पोस्ट्स

पुर्णत: आपल्या मातीतील पर्यावरणपुरक गणेशोत्सव

इमेज
निसर्गावर, पर्यावरणावर मानवाने केलेल्या   अत्याचाराची किंमत मानवाने दामदुप्पट सहन करून भोगलेली आहे हे आपण नेहमीच बघितले आहे या चुकांमधून शहाणे होत मानवाने प्रामुख्याने आपल्या आनंदासाठी साजरे करण्यात येणारे सण उत्सवावासाठी पर्यावरणाचा विचार करत आपल्या वर्तणुकीत सुद्धा बदल केल्याचे आपणस दिसते . पूर्वी गणेशोत्सवासाठी सहज दिसणाऱ्या  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्तींची निर्मिती हा अश्याच एक पर्यावरणपूरक बदल मात्र आपल्या महाराष्ट्राच्या पर्यावरणाच्या विचार करता शाडूची माती देखील पूर्णतः पर्यावरणपूरक नाही . शाडूची माती प्रामुख्याने राजस्थान या राज्यात आढळते .तेथील जैविक साखळी या मातीला पूरक आहे मात्र आपल्या महाराष्ट्रातील जैविक साखळी राजस्थानपेक्षा पूर्णतः वेगळी आहे आपल्या महाराष्ट्रातील हवामान सुद्धा राजस्थानपेक्षा वेगळे आहे त्यामुळे होत काय ? तर शाडू माती आपल्या महाराष्ट्रात आढळत नाही आपल्याकडील वनस्पती या मातीत ती माती असली तरी उगवू शकत नाही . आपल्याकडील उंदीर घुशी सारखे जमिनीत बिले करून राहणारे जीव या मातीत जिवंत राहू शकत ना...

वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ

इमेज
 जग किती विविधतेने भरलेले आहे, हे तुम्हाला बघायचे असल्यास तूम्ही फिरायला जा,पर्यटनाला जा,असे एक सुप्रसिद्व वचन आहे. हेच वचन लक्षात घेत मी नुकतीच गुजरात राज्यातील एक टोक असलेल्या वलसाड या जिल्ह्यात पर्यटनाच्या हेतून भटकंती केली‌.या भटकंती दरम्यान मला आलेल्या अनुभवांचे हे अनुभवकथन.      आपण अनेकदा पर्यटनाच्या विचार करता इतर प्रदेशाकडे बघतो‌. जसे भारतीय महाराष्ट्रीय व्यक्ती आग्नेय आशिया युरोप अमेरिका या ठिकाणी जातो. मात्र आपण ज्या प्रदेशात राहतो.त्या प्रदेशाकडे आपले 'अति परीचयात अवज्ञा' म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा त्या प्रदेशातील पर्यटनस्थळे बघायचे राहुन जाते‌.काही वेळेस त्या ठिकाणी पर्यटनस्थळे आहेत,हेच आपणास लक्षात येत नाही‌. मात्र जर योग्य पद्धतीने नजर फिरवल्यास आपणास आपल्या प्रदेशातच कितीतरी पर्यटनस्थळे आढळून येतात. मी असाच शोध घेतल्याने पर्यटनाच्या दृष्टीने फारशा चर्चेत नसलेल्या,माझ्या नाशिक जिल्ह्यातील तीन तालूक्याबरोबर सीमा असलेल्या वलसाड या गुजरातच्या एका टोकाला जिल्ह्यात मला पर्यटनाच्या दृष्टीने खजिनचा गवसला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.     ...

