच जातो. त्याच
प्रमाणे जून महिन्यात आलेल्या सलग
तीन सुटीचा आनंद
उपभोगण्यासाठी
मी एक दिवशीय
सांगली-मिरज शहर
आणि परिसराची निवड
केली.
तर माझ्या फिरण्याची सुरवात
झाली ती गुरुवारी २५
तारखेला. माझ्याकडे खुप दिवसापासून रेलवन
या ऍप्लिकेशनमध्ये पडून
असलेला बॅलन्स असल्याने इतर
पैसे खर्च करण्याच्या ऐवजी
तो बॅलन्स संपवण्याकडे माझा
कल होता. माझी
रेल्वे निश्चित नसल्याने जनरल
तिकीट घेउनच प्रवास
करणार होतो.माझ्यावर देवकृपा असल्याने असेल
कदाचित सुरुवातीचा छोटासा त्रास वगळता
माझा संपुर्ण प्रवास
आनंदात झाला आधी
घेतलेल्या माहितीनुसार पुणे- कोल्हापूर स्पेशल
फेअर ट्रेन रात्री साडे
नउला असल्याने मला
सोईस्कर होती.मी त्या
नुसारचनियोजन सुरु
केले. माझ्या या
नियोजनानुसार मी ऑफिसमधून बाहेर पडल्यावर फिरण्याची तयारी
करत (ज्यात रेलवन
मार्फत टिकीट काढणे,मोबाईल आणि पॉवर
बँक फुल चार्ज
करणे आदी कामाचा
समावेश होता.) रात्री
९ वाजता पुणे
रेल्वे स्टेशन गाठले.
माझा आधीच्या पुणे
रेल्वे स्थानकच्या अनुभवानुसार पुण्यातुन सुटणारी रेल्वे
असल्याने ती सुमारे अर्धा
तास आधीच प्लॅटफॉर्म येईल
अशी माझी अपेक्षा होती.त्यामुळे आपल्याला जागा मिळेल का,
या धाकधुकीतच मी
रेल्वे स्टेशनवर प्रवेश
केला
मी रेल्वे स्टेशनवर प्रवेश
केल्यावर त्या गाडीचा प्लॅटफॉर्म शोधू
लागलो मात्र त्या
गाडीची माहिती डिस्प्ले बोर्डवर माहिती
दिसेनाच.अनाउसमेंटकडे लक्ष होतेच. त्या
ठिकाणी गाडी वेळेवर
सुटेल असे सांगत
होते.मात्र प्लॅटफॉर्मकाही सांगत
नव्हते. रेल्वे स्टेशनवरील चौकशी
केंद्रात विचारणा केल्यावर सव्वा नउच्या सुमारास प्लॅटफॉर्म जाहीर
होईल अशी माहिती
मिळाली.या दरम्यान येथील
एका चहा विकेत्याशी ओळख
करत त्याचाकडून माहिती
घेत गाडी दररोज
प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून निघते
असी माहिती करुन
घेतली,आणि त्यानुसार प्लॅटफॉर्म क्रमांक १
वर आलो तर
प्लॅटफॉर्म आधीचीच न सुटलेली पुणे
-दानापूर रेल्वे उभी. माझी गाडी
वेळेवर सुटाणार अशी
अनाउसमेंट तर होतेय.गाडी
सुटायला जेमतेम दहा मिनीटे
शिल्लक .गाडी मात्र
प्लॅटफॉर्मवर उभीच नाही.
मी सुमारे दोनच
महिन्यापूर्वी
पुणे - कोल्हापूर डेमूतून प्रवास
करताना प्लॅटफॉर्म क्रमांक १
वर मु़ंबईला जाण्यासाठी एक गाडी उभी
असताना त्याच प्लॅटफॉर्मवर जहागीर
हॉस्पिटलच्या बाजूने डेमू उभी
करण्याचा पराक्रम रेल्वेने करण्याचा अनुभवला असल्याने संपुर्ण प्लॅटफॉर्मला दोनदा चक्करा मारल्या. मात्र
माझी गाडी दिसेना
मात्र माझे त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर उभ्या
असणाऱ्या लोकांच्या कपड्याकडे लक्ष होतेच.आपल्या
महाराष्ट्रीयन
लोकांसारखे कपडे असलेल्या एका
ग्रूप शेजारी मी
उभा राहिलो.सरतेशेवटी नउ
वाजता सुटणारी पुणे-
दानापूर एक्सप्रेस चाळीस मिनीटे उशीराने ९
वाजून ४० वाजता
सुटल्यावर १० मिनीटांनी ससुनच्या बाजूने
माझी पुणे-कोल्हापूर स्पेशल
ट्रेन आली, आणि
माझ्या सांगली प्रवाश्यास सुरुवात झाली.
पहाटे चारच्या दरम्यान गाडी
सांगली रेल्वे स्टेशनवर आली.माझी सांगली परिसरात जाण्याची ही
दुसरी वेळी. याच्या
आधी गेलो तेव्हा
मिरजला उतरलो असल्याने या वेळेस
नविन अनुभव घेण्याचा उद्देश्याने मी
सांगलीस उतरलो.सांगलीस उतरणे
हे चूकीचे होते.
