पोस्ट्स

पुरुषांसाठी महिला किती आवश्यक आहे, हे स्पष्ट करणारे गाणे, 'इसलिये लडकिया, लडकोंसे...

इमेज
आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम गाणी आहेत. काही गाणी त्याला दिलेल्या संगीतामुळे उत्तम या प्रकारात मोडतात. काही गाणी ती ज्या पार्श्वभुमीवर चित्रीत झालेली आहेत, त्यामुळे काही गाणी छान वाटतात. तर काही गाणी त्यातून देण्यात आलेल्या संदेशामुळे सर्वोत्तम श्रेणीत मोडतात.या सर्वोत्तम श्रेणीत मोडणारे एक गाणे म्हणजे, २००४ मे मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम तूम' या चित्रपटातील एक गाणे‌. पुरुषांच्या आयुष्यातील महिलांचे महत्त्व अधोरेखित करणारे 'इसलिये लडकीया लडकोंसे नही होती,हे गाणे. जतीन -ललित या सुप्रसिद्ध जोडीने संगीतबद्ध केलेले आणि अलका यागनिक- शान यांनी आवाज दिलेले हे गाणे, चित्रीत झाले आहे, राणी मुखर्जी आणि सैफ अली खान वर. अभिनयाच्या क्षेत्रात महत्त्वाचा मानल्या गेलेल्या आवाजात दोष असून देखील त्यावर मात करत एकेकाळी बॉलिवूडमध्ये स्वत: चे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून राखी मुखर्जी ओळखल्या जातात. त्यावर स्वतंत्र्यपणे लिहता येऊ शकते, मात्र तूर्तास इतकेच. सहा मिनीटे इतक्या मोठ्या कालावधीचे गाणे परदेशात चित्रीत झाले आहे‌. सुरवातीला सैफ महिला किती त्रासदायक आहेत‌. महिला प...

विनोदवीराचा पडद्यामागील संघर्ष दाखवणारे पुस्तक, 'हसरे दु:ख'

इमेज
आपल्याला एखाद्या रमणीय तलावात बदक शांतपणे पोहतांना दिसले तरी आपल्याला शांत वाटणाऱ्या त्या तलावात बदकाचे स्वत:च्या देहाच्या खाली पायद्वारे सतत पोहणे सुरू असते‌.बदकांच्या पायांची हालचाल होत असल्याने वरवर शांत वाटणारे पाणी सतत वेगाने धुसमळत असते. मात्र वरून बघताना आपणास ते पाणी शांत भासते,आत चालणाऱ्या वादळाची आपल्याला कल्पना देखील येत नाही. कोणत्याही सुप्रसिद्ध माणसाचे व्यक्तीमत्व देखील काहीसे असेच असते‌. ज्या कारणासाठी तो प्रसिद्ध झाला, त्या पातळीपर्यत पोहोचण्यासाठी त्याने घेतलेले सर्वच्या सर्व कष्ट बाहेर येतीलच असे नाही. लोकांनी गरज नसता केलेले मात्र तरी देखील हसत हसत सहन केलेले अपमान, मेहनत लोकांपर्यत पोहचलेलेच असे नाही. एखाद्या यशस्वी व्यक्तीमत्वाचा आपण सत्कार करत असू तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भलेही हास्य दिसत असले तरी त्या हसऱ्या चेहऱ्यामागची भावना या स्थितीपर्यत पोहचण्यासाठी केलेले कष्ठ आठवून मनातल्या मनात रडत सुद्धा असू शकते‌. याच  हसऱ्या दु:खामगाची वेदनेची कारुण्यातेची आपल्याशी भेट होते, राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि भा.द.खेर लिखित 'हसरे दु:ख या पुस्तकात.नाशिकमधील सर्वात ज...

