पोस्ट्स

15 नाही 66 टक्के दरवाढ

इमेज
आपल्या महाराष्ट्र एसटीने आपल्या प्रवासी भाड्यात 15 टक्क्याची वाढ केल्याची माहिती तुम्हाला असेलच. ही दरवाढ जाहीर करताना, आपल्या महामंडळाने फक्त सर्वसाधारण तिकिटाचीच दरवाढ जाहीर केली होती, आणि एसटी महामंडळाकडून जे पास देण्यात येतात त्यांची दरवाढ नंतर जाहीर करण्यात येईल असे सांगितले होते. दरवाढ जाहीर केल्यानंतर 4 दिवसांनी अर्थात 29 जानेवारी रोजी महामंडळाने एक परिपत्रक जाहीर प्रसिद्ध करून पासची दरवाढ जाहीर केली..पासची दरवाढ  बघताना, 'आवडेल तिथे प्रवास' या पासामध्ये तब्बल 66% ची दरवाढ करण्यात आलेली आहे असे दिसून आले. जे पूर्णतः अयोग्य आहे.पुर्वी प्रौढांसाठी 4दिवसांसाठीचा शिवशाहीचा पास 1520रुपयांमध्ये होता जो आता 2533 रुपये तसेच साध्या बसचा 4दिवसांच्या प्रौढाच्या पाससाठी 1170 च्या ऐवजी 1814 रूपये मोजावे लागतील 7दिवसाच्या प्रौढ साध्या बसचा प्रवास 2040च्या 3171 रुपयांना मिळेल तर 7 दिवसाचा शिवशाही पास 3030ऐवजी 4429रूपयांना मिळेल        एसटी महामंडळाकडून देण्यात आलेल्या या पासचा फायदा घेत, अनेक हौसी प्रवाशी महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात फिरत असे.या प्रवाश्यांमुळे...

भारत चीन संबंधांचा आत्ताच्या काळापर्यंत सविस्तर आढावा घेणारे पुस्तक 'भिंती आडचा चीन'

इमेज
               आपल्या मराठीत सध्या जागतिक राजकारणाविषयी अनेक नवं नवीन  पुस्तके प्रसिद्ध होत आहेत. या पुस्तकांमुळे आता आतापर्यंत काहीसा अपरिचित असणारा भारताचे परराष्ट्र धोरण हा विषय मराठी जणांना मोठ्या प्रमाणात परिचित होत आहे. या सकारात्मक बदलातील एक घटक असलेले 'भिंती आडचा चीन',हे श्रीराम कुटे लिखित आणि मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तक मी नुकतेच सावाना या नाशिकमधील सुप्रसिद्ध सांस्कृतिक संस्थेच्या मदतीने वाचले.                   भारत चीन संबंधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफशियल इंटेलिजियन्स क्षेत्रात चीन करत असलेली प्रगतीमुळे काय फरक पडू शकतो आणि का फरक पडणार ? याविषयी  सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.तसेच गेल्या दोन वर्षापासुन सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धामुळे भारत आणि चीन राजनैतिक संबंधावर देखील हे पुस्तक भाष्य करते.या खेरीज भारताला चीनच्या विचारसरणीचे, आर्थिक लष्करी आणि राजकीय आव्हान भविष्यात कसे असेल या मुद्द्यांवर देखील या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे‌   ...

महाराष्ट्राच्या एसटीने गमावलेली संधी

इमेज
नुकतीच आपल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरात 15 टक्के वाढ करण्यात आली सन 2021 पासून तिकीट दरात वाढ न केल्याचे कारण या निमित्तने देण्यात आले. एसटी महामंडळाचे उत्पन्नाचा मुख्य साधन असणाऱ्या तिकीटांचे दर आणि वाढलेले अन्य खर्च बघता  या समतोल साधण्यासाठी तिकिटाचे दर वाढवणे आवश्यकच होते असेही याबाबत सांगण्यात आले. मात्र या वाढलेल्या तिकीट दरांमुळे महाराष्ट्र एसटीने एक मोठी संधी मात्र गमावलेली आहे हे नाकारता येत नाही ती संधी म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आपला विस्तार करण्याची, आणि या  विस्तारातून आपला नफा अधिकाधिक वाढवण्याची .आपल्या शेजारील कर्नाटक राज्य हे त्यांच्या प्रादेशिक सीमांचा बाहेर मोठ्या प्रमाणात सेवा देत आपला नफा कमवते मात्र मात्र आपल्या महाराष्ट्र एस टी मध्ये 15 टक्के दरवाढ झाल्याने आपली ती संधी हूकलेली आहे हे सत्य स्वीकारायलाच हवे..     आपल्या भारतातील सर्व एस टी महामंडळाची एक शिखर संस्था आहे ऑल ऑल स्टेट रोड ट्रान्सपोर्ट युनियन नावाची या ट्रान्सपोर्ट युनियनच्या नियमानुसार आंतरराज्य एसटी बस वाहतुकीचे नियमन होते या नियमानुसार एखाद्या राज्याला...

