पोस्ट्स

इस्रोच्या मानाच्या शिरपेचात अजून एक तूरा

इमेज
     इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रो दिवसोंदिवस जगाचा अधिकाधिक विश्वास संपादन करत आहे.२०२३ची जगातील सर्वोत्तम अंतराळ संशोधन संस्था म्हणून पुरस्कार मिळाल्यानंतर, तर त्यात झपाट्याने वाढच होताना दिसत आहे.  त्यामुळेच ५ डिसेंबर रोजी युरोपीय स्पेस एजन्सीच्या महत्तकांक्षी प्रोब ३चे प्रक्षेपण करण्याची  संधी इस्रोला मिळाली.जिचे सोने करत इस्रोने प्रोब३ चे यशस्वी प्रक्षेपण करत, आपली गुणवत्ता सिद्ध केली, आणि स्वत:च्या शिरपेचात मानाचा तूरा देखील रोवला. त्याबद्दल इस्रोच्या सर्व संशोधकांचे करावे तितके कौतूक कमीच आहे.इस्रोने या आधी दुसऱ्या संस्था,देश यांचे उपग्रह स्वत:च्या उपग्रह प्रक्षेपण यानातून प्रक्षेपित केलेले असले तरी आताचे आव्हान मोठे होते.प्रोब ३या मोहिमेत दोन उपग्रह हाकेच्या अंतरावर प्रक्षेपित करायचे होते.यामध्ये अत्यंत कमी काही मिलमिटरचा देखील फरक पडला असता तर मोहिम अयशस्वी ठरली असती‌,आणि कोट्यावधीचा खर्च वाया गेला असता,इस्रोच्या अभियंतांनी हे आव्हान स्विकारले आणि खरे करुन दाखवले सुद्धा.  इस्रोमार्फत अत्यंत कमी खर्चात अंतराळ म...

प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक,'सायबर अटॅक'

इमेज
सध्याचे जग सातत्याने विकसीत होणाऱ्या तंत्रज्ञानाचे आहे,हे कोणीही  नाकारू शकत नाही. कोव्हिड १९ च्या साथरोगानंतर तर आपल्या आयुष्यातील त्याचा वापर अजुनच वाढलेला आहे, आणि आर्टिफिशियल इंटेलिजियन्स क्षेत्रातील प्रगतीमुळे तो अधिकाधीक वाढतच जाणार आहे,हे सुद्धा नाकारता येणे अशक्य.त्यामुळे तंत्रज्ञान स्नेही असणे सध्याचा काळात अत्यंत आवश्यक आहे.जर आपण काळानुरुप बदललो नाही तर  कोडॉक, नोकिया या एकेकाळच्या डॉन  म्हणता येईल, मात्र आज अस्तिवासाठी  लढणाऱ्या कंपन्यासारखे नष्ट होवू          तंत्रज्ञानाचाच फायदा घेत त्यात पारंगत होण्याचा विचार केला असता,आपली फसगत होण्याचा धोका देखील मोठा प्रमाणात आहे. ऑफलाईन जगात ज्याप्रमाणे चांगले लोक  आहेत वाईट लोक आहेत.तोच प्रकार ऑनलाईन जगात आहे. ऑफलाईन जगात व्यक्ती समोर असल्याने त्याचा देहबोलीतून आपण सदर व्यक्ती चांगली की वाइट हे ओळखु शकतो‌.मात्र तंत्रज्ञानाचा जगात ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणारी व्यक्ती समोर नसल्याने, सदर व्यक्ती चांगल्या हेतूने संवाद साधत आहे की, त्याचे हेतू वाइट आहे.हे समजत नाही. सध्या गाजत...

