समस्या सारखीच फक्त माध्यमात बदल
कालच मला व्हाट्सअप वर एक व्हिडिओ दिसला. व्हिडिओमध्ये आजची तरुण पिढी झेन झी ही इंटरनेटच्या आहारी गेल्यामुळे कसे देशाचे वाटोळे होत आहे, यावर साधरणत:सत्तरीच्या वयाचे आजोबा चिंता करत होते. तो व्हिडीओ बघत असताना, मला का जाणे कुणास ठाउक, माझ्या नाशिकच्या कवीवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवायला लागल्या.
'तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी ।
करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका ॥'
कुसुमाग्रजांच्या सुप्रसिद्ध 'स्वातंत्र्य देवतीची विनवणी' या कवितेतील या ओळी व्हिडीओशी देखील मेळ खात होत्या. आजोबा तरुणाईच्या व्यसनाविषयी बोलत होते, आणि कवीवर्य कुसुमाग्रज देखील आजपासून २९ वर्षापुर्वी याच तरुणाईला वेळ वाया घालण्यापासून परावृत्त करण्याच्या प्रयत्न करत होते.तशी ती संपूर्ण कविताच विचार करण्यासारखी आहे.गेल्या ३०वर्षात परिस्थिती किती सुधारली (किंबहुना बिघडली)याचा विचार करणारा स्वतंत्र लेखाचा विषय होईल.मात्र तूर्तास आपण तो विषय बाजुला ठेवूया.असो
तर कविवर्य कुसुमाग्रजांनी त्या वेळच्या निरर्थक गोष्ट्रीत तरुणाईने वेळ वाया घालवू नये.तरुणाईने करमणूकीला कमी महत्त्व देत देशासाठी काहीतरी ठोस करण्याचा सल्ला दिला होता.आजोबांचा व्हिडीओचा विचार करता रिल्स न बघता,तो वेळ सध्याचे ए.आय.जे जग बघता,सातत्याने नवनविन शिकून मेंदूला ताजेतवाने ठेवायला हवे. याच ताजेतवाने मेंदूमुळे देशाची प्रगती करायला काय करता येईल,याबाबत ठोस उपाय सुचून त्यावर आवश्यक ती पाउले उचलता येतील.
तरुणाईच्यासाठी या कवितेत सांगितलेल्या उपदेशातील दुसरी ओळ तर अधिकच महत्त्वाची ठरू शकते. 'करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका'.१९९७ साली जेव्हा ही कविता पहिल्यांदा लिहली गेली.त्यावेळच्या करमणूकीच्या साधनापेक्षा आताची करमणूकची साधने कैक पटीने वाढली आहेत. त्यामुळे पुर्वीपेक्षा गटारगंगेत लोळणे अधिक सोपे झाले आहे. त्यामुळे तरुणाईची जवाबदारी गेल्या ३०वर्षात जास्त सोपे झाले आहे.असो
आज जर स्वातंत्र्यदेवता आली,तर काय सांगेल,बरे? जे सांगेल ते यापेक्षा कडक असेल,इतकीच कल्पना मी करु शकतेय.यात सांगितलेली महिलांची स्थिती अजुन तशीच आहे.मराठी भाषेची स्थिती काहीशी अजून बिघडली आहे.मात्र मराठी भाषिक यात सांगितल्याप्रमाणे परभाषेत मोठ्या प्रमाणात एक्सपर्ट झाला आहे.श्रीमंत झाला आहे.असे मला वाटते.मला तूमची या बाबबतची कल्पना जाणुन घेयला नक्की आवडेल. मी तूमच्या प्रतिसादाची वाट बघतोय.बाय.
टिप्पण्या