एका पिढीचा कालखंड सरून देखील समस्या त्याच
कविवर्य कुसुमाग्रज यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल १९९७ साली सकाळच्या दिवाळी अंकासाठी फटका या काव्यप्रकारातील कविता लिहली होती .ज्याची मध्यवर्ती कल्पना स्वातंत्र्यदेवता भारतीयांना अरे बाबानो स्वातंत्र्य मिळून आता ५० वर्षे झाली आहेत आता तरी या समस्या कायमच्या सोडवा असे सांगत आहे ही होती. 'स्वातंत्र्यदेवतेची विनवणी ' असे शीर्षक असलेल्या या सुप्रसिद्ध कवितेला पहिल्यांदा प्रसिद्ध होऊन आता लवकरच ३० वर्षे अर्थात एका पिढीचा कालखंड पूर्ण होईल तर ज्या घटनेचा संदर्भ घेत हि कविता लिहण्यात आली होती. त्याला ३० वे वर्ष येत्या शनिवारी जेव्हा आपण ८० व स्वातंत्र्यदिन साजरा करत असू तेव्हाच पूर्ण होईल या ३० वर्षात आपण यात सांगितलेल्या कोणत्या उणिवांवर मात केली .कोणत्या समस्या तेव्हा होत्या त्याच स्थितीत आहेत .कोणत्या समस्या पूर्ण सुटल्या नसल्या तरी त्यात बऱ्यापैकी मात केली आहे तसेच कोणत्या समस्या गेल्या ३० वर्षत अजूनच चिघळला आहेत याचा आढावा घेतला तर समोर येणारे चित्र फार अनुकूल म्हणता येण्यासारखे नाही . असे दुःखाने म्हणावे लागतेय या कवित...