शहर तेच, वृत्ती तीच फक्त नावात आणि तारखेत बदल बस्स ...

 


पुणे शहरात  दोन वर्षापूर्वी झालेल्या, 'बडे बाप कि बिगडी हुवी संतान' या वर्गवारीत सहज मॉडेल अश्या पर्सो कार  दुर्घटनेत अटकेत असेलेल्या वडिलांना जमीन मिळाल्यावर झालेल्या जल्लोष्याचे  फोटो सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली अनेकांनी सोशल मीडियावर त्याबाबत तीव्र नापसंती दर्शवली. .मात्र हे करताना हे नागरिक  हे विसरले की,याच प्रकारची घटना पुणे शहरात सुमारे ४० ते ४५ वर्षांपूर्वी  घडली होती. त्यावेळी कटाची संपूर्ण माहिती पोलिसाना दिल्यामुळे पोलिसांनी ज्यास शिक्षेतून सूट दिली त्या आरोपीची देखील कुटुंबियांनी  याच प्रकारची भव्य मिरवणूक काढली होती .जणू त्यांनी निष्पाप पुणेकरांना नव्हे तर पाकिस्तानी अतिरेक्यांना कंठस्नान घेतले होते . त्यामुळे माझ्या मते सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या घटनेचे वर्णन 'शहर तेच, वृत्ती तीच फक्त नावात आणि तारखेत बदल बस्स ... असेच करावे लागेल . 

मी बोलत आहे जोशी- अभ्यंकर खून खटल्यात माफी मिळालेल्या सुहास चांडक याच्या विषयी. सुहासचा कुटंबीयांनी देखील त्याची याच प्रकारची मिरवणूक काढली होती.  इंटरनेटवर तुम्ही याविषयी शोधले तर याविषयी मोठ्या प्रमाणात माहिती मिळेल. त्यावेळी देखील याच प्रकारची टीका करण्यात आली होती. मात्र त्यातून समजणे ठोस धडा न घेतल्याने हा प्रसंग पुन्हा घडला. पैशाची मग्रुरी काय असते. हेच यातून ४५ वर्षांनी पुन्हा एकदा दिसून आले. जोशी अभ्यंकर खून प्रकरणात आरोपीना आपण काय करतो आहोत याची जाणीव होतीत्यातील एक आरोपी मुन्नवर शाह याने  लिहिलेल्या,'यास आम गिल्टी' या पुस्तकात याचा स्पष्ट उल्लेख आहे तर या कर अपघातात दुर्घटनेची शक्यता माहिती असू शकते मात्र त्याची तीव्रता किती असेल हे माहिती नसेल इतकेच. हे साम्य तुरुंगातून सुटून आल्यवरच्या वर्तनात देखील दिसले यास दुर्दैवी योगायोगच म्हणावा लागेल 

शहर तेच, वृत्ती तीच फक्त नावात आणि तारखेत बदल बस्स  हे चित्र वारंवार दिसणे कधीच योग्य नाही. मात्र आपल्या  भारतात अनेकदा हेच चित्र  दिसते.  जेव्हा दिसते त्यावेळी याविषीयी चर्चा होते.  मग समाजाला नवीन

विषय सापडतो.आणि या विषय अडगळीत पडतो.  तो पुन्हा या प्रकारची घटना घडेपर्यंत एखाद्या विषयावर तो तडीस लागेपर्यंत त्याच्या मागे लागणे किमान या सारख्या प्रकारांत तरी आवश्यक आहे नाहीतर ४५ - वर्षांपूर्वी चांडक परिवार गाजला आता अग्रवाल परिवार गाजतोय भविष्यात अजून एखादा परिवार गाजेल ङोई हे दुष्ट चक्र असेच सुरु राहील जे निकोप समाजासाठी कधीच म्हणजे कधीच योग्य ठरणार नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास

पुर्णत: आपल्या मातीतील पर्यावरणपुरक गणेशोत्सव