पोस्ट्स

'केबीजी' रशियन गुप्तहेर संघटनेचा सविस्तर वृतांत

इमेज
केजीबी ....शीत युद्धाचा काळातील दोन महासत्तापैंकी एक असलेल्या  यू.एस.एस.अर  अर्थात युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट ऑफ रिपब्लिक या देशाची  इस्राइलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनासारखीच प्रसिद्ध असलेली गुप्तहेर संघटना यु.एस.एस.आर ची शकले होवून  स्वतंत्र्य१४ देश निर्माण झाल्यावर पुर्वी केलेल्या कृष्णकृत्यांमुळे प्रसिद्ध झालेली संघटना, केजीबी .या केजीबीची सविस्तर आणि खऱ्या माहितीच्या पुस्तकांचा  आपल्या मराठीत काहीसा अभावच .मात्र ही पोकळी भरुन निघते आपल्या मराठीत अनेक उत्तोमोत्तम पुस्तके प्रसिद्ध करणाऱ्या मधूश्री प्रकाशनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेले केजीबी  या पुस्तकामुळे .नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या घोटी या छोटयासा गावात मुख्यालय असलेल्या मधूश्री प्रकाशनाकडून मराठी भाषेत अच्युत गोडबोले यांची अनेक पुस्तके तसेच विविध तांत्रीक विषयावरची अन्य लेखकाची पुस्तके, आणि सीआयए, मोसाद एफबीआय, रॉ या सारख्या गुप्तहेर संघटनांवर माहितीपुर्ण पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली आहेत‌.त्यातील केजीबी वरचे पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील सर्वात मोठे वाचनालय असलेल्या, सावाना अर्थात...

प्रत्येकाने वाचावाच असा ग्रंथ 'लोकमान्य ते महात्मा'

इमेज
आपल्या मराठीला उत्तमोत्तम संदर्भग्रंथांची  मोठी दिर्घ परंपरा आहे‌.महाराष्ट्राच्या, भारताच्या जगाच्या इतिहास,सामाजिक जीवन,राजकीय जीवन यावर सविस्तर सखोलपणे माहिती देणारी कितीतरी ग्रंथ आपणास मराठीत आढळतात. त्याच प्रमाणे सुरवातीला एखाद्या दैनिकात,साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्त लेख मालिकेचे कालांतराने पुस्तक प्रसिद्ध केल्याचा समृद्ध इतिहास देखील मराठी पुस्तक विश्वाला आहे‌.आपल्या मराठीत असी अनेक पुस्तके आहेत जी ही दोन्ही निकषे, संदर्भ ग्रंथ  म्हणून उत्तम मुल्य आणि प्रथमत: मालिका स्वरूपात प्रसिद्धी नंतर पुस्तक रुपाने प्रसिद्धी हे पुर्ण करतात.पुस्तकाची गुणवत्ता उत्तम आहे हे दाखवणाऱ्या या दोन्ही निकषांची पूर्तता करणाऱ्या पुस्तकांच्या मांदियाळीतील मुकुटमणी होईल असे पुस्तक म्हणजे राजहंस प्रकाशनातर्फे आणि ज्येष्ट विचारवंत ,लेखक प्राध्यापक डॉ सदानंद मोरे यांनी लिहलेले लोकमान्य ते महात्मा हे पुस्तक. मोठ्या आकाराच्या सव्वा साडे सहाशे पानाच्या या पुस्तकाच्या दोन भागापैकी पहिला भाग मी नुकताच नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचानालय नाशिक अर्थात सावाना च्या ग्रं...

खगोलातील अढळ तारा निखळला

इमेज
खगोलशास्त्रप्रेमींची मंगळवार 20 मेची सकाळ उजाडली,ती एका दुर्देवी बातमीने.  डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाच्या बातमीने        खगोलशास्त्रप्रेमींना त्यातही मराठी जनांना आपल्यातीलच कोणीतरी भावना दाटून आली.    जगविख्यात शास्त्रज्ञ असून देखील आलेल्या पत्रांना आवर्जून उत्तर देणारे व्यक्तीमत्व म्हणून डॉ. नारळीकर विख्यात होते.डॉ. नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. पालकांच्या या ज्ञानाचा प्रभाव बालपणी डॉ जयंत नारळीकरांवर पडला.नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार ...

भारताच्या कुटनितीची माहिती देणारे पुस्तक, 'रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गुढकथा'

इमेज
सध्याचा भारत पाकिस्तान तणावाच्या काळात, युद्धाच्या बातम्या बघताना आपणास अरे अपल्या लष्कराला पाकिस्तानमधील दहशतवादी तळाची अचूक ठिकाणे कशी काय समजतात? असा प्रश्न पडू शकतो.तर याचे उत्तर आहे आपली गुप्तहेर संघटना, रिसर्च अँड अँनलिसीसस अर्थात रॉ या संघटनेचे जाळे.आपण अनेकदा इस्राइलची गुप्तहेर संघटनेच्या कारवाया ऐकतो‌ याच पद्धतीचे कामकाज करणारी मात्र अनेकदा पडद्याआड राहणारी संघटना म्हणजे रॉ.मराठीत न च्या बरोबर आणि इंग्रजीतसुद्धा मोजकेच लेखन झालेल्या रॉचे कार्य  नक्की कसे  चालते‌? देशहितासाठी त्यांनी आतापर्यत कोणते कार्य केले आहे? हे अचूकपणे समजून घेयचे असेल तर आपणास मनोविकास प्रकाशनाच्या 'रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गुढकथा' हे पुस्तक खुप उपयोगी पडते. सध्या मुंबई सकाळ चे संपादक असलेले  ज्येष्ठ पत्रकार रवी आमले या पुस्तकाचे लेखक आहेत. रवी आमले यांनी 300 पानांच्या या पुस्तकातून 24 प्रकरणाद्वारे रॉ ने केलेल्या कार्याची ओळख करून दिली आहे. मी नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या सहकार्याने नुकतेच हे पुस्तक वाचले.  ...