*अशी झाली मानवाच्या अंतराळ प्रवासाची सुरुवात*

इमेज
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी पृथ्वीवर मानव करत असलेल्या निसर्गाच्या हानीमुळे मानवाला नजीकच्या भविष्यकाळात आपला मुक्काम पृथ्वी सोडून अन्य ग्रहावर किंवा किमान अंतराळ स्थानकावर काढावा लागेल, असे विधान केले होते. तसेच मानवाला आवश्यक असणाऱ्या अनेक धातूंचा साठा पृथ्वीवर तर इतर ग्रहावर मोठ्या प्रमाणात असल्याने तो पृथ्वीवर आणणे सोपे व्हावे, यासाठी अंतराळात मानवाला सहजतेने राहता यावे, यासाठी काय करता येईल? अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षणाचा मानवावर काय परिणाम होईल? याचा अभ्यास विसाव्या शतकाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात सुरू झाला. रशियाचे मीर अवकाश स्थानक, अमेरिकेचे स्काय लॅब हे अंतराळ स्थानक असो, किंवा सध्या वापरात असलेले आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक असो, किंवा आता वेगाने आकारास येणारे चीनचे अवकाश स्थानक असो, किंवा भारताकडून अंतराळ स्थानक उभारण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना — हे त्यातीलच काही महत्त्वाचे टप्पे. मानवाची अंतराळात थेट वस्ती करण्यासाठीच्या उपाययोजना जरी २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या असल्या तरी यामागच्या कल्पनेचा मोठा इतिहास ...

साडेतीन गणपतीपैकी एक असलेले शांत गणपती स्थान वडगाव कांशबिंगे

इमेज
           आपल्या भारतात विशेषतः हिंदू धर्मात पर्यटनाचा गांभीर्याने विचार केलेला दिसतो.  लोकांना पर्यटनाच्या दृष्टीने बाहेर काढण्यासाठी अध्यात्म, पुण्याचे संकलन आदी संकल्पनाच्या आधार घेत विविध धार्मिकस्थळे निर्माण केलेली आहेत. त्यातीलच एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील मंचर या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेले वडगाव कांशबिंगे हे साडेतीन गणपतीपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेले धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले स्थान होय. या स्थानाला मी नुकतीच भेट दिली.मनाला नवी ऊर्जा देणारा अनुभव होता तो            हो...!  गणपतींची सुद्धा साडेतीन स्थाने आहेत.हा लेख वाचणाऱ्या अनेकांना मी काहीतरी चुकीचे सांगतोय साडेतीन स्थाने तर देवीची आहेत गणपतीची नाहीत असे वाटू शकतो . माझा अष्टविनायक आणि देवीची साडेतीन शक्तिपीठे यामध्ये गल्लत झाली तर नाहीना असे वाटू शकते. तर त्यांना माझे सांगणे आहे की हो गणपतीची देखील साडेतीन स्थाने आहेत. गणपतीच्या विविध नावामध्ये एक नाव हे मयुरेश्वर आहे.गणपतीने मयुरेश्वर नावाच्या एका राक्षसाचा वध  केल्याने त्या राक्षसाच्या...

पुर्णत: आपल्या मातीतील पर्यावरणपुरक गणेशोत्सव

इमेज
निसर्गावर, पर्यावरणावर मानवाने केलेल्या   अत्याचाराची किंमत मानवाने दामदुप्पट सहन करून भोगलेली आहे हे आपण नेहमीच बघितले आहे या चुकांमधून शहाणे होत मानवाने प्रामुख्याने आपल्या आनंदासाठी साजरे करण्यात येणारे सण उत्सवावासाठी पर्यावरणाचा विचार करत आपल्या वर्तणुकीत सुद्धा बदल केल्याचे आपणस दिसते . पूर्वी गणेशोत्सवासाठी सहज दिसणाऱ्या  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्तींची निर्मिती हा अश्याच एक पर्यावरणपूरक बदल मात्र आपल्या महाराष्ट्राच्या पर्यावरणाच्या विचार करता शाडूची माती देखील पूर्णतः पर्यावरणपूरक नाही . शाडूची माती प्रामुख्याने राजस्थान या राज्यात आढळते .तेथील जैविक साखळी या मातीला पूरक आहे मात्र आपल्या महाराष्ट्रातील जैविक साखळी राजस्थानपेक्षा पूर्णतः वेगळी आहे आपल्या महाराष्ट्रातील हवामान सुद्धा राजस्थानपेक्षा वेगळे आहे त्यामुळे होत काय ? तर शाडू माती आपल्या महाराष्ट्रात आढळत नाही आपल्याकडील वनस्पती या मातीत ती माती असली तरी उगवू शकत नाही . आपल्याकडील उंदीर घुशी सारखे जमिनीत बिले करून राहणारे जीव या मातीत जिवंत राहू शकत ना...

वलसाड, वनवासी आणि गुजराती संस्कृतीचा अनोखा मिलाफ

इमेज
 जग किती विविधतेने भरलेले आहे, हे तुम्हाला बघायचे असल्यास तूम्ही फिरायला जा,पर्यटनाला जा,असे एक सुप्रसिद्व वचन आहे. हेच वचन लक्षात घेत मी नुकतीच गुजरात राज्यातील एक टोक असलेल्या वलसाड या जिल्ह्यात पर्यटनाच्या हेतून भटकंती केली‌.या भटकंती दरम्यान मला आलेल्या अनुभवांचे हे अनुभवकथन.      आपण अनेकदा पर्यटनाच्या विचार करता इतर प्रदेशाकडे बघतो‌. जसे भारतीय महाराष्ट्रीय व्यक्ती आग्नेय आशिया युरोप अमेरिका या ठिकाणी जातो. मात्र आपण ज्या प्रदेशात राहतो.त्या प्रदेशाकडे आपले 'अति परीचयात अवज्ञा' म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा त्या प्रदेशातील पर्यटनस्थळे बघायचे राहुन जाते‌.काही वेळेस त्या ठिकाणी पर्यटनस्थळे आहेत,हेच आपणास लक्षात येत नाही‌. मात्र जर योग्य पद्धतीने नजर फिरवल्यास आपणास आपल्या प्रदेशातच कितीतरी पर्यटनस्थळे आढळून येतात. मी असाच शोध घेतल्याने पर्यटनाच्या दृष्टीने फारशा चर्चेत नसलेल्या,माझ्या नाशिक जिल्ह्यातील तीन तालूक्याबरोबर सीमा असलेल्या वलसाड या गुजरातच्या एका टोकाला जिल्ह्यात मला पर्यटनाच्या दृष्टीने खजिनचा गवसला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.     ...

ग्रामीण भागातील कष्टकरी व्यक्तींचे भाव विश्व उघडणारा कथासंग्रह 'हस्ताचा पाउस'

इमेज
आपल्या मराठीत विविध प्रकारचे साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.तसेच या साहित्यात समाजातील सर्व जातीच्या व्यवसायाच्या ,आर्थिकदृष्ट्या श्रीमंत,गरीब ,मध्यमवर्गीय असा सर्व स्तरातील व्यक्तींच्या जीवनाचे खुबीने चित्रण केलेले आढळते‌. साहित्याचा वैवध्येतेची परंपरा मराठी साहित्यात खुप वर्षापासून आढळते‌. या वैभवशाली  साहित्यातील  एक घटक म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांनी लिसलेला हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह .नाशिकमधील महत्त्वाचे वाचनालय असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावानाच्या पुस्तक संग्राहलायतून मी  हे पुस्तक. मी नुकतेच वाचले.    सुमारे ८ते १० पानी असलेल्या १२कथा या कथा संग्राहात समाविष्ठ करण्यात आलेल्या आहेत.प्रत्येक कथेचे सुत्र ग्रामीण जीवनात अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तीभोवती गुंफण्यात आले आहे‌. कथेमध्ये आवश्यक त्या ठिकाणी ग्रामीण महाराष्ट्रातील बोलीभाषेचा वापर देखील खुबीने केल्याचा दिसून येते.प्रत्येक कथा उलगडताना पार्श्वभुमीवर जास्त चर्चा लेखकाने केलेली नाही‌.अत्यंत हळुवारपणे मात्र न रेंगाळता सुरवातीच्या अर्ध्या ते एक पानात लेखकाने पा...