याचा अनुभव मला
अजून यायचा होता,म्हणून मी आनंदातच रेल्वे
स्टेशनमधून बाहेर आलो. बघतो
तर काय एकही
शहर बसवाहतूकीची बस
नाही. मी काही
वेळ वाट बघितली
तरी काहीच हालचाल
दिसेना. शेवटी एक
रिक्षा वाला स्वत:हुन आला त्याने
मला बसस्टँड वर
सोडण्याचे १३० रुपये घेणार
असल्याचे सांगितले. मात्र मी या
आधी काढलेल्या माहितीनुसार त्याचे
१०० रुपये होत
असल्याने मी त्यास ७०
रुपयेच होतात असे
सांगत होतो.अखेर
गडी १००रुपयात तयार
झाला,अणि मी
नरसोबाची वाडी येथे जाण्याकरता बसस्टँडवर आलो.
सांगली बसस्टँड वर
आल्यावर थोडासा ब्रेकफास्ट आणि
सभोवतालचा परिसर बघत सहा
वाजताच्या सांगली -नरसोबाची वाडी
या पहिल्या गाडीने
नरसोबाची वाडीला आलो. तिथे
आंघोळ वगैरे करत
फ्रेश होत आरामात
देवदर्शन केले आणि गुरुचरीत्राच्या काही
अध्यायाचे पारायण केले.मनासारखा वेळ
खर्च केल्यावर पोटभर
ब्रेकफास्ट करत मी पुन्हा
सांगलीकडे प्रस्थान केले. सांगली बसस्टँडवर बराच
वेळ खर्च केल्यावर मला
औदुबराची बस मिळाली आणि
माझा पुढचा प्रवास
सुरु झाला. दर्शन
झाल्यावर तेथील प्रसाद घेत
थोडी विश्रांती घेत
पुन्हश्च सांगलीकडे प्रस्थान केले.
माझ्या सकाळच्या अनुभवानुसार (मिरज
रेल्वे स्टेशन आणि
बसस्टँड जवळ जवळ आहेत.
तर सांगली शहराचा
विचार करता दोघांमध्ये दोन
ते अडीच किल़मीटरचे अंतर
आहे.) आणि मला
रेलवनचा बॅलन्स संपवायचा असल्याने मी
माझा मोर्चा मिरजकडे वळवला.यानुसार प्रवास करत मिरजला
पोहोचलो.जेथून माझा परतीचा
प्रवास सुरू झाला.
मिरजला पोहोचल्यावर पुण्यासाठी गाडील
बराच वेळ असल्याचे समजल्याने मी
माझ्या पर्यटनाची हौस
मिरज शहर दर्शनाद्वारे पुर्ण
करण्याचे ठरवत मिरज भटकंतीस सुरुवात केली.सांगली -मिरज-कुपवाड
शहरात शहर बस
वाहतूकीची सोय नसल्याने अर्थातच सर्व
भार आला तो
पायी चालण्यावर.(रिक्षा
या पर्यटनाबाबत कुचकामी ठरत
असल्याचा माझा अनुभव आहे.)त्यानुसारच चालत मी फिरायला सुरुवातकेली.अर्थात पायी फिरत
असल्याने त्यास भौगोलिक मर्यादा होतीच.त्या मर्यादानुसार मी
मिरज फिरलो .या
मिरज दौऱ्यात मी
अनुभले की, स्टेशन
आणि बसस्टँड लगतचा
परीसराचा विचार करता सांगलीपेक्षा मिरज
अधिक विकसीत आहे.
सांगली परीसरात काचेच्या भिंती
असलेल्या इमारती, टायटन सारखी मोठी
शोरूम आढळली नाहीत.जी मिरज परिसरात सहजतेने आढळली.अर्थात एव्हढ्या छोट्या
नमुन्याद्वारे
आकलन करणे चूकीचे
आहे.सांगली शहराचा
विचार करता इतर
ठिकाणी ते असू
शकेल
मी माघारीच्या प्रवाश्यात पड्डुचेरी - मुंबई
दरम्यान धावणाऱ्या 'चालूक्य एक्सप्रेस' ने पुण्याला परत
आलो ते मनात
एक प्रश्न घेउन
तो म्हणजे तामिळनाडु प्रदेशातील एक
महत्तवाची राजसत्ता म्हणून 'चालूक्य राजघराणे' ओळखले
जाते.ज्याचे नाव
एक्सप्रेसला देऊन त्यांनी तो
इतिहास जपुन ठेवला
आहे. आपण महाराष्ट्रीयन लोक
याबाबत काहीसे कमी
का पडतोय हा?आपल्याकडे देखील सातवाहन ( नाशिकचा सुप्रसिद्ध गौतमीपुत्र सातकर्णी आठवा), शिलाहार, वाकाटक,
यादव या सारखी अनेक राजघराणी आहेत.
अनेक उत्तमोत्तम ग्रंथसंपदा आहे.मात्र दादर ते
पणजी मार्गावर धावणाऱ्या तुतारी
एक्सप्रेसचा अपवाद वगळता आपण
खचितच एखाद्या पुस्तकाच्या नावानुसार एक्सप्रेस मेलचे
नामकरण केले असेल.माझ्याममते मराठी व्यक्तींनी याबाबत
आवाज उठवयला हवा.



टिप्पण्या