हम आपके साथ हे

              सध्या आपला मराठवाडा पाण्यासाठी टाहो फोडत असताना भारताचा इशान्य भागात ब्रम्हपुत्रा नदीने अक्षरशः हाहाकार उडवला आहे . इशान्य भारतातील सर्वात मोठे आणि महत्तवाचे राज्य असणाऱ्या आसाममधील 33पैकी 30 जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे .एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या काझीरंगा अभारण्याचा 98% भाग पाण्याखाली गेला आहे . ज्यांना भारताच्या प्राकृतीक रचनेची जाण आहे , त्यांना हे पण लक्षात आले असेल की मेघालय, मिझोराम, मणीपूर नागालँड, अरुणाचल प्रदेश,त्रिपूरा या सर्व राज्यात आपणास बांगलादेशातून न जाता भारतीय हद्दीतून जायचे असल्यास आसामशिवाय तरणोपाय नाही .अरुणाचल या राज्याची तर बातच निराळी .मी या आधी सांगितलेल्या राज्यापैकी अरूणाचल  प्रदेश या राज्यात बांगला देशातून सहजतेने जाता येत नाही जर जायचे असल्यास बांगलादेशातून मणीपूर राज्यात तेथून नागालँड राज्यात तिथून मिझोराम राज्यात पहिल्यांदा जावे लागेल .तिथून मग अरुणाचल प्रदेशात जाता येईल. तर असे हे आसाम राज्य सध्या प्रचंड अस्या पूराच्या विळख्यात सापडले आहे .
           
     इशान्य भारत संपुर्ण भारताच्या अडीच टक्के भुभाग आहे . युनाटेड नेशन मार्फत भारतातील अत्यंत अतिसंवेदनशील पर्यावरणीय प्रदेश म्हणून भारतातील जे दोन प्रदेश जाहिर झाले आहेत , त्यातील एक म्हणजे इशान्य भारत .(दुसरा म्हणजे कोकण)  काही दिवसापूर्वी हा प्रदेश बांगलादेशातील घुसखोरीने अत्यंत चर्चेत आला होता . भारतातील बहुसंख्य लोकांपेक्षा वांशिक द्रुष्ट्या वेगळा असलेला हा भाग भारताच्या मुख्य भुमीहुन वेगळा पडलेला दिसतो . नेपाळ , भुतान , चीन , म्यानमार , आणि बांगलादेश याच्या कात्रीत सापडलेला हा भाग .सध्या पुरामुळे अक्षरशः वाहुन गेला आहे .गेल्या कित्येक वर्षात नव्हता इव्हढा मोठा पूर सध्या या प्रदेशात आला आहे .2004 साली आसामच्या राजधानीत पुराचे पाणी शिरले होते . आज पुन्हा त्याची पुनरावत्ती होत आहे . त्यामुळे सर्व पक्षीय , विचारसरणीचे भेद विसरुन आपण त्यांचा दुःखात सहभागी झाले पाहिजे .  तेथील  फुटीरतावाद आता कुठे शांत हॊत आहे . भारताच्या नैसर्गिक इंधनाची गरज फार मोठी आहे .आपण आपले सगळयात जास्त परकीय चलन जी वस्तू आयात करण्यात खर्च करत असू तर ते नैसर्गिक  इंधन आहे. आपण अत्यंत कमी प्रमाणात त्याचे उत्पादन देशांतर्गत घेतो . आणि या देशांर्गत उत्पादनात फार मोठा  वाटा  हा आसाम  मधील तेल उत्पादक  विहिरींचा आहे .  हे विसरुंन चालणार नाही .   त्यामुळे ईशान्य भारतातील लोकांसाठी म्हणावेसे वाटते दिस आपदामे दरीये मत , हम आपके साथ हे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?