नादवेध संगीताची अदभूत सफर घडवणारे पुस्तक
संगीत , आपल्या मानवी जीवनातील अविभाज्य घटक .मानवी जीवनातील ताण तणाव अडचणीनं क्षणभर का होईना विसरायला लावून मनुष्याला आनंदाचेक्षण समाधानाची अनुभूती करायला लावणारी अदभूत अशी नैसर्गिक शक्ती म्हणजे संगीत. .याच संगीताच्या या विलक्षण शक्तीमुळे वैद्यकीय उपचार पद्धतीत संगीताचा उपयोग मानसशास्त्रीय तसेच शारीरिक आजारांच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरतो . ‘ म्युझिक थेरपी ’ द्वारे ताण , चिंता , नैराश्य यांसारख्या मानसिक आजारांमध्ये आराम मिळतो . शांत संगीत मन स्थिर करते , भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि सकारात्मक विचार वाढवते . शारीरिक आजारांमध्येही संगीत वेदना कमी करण्यास , रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि झोप सुधारण्यास सहाय्यक ठरते . तसेच मेंदूच्या कार्य...