मधाबरोबर लेमन टी चा आस्वाद घेयचा असेलं तर हक्काचे एकमेव ठिकाण....ग्रॅज्युएट चहा...!
चहा...आपण सर्वजण दिवसातून एकदा तरी पिणारे पेयं! दिवसाची प्रसन्न सुरवात करणाऱ्या या पेयाची मानवी जीवनातील गरज ओळखुन पहिल्यांदा पुणे या शहरात आणि पुढे सर्व महाराष्ट्रभर चहा विक्रीची दुकाने उभी राहिली.ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे मग या दुकानदारांनी अंमलात आणण्यासाठी त्यांनी सुरु केले.कोणी साखर आणि दुध यांचे प्रमाण जास्त करुन सणावाराला करण्यात येणाऱ्या बासुंदी या या खाद्यपदार्थात चहाची पावडर टाकून तर चहा पित नाहीना असे वाटावा असा चहा सुरू केला. तर इतर कोणी अन्य असेच फंडे वापरण्यास सुरवात केली. मात्र यात ग्राहक लक्षात न घेता स्वहिताला अधिक प्राधान्य देण्यात आल्याचे ग्राहकांच्या अट्टल चहाप्रेमींच्या लगेच लक्षात आले, आणि हे फंडे लगेच मागे देखील पडले. मात्र कोळश्याचा खाणीतच हिरा सापडतो. त्याप्रमाणे या स्वहिताचा जास्त विचार करणाऱ्या,या गल्लाभिरु चहाच्या दुकानात एक खरा ग्राहकप्रेमी ,स्वहितापेक्षा ग्राहकांच्या हिताला अधिक महत्त्व देणारा एक चहाविक्रेता, ग्राहकांचा हिताचा आरोग्यचा विचार करत तयार केलेल्या आपल्या वैशिष्टपुर्ण चवीचा चहा ग्राहकांना देत आपली वाटचाल करत आहे.नाशिकच्या अशोक स्तंभ परीसरात चहाचे खऱ्या अर्थाने अमृततुल्य असणाऱ्या ग्रॅज्युएट अमृततुल्यचा संचालिका निकिताताई बच्छाव युवा उद्योजिका हे त्यांचे नाव.
आपल्या ग्रॅज्युएट चहा या अमृततुल्याचा मदतीने श्रीमती निकीताताई बच्छाव ग्राहकांची सेवा करत असतात.ग्रॅज्युएट चहाची अनेक वैशिष्टे सांगता येतील, त्यातील दोन महत्तवाची वैशिष्ठे म्हणजे, 'मधाबरोबर लेमन टी'आणि खऱ्या सेंद्रिय गुळाचा वापर करत केलेला वापर.अन्य ठिकाणी कृत्रिम गुळाचा वापर करत विषयुक्त चहा पाजला जात असताना, ग्रॅज्युएट चहामध्ये खरा गूळ वापरला जातो हा गूळ देखील सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला असतो. इतर कोणीही देत नसलेली ही सेवा ग्रॅज्युएट चहाचे एक प्रमुख वैशिष्ठे. या खेरीज कायम ग्राहकांचे स्वागत करण्याचा सहजभाव,स्वच्छ भांडी कप अमृतल्याची संपूर्ण स्वच्छता,तत्पर सेवा, ऑर्डर दिल्यावर लगेच मिळणारी चहाची सेवा ही अजून ग्रॅज्युएट चहाची काही वैशिष्ट्ये सांगतात येतील.
युवा उद्योजक असलेल्या श्रीमती निकिताताई बच्छाव यांनी सध्याचा काळात नोकरीसाठी युवा वर्ग ठिकठिकाणी धडपडत असताना,नोकरीसाठी कुठेही उंबरे न झिजवता, आणि चहाचा उद्योगात आधीच अनेकांनी उडी मारली असताना ग्राहकांना उत्तम सेवा दिल्यास यशस्वी होता येते.आणि काही जणांना रोजगार देखील देता येतो,हे दाखवून दिले आहे. निकिताताईंनी श्रीरामपूर येथील ग्रॅज्युएट चहाची एजन्सी घेवून युवावर्गासमोर
टिप्पण्या