,कोरोना पश्च्यातील चीन उलगडणारे पुस्तक, 'चीन, रंग आणि ढंग',

इमेज
           गेल्या दोन तीन वर्षापासून मराठीत विविध विषयांवर   माहितीपुर्ण पुस्तके येत आहेत . पुर्वी या विषयांवर मराठीत अभ्यासपुर्ण पुस्तक येणे शक्यच नाही असे वाटे , त्या विषयांवर देखील माहितीपुर्ण पुस्तके येत आहेत . जे अत्यंत उत्तमतेचे लक्षण म्हणता येईल . सातत्याने वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानासह , भारताच्या   परराष्ट्र धोरणावर परीणाम करणाऱ्या चीन सारख्या देशांवर देखील आता मोठ्या संख्येने पुस्तके निघत आहेत . याच मराठी पुस्तकांमध्ये समावेश होवू शकेल असे एक पुस्तक , मी नूकतेच वाचले .' चीन , रंग आणि ढंग ',  या ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि डॉ . अनंत पा . लाभसेटवार यांनी लिहलेल्या या पुस्तकात कोव्हिड नंतरच्या जगात चीनचे आर्थिक , राजकीय , आणि लष्करी स्थान काय असेल . याबाबत माहिती मिळते .        सुमारे पावणेतीनशे पानाचे हे पुस्तक , चीनचे नेतृत्व , राजकारण , अर्थकारण , करोनाचे हत्याकांड या चार भागात विभागले आहे . प्रत्येक भा...

रंगणार भारत आणि चीनचे युद्ध ६४ घराच्या पटावरं

इमेज
             येत्या मंगळवार २६ तारखेपासून भारत आणि चीन यामध्ये एक युद्ध रंगणार आहे मात्र घाबरायचे काहीच कारण नाही . कारण हे युद्ध प्रत्यक्ष युद्धभूमीवर रंगणार नाहीये या युद्धात काहीही जीवित आणि आर्थिक हानी होणार नाहीये .  हे युद्ध रंगेल सिंगापूर येथील  पूर्णतः वातानुकूलित अश्या हॉल मध्ये . या युद्धात भारताकडून प्रतिनिनित्व करतील चेन्न्नईचे भूमिपुत्र ग्रँडमास्टर डी गुकेश तर चीनकडून ग्रँडमास्टर डिंग लिरेन हे प्रतिनिधींच्या करतील हे युद्ध रंगेल बुद्धिबळाच्या ६४ स्केअरच्या पटावर. हत्ती, घोडा उंट वजीर या पारंपरिक सैन्याच्या आधारे हे युद्ध खेळले जाईल. या युद्धातील विजेता बुद्धिबळाचा विश्वजिजेता म्हणून ओळखला जाईल. बुद्धिबळ कॅन्डीडेट २०२४ स्पर्धा चेन्नईचे ग्रँडमास्टर डी. गुकेश यांनी जिंकल्यामुळे,हे युद्ध खेळवण्यात येईल .               बुद्धिबळाचे पारंपरिक पद्धतीचे अर्थात बुद्धिबळपटूच्या भाषेत क्लासीकल पद्धतीचे एकूण १४ डाव या युद्धात खेळवण्यात येतील २६ तारखेपासून दररोज एक सामना खेळवण्यात येईल ..३ सामने झाल्यावर एक द...

मधाबरोबर लेमन टी चा आस्वाद घेयचा असेलं तर हक्काचे एकमेव ठिकाण....ग्रॅज्युएट चहा...!

इमेज
चहा...आपण सर्वजण दिवसातून एकदा तरी पिणारे पेयं! दिवसाची प्रसन्न सुरवात करणाऱ्या या पेयाची मानवी जीवनातील गरज ओळखुन पहिल्यांदा पुणे या शहरात आणि पुढे सर्व महाराष्ट्रभर चहा विक्रीची दुकाने उभी राहिली.ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे मग या दुकानदारांनी अंमलात आणण्यासाठी त्यांनी सुरु केले.कोणी साखर आणि दुध यांचे प्रमाण जास्त करुन सणावाराला करण्यात येणाऱ्या बासुंदी या या खाद्यपदार्थात चहाची पावडर टाकून तर चहा पित नाहीना असे वाटावा असा चहा सुरू केला. तर इतर कोणी अन्य असेच फंडे वापरण्यास सुरवात केली‌. मात्र यात ग्राहक लक्षात न घेता स्वहिताला अधिक प्राधान्य देण्यात आल्याचे  ग्राहकांच्या अट्टल चहाप्रेमींच्या लगेच लक्षात आले, आणि हे फंडे लगेच  मागे देखील पडले. मात्र कोळश्याचा खाणीतच हिरा सापडतो. त्याप्रमाणे या स्वहिताचा जास्त विचार करणाऱ्या,या गल्लाभिरु चहाच्या दुकानात एक खरा ग्राहकप्रेमी ,स्वहितापेक्षा ग्राहकांच्या हिताला अधिक महत्त्व देणारा एक चहाविक्रेता,   ग्राहकांचा हिताचा आरोग्यचा विचार करत तयार केलेल्या आपल्या वैशिष्टपुर्ण चवीचा चहा ग्राहकांना देत...

