जागतिक स्किझोफेनिया दिन!
स्किझोफेनिया ..... गंभीर अशा मानसिक रोग. जगभरात या गंभीर आजाराचे सुमारे 1% रोग आहेत . रोग्याबरोबर त्याच्या जवळच्या व्यक्तींच्या आयुष्य मातीमोल करणाऱ्या या आजाराबाबत जनजागृती करण्यात येणारा म्हणजे दिवस जागतिक स्किझोफेनिया दिन! जो 24 मे ला असतो , त्याबद्दल हा लेख वाचणाऱ्या सर्वांना त्यांचे मनःस्वाथ निरोगी राहावे त्यांना भावनांचा कोंडमारा ना होवो यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा .तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या कोणालाही काही मानसिक व्याधी स्पर्श करू नये जर दुर्दैवाने जर तुम्हला एखादी मानसिक व्याधी झालीच तर तुम्ही त्यातून लवकरात लवकर फारसे नुकसान न होता बाहेर पडो , हि ईश्वरचरणी प्रार्थना .
अत्यंत गंभीर अश्या या मानसिक आजाराबाबत आपल्या भारतात पुरेसी जनजागृती नाही. मराठीतील देवराई या चित्रपटाचा अपवाद सोडता मराठीमध्ये या विषयावर फारसे चित्रपट झालेले नाहीत . हिंदीतही हेच चित्र आहे . आपल्या शरिरात मेंदूच्या डाव्या बाजूला डेपोमलिन नावाचा एक अंतस्त्राव होतो. त्याचे प्रमाण वाढल्यास सदर आजार होता. (आणि कमी झाल्यास पार्किसन हा आजार होतो ) आजारात पुर्णत: बरे होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे सदर आजार व्यक्तिचे संपूर्ण आयूष्य बदलून टाकतो .हा आजार ज्या व्यक्तिला होतो त्याचा काम करण्याचा जाणिवा नाहिस्या होतात ती पुर्णत: परावलंबी बनते
भारतात हा आजार असल्यांचे प्रमाण सूमारे 1% आहे. हा आजार काही प्रमानात अनूवंशिक असतो. हा आजार बहूतांश वेळेला अधिक बूध्दिमान असलेल्या लोकांत आढळतो. नोबेल विजेते गणिततज्ञ ज्यांचा जीवन संघर्षावर चित्रपट आलेला आहे असे जॉन नॅश हे अस्या बुध्दीमतांपैकी एक . त्यांचा जीवनावरील ऑस्कर विजेता चित्रपट ब्लूटिूफुल माइंड आपले अनेक ग्रह दुर करतो (जॉन यांना ऐन तारूण्यात या आजाराने ग्रासले मात्र त्यावर यशस्वी मात केली आणि गणितातील एक अवघड अश्या गेम थेअरीवर संशोधन करून गणिताचे नोबेल मिळवले) मूळचा इंगजी भाषेतील या चित्रपटाचा हिंदी अनूवाद युटयूबवर उपल्ब आहे याबाबत अधिक जाणू इच्छिणारे तो व्हिडीओ बघू शकतात
टिप्पण्या