जगाच्या छप्पराची सफर घडवणारे प्रवासवर्णन :वाट तिबेटची

 


प्रवासवर्णन हा लेखन प्रकार मराठीत मोठ्या प्रमाणात रुळला आहेसन १८५७ साली गोडसे गुरुजी या नावाने प्रसिद्ध असलेल्या विष्णू भट गोडसे यांनी लिहलेले माझा प्रवास हे मराठीतील पहिले प्रवासवर्णन समजले जाते १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी लेखकाने ऊत्तर भारतात केलेल्या प्रवासाचे यात वर्णन आहे . सध्या आपल्या मराठीत 'अपूर्वाईआणि 'पूर्वरंग' 'धुक्यातून लाल ताऱ्याकडे' 'माझा युरोपचा प्रवास' 'विलायतेचा प्रवासया सारखी अनेक प्रवासवर्णन प्रहद आहेत.किंबहुना काही लेखक फक्त त्यांच्या प्रवासवर्णनासठीच प्रसिद्ध आहेतमूळच्या पुणे शहराच्या रहिवाशी असलेल्या मात्र लग्नानंतर लंडन शहरात स्थायिक झालेल्या मीना प्रभू या अश्याच प्रवासवर्णांसाठी प्रसिद्ध असलेल्या लेखिका मी नुकतेच त्यांचे 'वाट तिबेटची हे पुस्तक वाचले मीना प्रभू याआपल्यला  ‘वाट तिबेटची’ या पुस्तकातून  हिमालयाच्या कुशीत वसलेल्या तिबेट या गूढआध्यात्मिक आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशाची सखोल ओळख करून देतात .

 हे पुस्तक केवळ प्रवासवर्णन म्हणून मर्यादित नाहीये. आपण त्याला  सांस्कृतिकऐतिहासिक आणि मानवी भावनांचा वेध घेणारी एक समृद्ध अनुभवयात्रा  म्हणू शकतो . तिबेटचा प्रवास हा भौगोलिकदृष्ट्या कठीणउंच पर्वतविरळ हवा आणि अनिश्चित परिस्थिती होत असलातरी त्याच्या पलीकडे असलेली शांततासाधेपणा आणि तिबेटियन बुधदी धर्माची अध्यात्मिकतेची ओढ मीना प्रभू यांनी  अत्यंत सहजसोप्या शब्दात मात्र  प्रभावी शब्दात मांडली आहे.

या पुस्तकात ल्हासा शहरपोताला पॅलेसविविध बौद्ध मठ आणि तेथील धार्मिक परंपरा यांचे जिवंत चित्रण दिसतेबौद्ध धर्माचा दैनंदिन जीवनावर असलेला प्रभावप्रार्थना चक्रेसाधूंचे जीवन आणि श्रद्धेने जगणारे सामान्य लोक यांचे सविस्तर केलेले वर्णन वाचकाला त्या वातावरणाचा पुस्तकाच्या माध्यमातून का होईना  अनुभव देते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.  मीना प्रभू यांनी मांडलेले तिबेटी लोकांचे जीवन अत्यंत साधेकष्टमय आणि तरीही समाधानाने भरलेले आहेकठीण परिस्थितीतही त्यांनी जपलेली आनंदी वृत्ती आणि अध्यात्मिक निष्ठा वाचकाला विचार करायला भाग पडते 

याचबरोबर तिबेट म्हंटल्याबरोबर बौद्धर्माखेरीज आपणासमोर जे चित्र सहजतेने डोळ्यासमोर येते त्या चीनच्या अधिपत्याखालील त्याच्या राजकीय परिस्थितीचीही जाणीव या पुस्तकातून होतेतिबेटी संस्कृतीवर झालेले परिणामत्यांच्या स्वातंत्र्यभावनेवरील मर्यादा आणि त्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वेदना लेखिका मीना प्रभू यांनी  अत्यंत संवेदनशीलतेने मांडली आहेदलाई लामांविषयी असलेली लोकांची निष्ठा आणि त्यांच्या प्रती असलेला आदर हा या समाजाचा महत्त्वाचा भावनिक आधार असल्याचेही या पुस्तकात स्पष्ट करण्यात आले

आहे.  त्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचकाला केवळ माहिती मिळत नाहीतर त्या समाजाशी एक भावनिक नातेही निर्माण होते.

लेखिका मीना प्रभू यांनी पुस्तकात वापरलेली  भाषाशैली साधीप्रवाही आणि चित्रमय असल्यामुळे प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतोप्रवासातील अडचणीनिसर्गाचे अद्भुत वैभव आणि मानवी जीवनातील साधेपणा यांचा सुंदर मेळ या पुस्तकात गुंफलेला आढळतो  वाचकाला वाचताना असे सातत्याने  तो स्वतः या प्रवासाचा एक भाग आहे आणि प्रत्येक अनुभव प्रत्यक्ष अनुभवत आहे.असे वाटावे या पद्धतीनेच लेखन लेखिका मीना प्रभू यांनी केले आहे 

एकूणच,वाट तिबेटची’ हे पुस्तक तिबेटच्या भौगोलिक सौंदर्याबरोबरच तेथील संस्कृतीअध्यात्म आणि सामाजिक-राजकीय वास्तव यांचे सखोल दर्शन घडवणारेविचारप्रवर्तक आणि मनाला स्पर्श करणारे उत्कृष्ट प्रवासवर्णन आहेप्रवासप्रेमींसह वेगळ्या संस्कृतींची ओळख करून घेण्याची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक निश्चितच वाचननीय ठरते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास