पोस्ट्स

८० तासाला एक

इमेज
८० तासाला एक हा दर आहे २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाचा. गेल्या वर्षी तब्बल ११० मराठी चित्रपट प्रदर्शित झाले.मात्र या ११० चित्रपटांनी किती कमाई केली, याची माहिती घेतली असता समोर येणारे चित्र खुपच विदारक आहे.या मराठी चित्रपटांची एकत्रीत कमाई आहे, फक्त ९९ कोटी रूपये‌. सरासरी एका चित्रपटाची कमाई येते ९० लाख रूपये. सुमारे १० कोटी मराठी भाषिक असलेल्या महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीचे हे कटू वास्तव आहे. २०२५ वर्षात प्रदर्शित झालेल्या सर्व मराठी चित्रपटांच्या एकत्रीत कमाईला महाराष्ट्राचा लोकसंख्येने भागले असता समोर येणारे चित्र भीषण हा शब्द हास्यास्पद वाटावा असे आहे.महाराष्ट्रातील जनतेने २०२५ वर्षात  मराठी चित्रपटावर खर्च केलेली रक्कम आहे तब्बल १० रूपये प्रती व्यक्ती. एक कप चहाच्या किंमती एव्हढी रक्कम खर्च करण्याचे मोठे औदार्य महाराष्ट्रातील मराठी जनतेने दाखवले आहे. मराठी चित्रपटांनी यावेळी एकत्रीत मिळवलेल्या कमाईला चित्रपटाच्या संख्येने भागले असता चित्रपटाचे जे सरासरी उत्पन मिळते ते आहे ९०लाख रुपये. पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये ६५० ते १३०० स्...

संवादाची नवी परीभाषा उलगडणारा चित्रपट 'पुष्पक'

इमेज
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे.मनुष्याला दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधायला आवडते. संवाद साधायला मनुष्य त्याला निसर्गाकडून मिळालेल्या अनोख्या अस्या स्वरयंत्रातून विविध आवाज काढतो. या आवाजातून भाषा तयार होते आणि मनुष्य या भाषेच्याद्वारे संवाद साधतो,असे समाजशास्त्रज्ञ नेहमी सांगतात. मात्र भाषाद्वारेच संवाद साधता येतो का, की भाषेशिवाय देखील अन्य संवादाची माध्यमे आहेत याचा अभ्यास करता समोर येणारे चित्र मोठे मनोरंजक आहे‌, आणि या मनोरंजक विश्वाची ओळख होते,ती बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेते असलेल्या कमल हसन यांनी १९८७ साली भुमिका केलेल्या 'पुष्पक' या चित्रपटामुळे. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते सिंगीतम् श्रीनिवास राव, तर सिंगीतम् श्रीनिवास राव आणि श्रृंगार नागराज या दोघांनी मिळून त्याची निर्मिती केली होती. कमल हसन यांनी हिरोची तर हिरोईनच्या भुमिकेछ अमला अक्किनेनी होत्या. अन्य प्रमुख कलाकारांचा विचार करता रमेश, फरीदा जलाल, प्रताप पोतन, लोकनाथ, पी. एल. नारायण, रम्या  आदींनी यात भुमिका केल्या होत्या   बंगळूरूमध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटात एक देखील संवाद ना...

असे अधिकारी न झालेलेच बरे

इमेज
पुणे शहरात नविन वर्षाची सुरवात झाली ती आंदोलनाने. महाराष्ट्र पोलिस दलात भावी अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन तयारी करणाऱ्या उमेदवारांनी त्यासाठी होणाऱ्या परीक्षेला बसण्यासाठी  वयोमर्यादेत वाढ करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले. या पुर्णत: चूकीच्या गोष्टीसाठी सुरू झालेल्या आंदोलकांना त्यांची योग्य जागा दाखवत राज्य सरकारने त्यांचा मागण्यांना वाटाण्याचा अक्षता दाखवल्या,जे योग्यच आहे. जाहिरात उशीरा आल्यामुळे काही जणांची वयोमर्यादा उलटून गेली आहे, असे अत्यंत हास्यापद कारण आंदोलकांनी दिले होते‌. ज्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची किमान आवश्यकता ही पदवी आहे.जी वयाच्या २१ व्या वर्षी फार फार उशीरा म्हटले तर २३ वर्षाचे झाल्यावर मिळून जाते.तीला ३०/३२ वय एव्हढे वय ही अंतीम मुदत असताना या भावी अधिकाऱ्यांना त्यात १ वर्षाची वाढ हवी होती. समजा मास्टर ड्रिग्री मिळाल्यावर त्यांनी या परीक्षेचा विचार केला तर ते २३ किंवा २५ व्या ते या परिक्षेचा अभ्यास सुरू करतील. आता हा अभ्यास सुरु केल्यावर अंतीम वयोमर्यादा होणेपर्यत जी ५ ते ७ वर्षे काही उदाहरणात तर तब्बल ९ वर्ष मिळतात. त्यात त्यांना अरे हे मला जम...

सिंहावलोकन २०२५ :,जागतिक घडामोडी

इमेज
नविन ग्रेनियर वर्ष २०२६ सुरु होण्यास आता अत्यंत कमी वेळ शिल्लक राहिला आहे.त्या अर्थाने हे दिवस सरत्या वर्षाचा आढावा घेण्याचे आहे.हा आढावा क्षेत्र निहाय घेतल्यास उत्तम ठरेल असे मला वाटल्याने मी तो क्षेत्रनिहाय घेत आहेत.या लेखात आपण जागतिक घडामोडी बघूया २०२५ हे वर्ष जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने निर्णायक ठरले. कोविडनंतरच्या पुनर्बांधणीचा टप्पा संपत असताना जगाने नव्या भू-राजकीय वास्तवाचा सामना केला. जागतिक GDP वाढ सरासरी ३ टक्क्यांच्या आसपास स्थिरावली असली, तरी अमेरिका, चीन, युरोपियन युनियन आणि भारत यांच्यातील वाढीचे दर असमान राहिले. अमेरिकेची अर्थव्यवस्था सुमारे २ टक्के वाढीसह स्थिर राहिली, तर चीनची वाढ ४.५ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान मर्यादित झाली. रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील अस्थिरता यामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम झाला. कच्च्या तेलाचे दर सरासरी ८०–९० डॉलर प्रति बॅरल दरम्यान राहिले, ज्याचा थेट परिणाम महागाईवर झाला. अनेक विकसित देशांमध्ये महागाईचा दर ३–४ टक्क्यांपर्यंत खाली आला, मात्र विकसनशील देशांसाठी अन्न व ऊर्जा किंमती अजूनही आव्...

सिंहावलोकन २०२५:,भारताचे आनंदाचे, चिंतनाचे, चिंतनाचे क्षण

इमेज
1990  पासुन पुढील ५ते ६ वर्षे ज्या २१ व्या शतकाचे गुणगाण केले जात होते‌. त्या २१ व्या वर्षाचे एक चतूर्थांसवे वर्ष म्हणुन ज्या ग्रेनीयर कॅलेंडर वर्षाचा आपण उल्लेख करु शकतो त्या २०२५ आपण लवकरच संपणार आहे.त्या अर्थाने हा सिंहावलोकनाचा काळ आहे.मागे बघून काय काय झाले याचा आढावा घेण्याचा हा कालखंड. आपल्या मानवी आयुष्याचा विचार करता कोणत्याही सिंहावलोकनासाठी    वर्ष हा कलावधी उत्तम आहे.चला तर बघुया थोड्याच दिवसात सरणाऱ्या ग्रेनीयर कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये काय काय घडामोडी घडल्या.मी हा आढावा विषयनिहाय घेणार आहे.या लेखात मी बोलणार आहे.सरत्या वर्षातील आपल्या भारताचे आनंदाचा ,  चिंतनाच्या दु ; खाच्या घटनांविषयी.  २०२५ हे वर्ष भारताच्या विकासप्रवासातील महत्त्वाचे टप्पे अधोरेखित करणारे ठरले. आर्थिक आघाडीवर भारताने सातत्यपूर्ण वाढ नोंदवली. अंदाजे ७ टक्क्यांच्या आसपास राहिलेल्या GDP वाढीमुळे भारत जगातील वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये अग्रस्थानी राहिला. एकूण GDP आकार ४ ट्रिलियन अमेरिकी डॉलरच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. उत्पादन क्षेत्रा...