ग्रामीण भागातील कष्टकरी व्यक्तींचे भाव विश्व उघडणारा कथासंग्रह 'हस्ताचा पाउस'

इमेज
आपल्या मराठीत विविध प्रकारचे साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.तसेच या साहित्यात समाजातील सर्व जातीच्या व्यवसायाच्या ,आर्थिकदृष्ट्या श्रीमंत,गरीब ,मध्यमवर्गीय असा सर्व स्तरातील व्यक्तींच्या जीवनाचे खुबीने चित्रण केलेले आढळते‌. साहित्याचा वैवध्येतेची परंपरा मराठी साहित्यात खुप वर्षापासून आढळते‌. या वैभवशाली  साहित्यातील  एक घटक म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांनी लिसलेला हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह .नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या पुस्तक संग्राहलायतून मी  हे पुस्तक. मी नुकतेच वाचले.    सुमारे ८ते १० पानी असलेल्या १२कथा या कथा संग्राहात समाविष्ठ करण्यात आलेल्या आहेत.प्रत्येक कथेचे सुत्र ग्रामीण जीवनात अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तीभोवती गुंफण्यात आले आहे‌. कथेमध्ये आवश्यक त्या ठिकाणी ग्रामीण महाराष्ट्रातील बोलीभाषेचा वापर देखील खुबीने केल्याचा दिसून येते.प्रत्येक कथा उलगडताना पार्श्वभुमीवर जास्त चर्चा लेखकाने केलेली नाही‌.अत्यंत हळुवारपणे मात्र न रेंगाळता सुरवातीच्या अर्ध्या ते एक पानात लेखकाने पा...

इस्राइलच्या गुप्तचर संस्थेची रंजक कहाणी सांगणारे पुस्तक 'मोसाद'

इमेज
सध्या आपल्या मराठीत अनेक नवनविन विषयांवरील अनेक पुस्तके प्रसिद्ध होत आहेत.  महाराष्ट्राच्या शहरी भागातीलच नव्हे  ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या सर्वच प्रकाशकांकडून ही पुस्तके प्रसिद्ध करण्यात येत आहेत. पुर्वीपासून मराठीत असणारी इतर भाषेतील पुस्तके मराठी भाषेत अनुवादीत करण्याची परंपरा सध्या वेगाने विस्तारत आहे‌. याच मराठीच्या उत्तमोत्तम पुस्तकांचा परंपरेतील पुस्तके प्रसिद्ध करणारे एक महत्तवाचे प्रकाशन म्हणून आपण मधूश्री प्रकाशनाकडे   बघू शकतो‌.मुळचे नाशिक जिल्ह्यातील तालूक्याचे गाव देखील  नसणाऱ्या घोटीतून सुरवात केलेले आणि आता पुण्यात स्थिरावलेल्या  या प्रकाशनाकडून अच्युत गोडबोले यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली आहेत‌ हे आपणास माहिती असेलच‌.या पुस्तकांशिवाय मधूश्री प्रकाशनांकडून विविध देशांच्या गुप्तचर संस्थांची माहिती देणारी पुस्तके प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.त्यापैकी रॉ, एफबीआय, सीआयए, केजीबी या संस्थांवरील प्रत्येकी एक तर मोसादवरची दोन पुस्तके प्रमुख म्हणता येतील. मोसादवरील दोन पुस्तके  १६० आणि ३७६पानांची आहेत.त्यातील १६०पानांचे पु...

संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या शिकवणीचे सद्य काळातील महत्त्व सांगणारे पुस्तक, तूका राम दास

इमेज
आपल्याकडे संतपरंपरेची मोठी परंपरा आहे. या संतांनी जीवनाविषयीच्या अनेक समस्यांवर मोठा उपदेश केला आहे. मात्र आपल्या दुर्देवाने या संताच्या शिकवणीच्याऐवजी त्यांनी केलेल्या चमत्काराचीच चर्चा जास्त होताना दिसते. जसे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याचा मुखातून गीता म्हणवली, भिंत चालवली.किंवा संत तूकाराम यांची कागदावर लिहलेली गाथा तीन दिवस पाण्यात राहुनसुद्धा तीन दिवसांनी जशीच्या तसी बाहेर आली‌.वगैरै. सध्याचा अत्यंत ताणतणावाच्या काळात या संताच्या उपदेशाचे महत्त्व अजूनच मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.संताच्या या  सध्याचा काळातील  शिकवणीचे महत्त्व आपणास समजते ,दैनिक लोकसत्ताच्या प्रकाशनविभागाकडून करण्यात आलेल्या 'तूका राम दास' या पुस्तकातून. संत तूकाराम यांच्या नावातील राम आणि संत रामदास यांच्या नावातील राम एकत्रच घेतलेल्या या पुस्तकातून आपणास या संताच्या शिकवणीचे सध्याचा काळातील महत्त्व समजून येते‌. सन २०१६साली दैनिक लोकसत्तात संत तूकाराम आणि संत रामदास यांच्या विषयी साप्ताहिक लेखमाला प्रसिद्ध झाली होती.याच लेखमालिकेचे हे पुस्तक. जे मी नुकतेच नाशिकमधील सुप्रसिद्ध वाचनालय सार्वजनिक वा...

