कोणत्याही देशाचे भवितव्य तेथील तरुणाई ठरवत असते. तरुणाईच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थावर कोणत्याही देशाच्या भविष्याची दिशा आणि दशा ठरत असते., आणि याच मुद्ययावर आपल्या भारताचे टेंशन वाढवणारी आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झालीये . ही आकडेवारी 'राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली असल्याने ती झटकून टाकता येणे अशक्य .कारण राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडे येणारी माहिती हि देशभरातील पोलीस स्टेशनमधून थेट येत असते .देशभरातील विविध पोलीस सटेशनमध्ये वेगवेगळ्या क्लालाखाली नोंदवण्यात आलेल्या गुन्हयाची एकत्रित नोंद म्हणजे ही आकडेवारी या आकडेवारीत विविध गुन्हयात देशभरात किती प्रकरणे दाखल झाली याची ,माहिती असते .जसे रस्ते अपघात इतक्या , दरोड्याच्या तितक्या , देशभरात दखल झाल्या या प्रमाणे
तर वाचक मित्रानो आणि मैत्रीणीनो राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून नुकतीच सन २०२४ मध्ये देशभरात किती आत्महत्या झाल्या ? त्यापैकी कोणत्या वयोगटातली किती आत्महत्या होत्या ?आत्महत्या करणाऱ्यां व्यक्तींचे व्यवसाय काय होते याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे . यातील आकडे हृदय पिळटवून टाकणारे आहेत सन २०२४ मध्ये एकूण १ लाख ७० हजार ७४६ लोकांनी जीवन संपवले त्यातही तरुणाईचे प्रमाण धोकादायक यास्थितीत परिस्थिती असणारे होते. तरुणाईचा विचार करता १८ ते ३० या वयोगटाच्या विचार करता ३८ हजार २३१ युवकांनी तर १८ हजार २३६ युवतींनी आत्महत्या केली. युवक आणि युवतींचा एकत्रित विचार करता हे प्रमाण एकूण आत्महत्येच्या ३३ टक्के येते युवा वर्गातून नुकतेच काहीसे मोठे झाले आहेत अश्या वयोगटाच्या अर्थात ३० ते ४५ या वयोगटाचा विचार करता हे प्रमाण पुरुषांमध्ये ४३हजार ३५१ आणि महिलांमध्ये ११ हजार ५६४ नागरिकांनी आत्महत्या केली एकूण आत्महत्येच्या संख्येशी या दोन्ही संख्येचा एकत्रित विचार करता ३२ ट्रकके आहेत सर्वसाधारतः वयवर्षे १८ ते ४५

हा वयोगट काम करण्यास योग्य समजला जातो त्याच्या विचार करता एकूण आत्मह्त्येपैकी ६५ टक्के आत्महत्या या वयोगटातील आहेत ज्याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. या आकडेवारीत अजून एक संख्यांची माहिती देण्यात आलेली आहे ती म्हणजे व्यवसाय निहाय आत्महत्येची माहिती ज्याकडे बघितले तर आपल्या महाराष्ट्रात सातत्याने बोलले जाते त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विचार करता २०२४ साली देशभरात झालेल्या आत्मह्त्येपैकी ६.२ टक्के आत्महत्या या शेतकऱ्यांच्या आहेत तर ज्यांच्यावर उद्याच्या विकसित भारताचे स्वप्न आपण बघतो त्या विद्यार्थ्यांचा आत्महत्येच्या एकूण संख्येत वाटा हा शेतकऱ्ययापेक्षा जास्त अर्थात ८.५ आहेत यात बेरोजगार नागरिकांनाच वाट जे याच श्रेणीत येऊ शकतात तो जोडला तर आकडेवारी अजून ८.७ टक्क्याने वाढेल.
इतिहासाचा अभिमान असावा यात शंका नाही. इतिहासात झालेल्या चुका सुधारण्यात देखील काही चुकीचे नाही मात्र हे करताना वतर्मानाकडे दुर्लक्ष होणे सर्वथा चुकीचेच, नाहीतर पुढच्या भविष्यकाळात या चुका दुरुस्त करत बसावे लागेल ते देखील या चुका होत असतानाच दुरुस्त करण्याची संधी मिळत असताना, यासारखे दुर्दैव दुसरे कोणतेच नाही. ही नामुष्की टाळण्यासाठी हो, हा प्रॉब्लेम आहे हे स्वीकारून त्यावर काय उपायोजना करता येतील याचा विचार करण्याची गरज आहे आणि घोड पेंड खाते ते इथेच
टिप्पण्या