सिंहावलोकन २०२५: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

इमेज
लवकरच आपण ग्रेनियन कॅलेंडर २०२५ निरोप देवून नवीन ग्रेनियन वर्ष २०२६ मध्ये प्रवेश करु.‌या नव्या वर्षात प्रगतीचे विकासाचे नविन ध्येय गाठताना आपण सरत्या वर्षात कुठे होते.हे माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी मी सरत्या २०२५या वर्षाचा क्षेत्र आणि विषयनिहाय आढावा घेत आहे.या लेखात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बघूया‌.   सार्वजनिक वाहतूक ही कोणत्याही देशासाठी अत्यंत महत्तवाची बाबा आहे देशातील सर्वच लोक खासगी वाहने घेऊ शकत नाहीत तसेच देशातील रस्त्यांचा विवचार करता हे योग्य देखील ठरत नाही भारतासारख्या देशात तर हि बाब अनेक नवीन समस्या निर्माण करते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक असणे आवश्यक आहे तसेच तीत्या त्या प्रदेशातील वाहतुकीचा भर सहन करण्यास सक्षम देखील असावी लागते    वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता त्या क्लॉनुरूप वाढ तसेचग आधुनिकता येणे आवश्यक आहे आपल्या भारतातील सार्वजनिक व्यवस्था याचा विचार करता वेगाने बदलत आहे अधिक सक्षम होत आहे सरत्या वर्षात भारतातील सार्वजनिक व्यवस्था कोणत्या प्रकारे बदलली याचा विचार करूया     भारतात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा विचार क...

सिंहावलोकन २०२५ भारत आणि जग (शेजारील देश वगळून )

इमेज
  आता नवीन वर्ष सुरु होण्यास एका आठवड्या पेक्षा कमी वेळ राहिला आहे पुढील वर्षात आपण या वर्षात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपल्या बाबत या वर्षात काय काय झाले याची उजळणी करणे आवश्यक. जी बाब वैयक्तिक आयुष्यात लागू होते,तीच बाब देशासाठी सुद्धा लागू होते.देशाची नविन वर्षात अधिक प्रगती होण्यासाठी देशाची विविध क्षेत्रातील सरत्या वर्षातील कामगिरी जवाबदार नागरिक या नात्याने आपणास माहिती असणे अत्यावश्यक चला तर जाणून घेवूया त्याविषयी.या लेखात मी भारताचे शेजारील देश वगळून अन्य देशांबरोबर भारताचे राजनैतिक संबंध कसे राहिले ?याविषयी सांगणार आहे‌? २०२५ हे वर्ष भारताच्या जागतिक सहभागासाठी महत्त्वाचे ठरले. शेजारील देश वगळता अमेरिका, युरोपियन युनियन, आफ्रिका, मध्य-पूर्व, जपान, दक्षिण कोरिया व लॅटिन अमेरिका यांच्याशी भारताचे आर्थिक, तांत्रिक आणि धोरणात्मक संबंध अधिक सुदृढ झाले. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताने स्थिर, विश्वासार्ह आणि दीर्घकालीन भागीदार म्हणून आपली प्रतिमा बळकट केली. आर्थिक आघाडीवर २०२५ मध्ये भारताचा एकूण माल व सेवा व्यापार सुमारे ८०० अब्ज अमेरिक...