मराठी गझल विश्वातील उत्तम पुस्तक, 'आतल्या आत मी'

इमेज
आपल्या मराठीला साहित्याची मोठी परंपरा आहे कथा कादंबरी नाटक कविता निबंध चरित्रे प्रवासवर्णने यासारखे अनेक प्रकार आपल्या मराठी साहित्यात रूढ आहेत. या मुख्य प्रकारांचे अनेक उपप्रकार सुद्धा आहेत जसे कविता हा एकच प्रकार जरी विचारात घेतला असता कवितांचे वृत्तबद्ध कविता, मुक्त छंद कविता, चारोळी हायकु, गझल असे विविध उपप्रकार आढळतात. कवितेच्या  विविध प्रकारांवर आधारित अनेक पुस्तके मराठीत आहेत. व्यवसायाने बांधकाम व्यवसायिक असलेल्या नाशिकच्या संतोष हुंडलीकर यांनी लिहिलेला आतल्या आत मी हा काव्यसंग्रह त्यापैकीच एक. मूळचा उर्दू भाषेत असलेला मात्र  मराठी साहित्यिक सुरेश भट यांनी मराठीत रूढ केलेला गझल हा काव्यप्रकार यामध्ये हाताळण्यात आलेला आहे. हा मराठी गझल काव्यसंग्रह मी नुकताच वाचला     एकूण 87 गझल या काव्यसंग्रहात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्या सर्वच गझल खूपच सुंदर आहेत. उत्कृष्ट गझलेचा कसोट्या असणाऱ्या रदिक,काफिया आणि अलामत आणि वृत्त  यांचे उत्तम भान या गझलांमध्ये राखलेले आपणास दिसते.सखोल आणि अथांग आशय याचा देखील या गझल रचनांमध्ये उत्तम पद्धतीने भान राखल्याचे या रचनांचे ...

काश्मिरी पंडितांची सखोल माहिती देणारे पुस्तक,' काश्मीर आणि काश्मिरी पंडित'

इमेज
काश्मिरी पंडित भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा अत्यंत महत्त्वाचा विषय, त्यांचे काश्मीर खोऱ्यातील विस्थापन आणि आणि पुन्हा स्थापनेचे प्रयत्न याविषयी अनेक माध्यमात अनेक व्यक्तींकडून वारंवार बोलण्यात आलेले आहे. मात्र तरी देखील वारंवार चर्चा होणारा विषय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी काश्मीरमधून 370 कलम हटवल्यावर तर या विषयावर सातत्याने  चर्चा होऊ लागल्या. या चर्चांमध्ये मांडण्यात आलेले मुद्दे योग्य पद्धतीने समजण्यासाठी आपल्याला सर्व विषय काही प्रमाणात माहिती असणे आवश्यक. शिक्षण तज्ञांच्या मते कोणताही विषय मातृभाषेत समजल्यास अधिक उत्तम ठरते.  आपल्या मराठी भाषिकांच्या सुदैवाने  नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव सुद्धा नसलेल्या घोटी  या गावातील मधुश्री प्रकाशन आपली ही अडचण दूर करते. मधुश्री प्रकाशनाच्यातर्फे कश्मीर अँड कश्मीरी पंडित  या  मूळच्या इंग्रजी भाषेतील   पुस्तकाचा मराठीत अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला आहे या अनुवादित पुस्तकांमळे आपणास काश्मिरी पंडित हा विषय सहजतेने आणि सखोलतेने समजतो. नाशिक मधील महत्वाची सांस्कृतिक संस्था असलेल्या सावनाच्...

चरित्र भारताच्या अद्वितीय पंतप्रधानांचे ,नरसिंहालोकन'

इमेज
            पी व्ही. नरसिंहराव.  स्वातंत्र्योत्तर भारताचा वाटचालीचा आढावा आपण जर पंतप्रधानानुसार घेण्याचे ठरवल्यास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे नाव . स्वतः पंतप्रधान होण्याच्या आधीचे सरकार बहुमत नसल्यामुळे कोसळले  असताना, स्वतःचे अल्पमतातील सरकार देशावर मोठ्या  प्रमाणात बदल होतील  असा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आधीपेक्षा पूर्णतः विरुद्ध  निर्णय  घेऊन तो अमलात आणणे तसेच देशातील धार्मिक विद्वेष कडेलोटाच्या स्थितीवर जाऊन पोहोचला असताना ती स्थिती नियंत्रणात आणणे य सारखे  महत्वाचे निर्णय घेत   पूर्ण  पाच चालवण्याचा भीम पराक्रम करणारे पंप्रधान म्हणून आज आपण त्यांना ओळखतो . पी व्ही नरसिंहराव हे काँग्रेसचे नेहरू गांधी परिवार सोडून झालेले पहिले पंतप्रधान होय.त्य्नाच्याच कार्यकाळात आपण मुक्त अर्थव्यवसंस्थेचे धोरण स्वीकारले. भारताच्या इतिहासातील काळा अध्याय असलेला बाबरी मशिदीचे पडणे मुबंईत बॉम्बस्फोट होणे या घटना देखील त्यांच्याच कार्यकाळातील इतकी सारी आव्हाने असताना त्यांना स्वतःच्या काँग्रेस पक्षातील नेत्याच्या प...

२०२५ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

इमेज
   अंधाऱ्या    रात्री   आपण    आकाशाकडे   नजर   टाकल्यास   आपणास   आकाशाचे   नयनरम्य   विलोभनीय   दर्शन   होते  .  ज्याचे   आपल्या    सर्वांनाच   प्रचंड   आकर्षण   असते     आपण   आकाशाचे   निरीक्षण   करत   असताना   जर   एखादा   खगोलीय   अविष्कार   आकाशात   दिसत   असेल   तर   मग   सोन्याहून   पिवळे  .  या   २०२५   वर्षात   सुद्धा   अश्या   काही   घटना   आहेत   ज्यावेळी   आकाशाचे   दर्शन   करणे   अत्यंत   ऊत्तम   आहे  .  चला   तर   जाणून   घेउया   या   विषयी  .   या   खगोलीयघटनांचे   आपण   सूर्यग्रहण  ,  चंद्रग्रहण  ,  उल्का   वर्षाव  .,  धूमकेतूचे   दर्शन  ,   सूर्यमालिकेतील   ग्रहांचे ...