शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात रंगणार युद्ध !
शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात रंगणार युद्ध ! शीर्षक वाचून गोंधळलात पडला का,? आधीच जगात दोन युद्ध सुरु आहेत.एक आहे गेल्या साडेतीन वर्षापासून सुरु असलेले रशिया -युक्रेन युद्ध आणि दुसरे म्हणजे इराण विरूद्ध अमेरिका इस्राइल हे युद्ध .या दोन्ही युद्धामुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे.आता पुन्हा नवीन युद्ध होणार म्हणजे फक्त त्रास त्रास आणि त्रासच .असा विचार येत असेल तर जरा थांबा. या युद्धामुळे तूम्हाला त्रास होणार नाही तर आनंदच मिळणार आहे.बौद्धिक आनंदाचा अनुभव तूम्हाला या युद्धातून तूम्हाला घेता येणार आहे. 'गर्व से कहो हम भारतीय है' असे अभिमानाने म्हणत तिरंगा फिरवण्याची संधी तूम्हाला या युद्धामुळे मिळणार आहे.भारतीयांची बुद्धीची दखल जगाला आदराने घेण्याचा प्रसंग या युद्धामुळे होवू शकतो. हे युद्ध शस्त्रांनी लढले जाणार नाही.तर बुद्धीने लढले जाणार आहे. आता बुद्धीने लढले जाणारे युद्ध म्हटल्यावर तूम्हाला वाटले असेल ए.आय.चा वापर असेल,गेला बाजार एकमेकांचा महत्त्वाच्या प्रणालीत सायबर अटॅक करून त्या निकामी करणे असेल.किमानपक्षी रॉकेट उडवून दुसऱ्याचे उपग्रह निकामी करत...