पती-पत्नीच्या विश्वासाची दृढता स्पष्टपणे दाखवून देणारे गाणे
दोनच दिवसापुर्वीची गोष्ट आहे. एका वर्तमानपत्रात सध्या समाजात वाढणारे घटस्फोट, आणि त्यातून निर्माण होणारे एकल पालकत्व यावर परखड भाष्य करणारा लेख वाचायला मिळाला.पती-पत्नींचा संघर्षात त्याच्या अपत्यांचे होणाऱ्या मानसिक शोषणाबाबत लेख चिंता व्यक्त केली होती. मी फावल्या वेळात अनेकदा गाणी ऐकतो. त्यामुळे अनेकदा होत काय ? तर एखादी घटना बघितली एखादा लेख वाचला की, आपोआप अरे या प्रसंगाला हे गाणे याला शोभून दिसेल,असे लक्षात येते.याही वेळी अग्गदी तसेच झाले.या लेखाला मला एक गाणे आठवले ते म्हणजे, 'दिस येतील,दिस जातील भोग सरेल, सुख येईल',हे गाणे.१९८२ प्रदर्शित झालेल्या शापीत या चित्रपटातील हे गीत स्मिता पाटील आणि कुलदिप पवार यांच्यावर चित्रीत झाले आहे. या गीताचे गायक आशा भोसले आणि सुरेश वाडकर आहे गीतकार सुधीर मोघे असून संगीतकार सुधीर फडके आहेत
कातकरी समाजाच्या कष्टकरी जिवनाच्या पार्श्वभुमीवर हे गाणे चित्रीत झालेले असले तरी, माझ्यामते हे गाणे कोणत्याही नवरा -बायकोच्या नात्यावर भाष्य करणारे गाणे म्हणून ओळखले जाऊ शकते.
ज्यात पत्नी आपल्या पतीस सध्या जरी कष्ट्राचे दिवस असले तरी आपण एकत्र लढु.एकत्र लढल्याने हे दिवस सरतील सुखाचे,आनंदाचे दिवस येतील.असा धीर देते. पती देखील आपल्या अपत्याविषयीच्या त्याचा मनातील कल्पना पत्नीस सांगतो.पत्नी यावेळी देखील त्यास साथ देत, हे अपत्य आपल्या दोघांचे असल्याचे सांगते. आणि आपल्याला साथसंगतीने हा संसार करायचा असल्याचे दाखवून देते.
पती-पत्नी ही संसाराची दोन चाके आहेत.दोन्ही चाके एकत्र चालली तरच, संसार उत्तम होतो.एखाद्याने जरी कुरकुर केली तर संसारात दु:ख निर्माण होते, असे सातत्याने म्हटले जाते. हाच संदेश हे गाणे देते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
टिप्पण्या