गणिताची रंजक सफर घडवणारे पुस्तक नंबर्स

इमेज
गणित ! अनेकांचा नावडता विषय.नको ते आकडे, नको ती समिकरणे.असाच आपल्यापैकी काहीचा आग्रह असण्याची शक्यता अधिक आहे.दहावीच्या शालांत परिक्षेत देखील ज्या विषयात मुल मुली सर्वात जास्त नापास होतात असा इंग्रजीनंतरचा विषय म्हणजे गणित होय. तर असा गणित विषय सुद्वा रंजक आहे. गणितात मनुष्याला खिळवून ठेवण्याची ताकद आहे असे सांगितले अनेकांना ते खोटे वाटण्याची शक्यता अधिक.गणित सोपे  प्रत्येक पायरी सविस्तर सांगून समजवता येईल,मात्र गणित रंजक करता येणार नाही असेच अनेकाचे म्हणणे असेल.मात्र गणित रंजक ,खिळवून ठेवण्याची किमया केली आहे‌.अच्युत गोडबोल आणि डॉ.विद्यागौरी प्रयाग यांनी लिहलेल्या नंबर्स या या पुस्तकाने. मधूश्री प्रकाशनाच्या सव्वा तीनशे पानाच्या पुस्तकात १२प्रकरणाद्वारे आपणास गणितातील रंजकता समजते‌.नाशिकमधील महत्तवाचे वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक याच्या पुस्तक संग्राहलयातून हे पुस्तक मी नुकतेच वाचले.  या पुस्तकाच्या १२प्रकरणापैकी पहिल्या प्रकरणात आपणास संख्या कस्या निर्माण झाल्या?याविषयी २८पानामधून माहिती मिळते तर २८पानाच्या दुसऱ्या प्रकरणातून...

गुप्तहेरांच्या विश्वाची सफर घडवणारे पुस्तक, 'शेरलॉक्स होमच्या कथा'

इमेज
गुप्तहेर आणि गुप्तहेरांचे विश्व हा आपल्यापैकी अनेकांचा आवडीचा विषय‌.याचे नाव ऐकले तरी भुवया उंचवणारा विषय‌.आपल्या मराठीत याविषयी थोडेसे कमीच बोलले गेले आहे‌.रा.ना वडप यांनी आपल्या कथांमधून पुढे आणत या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.मात्र वडपांखेरीज अन्य साहित्यीकांनी या विषयापासून दुरच राहणे पसंत केले.गेल्या काही दिवसात मराठीत गुप्तचर संस्थेच्या बाबत मोठ्या प्रमाणात लिहले गेले असले तरी आजदेखील गुप्तहेरांच्या कथेबाबत मराठी भाषिकांना अन्य भाषा प्रामुख्याने इंग्रजीवरच अवलूंबन रहावे लागते‌. इंग्रजीमध्ये स्कॉटलंडचे रहिवासी असलेल्या सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहलेल्या गुप्तहेरांचा कथा संपुर्ण जगात प्रसिद्ध आहेत. या कथांचा नायक शेरलॉक होम्स नावाची व्यक्तीरेखा आहे.या नायकाचा नावावरुन शेरलॉक होम्सच्या कथा या नावाने या प्रसिद्ध आहे‌. मराठीसह जगभरात अनेक भाषांमध्ये या कथांचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे.या अनुवादीत कथांच्या पुस्तकांपैकी एक असलेल्या  आणि गोयल प्रकाशनामार्फत प्रसिद्ध  करण्यात आलेले पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक व...