रियल चक दे इंडिया..!

इमेज
   शाहरुख खान यांनी अभिनय केलेला 'चक दे इंडिया', हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा क्रीडा चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात भारतीय महिला हॉकी संघाने मिळवलेल्या एका काल्पनिक विजयाची कथा मांडण्यात आली आहे.सध्या बिहारमध्ये सुरु असलेल्या  महिला आशियाई हॉकी  चॅम्पियनशिप भारतीय महिला संघ मिळवत असलेल्या यशामुळे ती रिल कथा रियल झाली असे म्हणता येण्यासारखी स्थिती आहे.साखळी पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी होत असून हा मजकुर लिहण्यापर्यत खेळवण्यात आलेल्या ५सामन्यात भारताने सर्वच्या सर्व पाच सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या आणि फार मोठ्या फरकाने धुळ चारली आहे मलेशिया विरुद्ध ४-० दक्षिण कोरिया  ३-२ ,थायलंड १३-० ,चीन ३-०, तर जपान विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात३-०या फरकाने आपण सामने जिंकल्याने अंतीम फेरीत आपले स्थान निश्चित झाले आहे.     आपल्याकडे सध्या निवडणुका सुरू असल्याने या गोष्टीला खूपच कमी जवळपास नाहीच म्हणता येईल अशी प्रसिध्दी देण्यात आली आहे. मात्र ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत महत्तवाची आहे. एकेक...

महाराष्ट्रातील सांस्कृतिक देवाघेवाण स्पष्ट करणारा दिवाळी अंक 'भवताल'

इमेज
आपल्या महाराष्ट्राला मोठा समृध्द सांस्कृतिक वारसा मिळाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध होणारे आणि बौद्धीक फराळ म्हणून सर्वांना परिचीत असलेले 'दिवाळी अंक' हे या समृध्द सांस्कृतिक परंपरेतील एक महत्तवाचा घटक, ज्याला शतकोत्तर वर्षाची समृध्द परंपरा आहे. आज विविध विषयावर दिवाळी अंक निघत आहेत.कोव्हिड साथरोगामुळे मंदावलेल्या अर्थकारणामुळे ते दोन वर्ष दिवाळी अंकाची परंपरा रोडावली असली तरी ते दोन वर्ष सोडल्यास पुन्हा एकदा ही परंपरा मोठ्या जोमाने पुन्हा एकदा सुरु झाली आहे 2024 या वर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे अनेक विषयावर  दिवाळी अंक निघाले आहेत.त्यापैकी एक उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून प्रसिद्ध असलेला 'भवताल' हा दिवाळी अंक मी नुकताच वाचला.           नेहमीप्रमाणे भवतालचा हा अंक देखील संग्रही ठेवावा,असाच झाला आहे.प्रत्येकवेळी एक पर्यावरणाशी संबंधीत संकल्पना घेवून, त्यावर आधारीत सुमारे 150 पानाचा अंक काढणारे,  लोकसत्ताचे माजी वरीष्ठ उपसंपादक अभिजित घोरपडे यांची यावेळची संकल्पना देखील अनोखी आहे. महाराष्ट्रातील 'सांस्कृतिक देवाणघेवाण' या पर्यावरणाच्या वि...