एक नजर त्यांचा कामावर

इमेज
मी काही महिन्यापुर्वी छावा हा चित्रपट  बघितला. चित्रपटातून आपणास अनेक अज्ञात बाबी समजतात.त्याबद्दल चित्रपट निर्मात्या रवी कौशीकचे मानावे तितके आभार कमीच आहे. त्याच्यामुळे मराठ्यांचा ज्वाजल इतिहास समस्त देशवासीयांच्या समोर आला.या चित्रपटाविषयी अनेकांनी भरभरुन लिहल्याने त्याविषयी मी काही जास्त बोलणार नाही.तितकी माझी पात्रता देखील नाही मला तूमचे लक्ष वेधून घेण्याचे आहे.कोणताही चित्रपट संपल्यावर चित्रपट निर्मितीच्या विविध टप्प्यावर गुंतलेल्या व्यक्तींची जी यादी येते त्याकडे            माझे असे निरीक्षण आहे की बहूसंख्य जण चिञपट संपल्यावर येणाऱ्या श्रेयावलीकडे साफ दूर्लक्ष करतात चिञपट तयार करणे हे सांघीक कार्य आहे आपल्यास पडद्यावर जितके लोक दिसतात त्याचा तुलनेत अधिक लोक पडद्यामागे कार्यरत असतात त्याचा कामाची दखल घेण्यासाठी चिञपटाची सांगता झाल्यावर दाखवण्यात येणारी श्रेयावली किमानपक्षी डोळ्याखालून घालणे आवश्यक आहे असे माझे प्रामाणीक मत आहे                   त्यातील काही जणांना विविध पुर...

कोण बघतो कश्यासाठी चित्रपट

इमेज
कोण मेले कोणासाठी रक्त ओकुन ? " या पक्तींचे एक अजरामर मराठी  गाणे आहे त्याच धर्तीवर कोण बघतो कशासाठी चिञपट ?असे म्हणावे अशा किशा  नुकताच माझ्या मिञांचा कट्ट्यावर घडला    तर त्याचे असे झाले की कट्ट्यावर खुप दिवसात चिञपट बघीतला नसल्याने सर्व जण मिळून चिञपटाला जाण्याचे ठरले मग कोणता चिञपट बघायला जायचे यावर चर्चा सुरु झाली माझ्या एका मिञाने थोडा गंभीर विषयावर असणाऱ्या चिञपटाला जावू असे सुचवले यावर दुसरऱ्या एका मिञाने आपण आधीच समस्येने ञासलो असताना परत टेशंन वाढवणाऱ्या गोष्टी का करायचा अशा मुद्दा मांडला त्यापेक्षा गमतीदार विषयाचा चिञपट बघण्याला प्राधान्य देणे महत्ववाचे असल्याचे सांगीतले तुम्हाला काय वाटते ?  धर्तीवर    चिञपट कोणत्या कारणासाठी बघायचे फक्त निव्वळ करमणूकीसाठी की ज्ञानवर्धक करमणूकीसाठी ? या माध्यमाचा समाजावर प्रचंड प्रमाणात परीणाम होतो आणि या माध्यमावर बाजारपेठेचा प्रचंड प्रभाव असतो जी आपण कोणते चिञपट बघतो यावर अवलूंबन असते              फक्त निव्वळ करमणुक महत्ववाची की ज्ञानवर्धक करमणूक ...

सदैव चिरतरुण असणारा चित्रपट, 'सिंहासन'

इमेज
आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत मोठा आशय असलेले अनेक चित्रपट आहेत.दोघी, नितळ, देउळ, देउळबंद, दहावी फ, सामना ,सरकारनामा ही त्यातील काही मोजकी उदाहरणे. मराठी चित्रपटसृष्टीने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर आधारीत चित्रपट दिले आहेत. पत्रकारीतेचा विचार करता  हार्ड  बीट समजल्या जाणाऱ्या राजकारणावर आधारीत चित्रपट मराठीत आहेत. सरकारनामा, सिंहासन ही त्यातील प्रमुख उदाहरण म्हणता येईल  सिंहासन हा चित्रपट तर समस्त भारतीय भाषेतील उत्कृष्ट  चित्रपट म्हणता येईल.16 नोव्हेंबर 1979 रोजी रसिकांसाठी खुला झालेला  या  चित्रपटाला 46 वर्ष पूर्ण होतील मात्र आजदेखील या चित्रपटाचे कथानक रटाळ कालबाह्य वाटत नाही . किंबहुना आज आपण बातम्यांमध्ये ज्या राजकारणाच्या बातम्या बघतो ,त्याचे नाट्य रूपांतरण वाटावे इतका सजीवपणा या चित्रपटात जाणवतो ,     हा चित्रपट त्याच्या पहिल्या दृश्यापासून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो  सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुबई (त्यावेळचे  व्हिटोरीया टर्मिनस ) च्या परिसर त्याच्या पहिल्या दृश्यात दाखवला आहे जो सुरवातीला लॉंग  शॉर्ट  फोकस ...