पोस्ट्स

काश्मिरी पंडितांची सखोल माहिती देणारे पुस्तक,' काश्मीर आणि काश्मिरी पंडित'

इमेज
काश्मिरी पंडित भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा अत्यंत महत्त्वाचा विषय, त्यांचे काश्मीर खोऱ्यातील विस्थापन आणि आणि पुन्हा स्थापनेचे प्रयत्न याविषयी अनेक माध्यमात अनेक व्यक्तींकडून वारंवार बोलण्यात आलेले आहे. मात्र तरी देखील वारंवार चर्चा होणारा विषय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी काश्मीरमधून 370 कलम हटवल्यावर तर या विषयावर सातत्याने  चर्चा होऊ लागल्या. या चर्चांमध्ये मांडण्यात आलेले मुद्दे योग्य पद्धतीने समजण्यासाठी आपल्याला सर्व विषय काही प्रमाणात माहिती असणे आवश्यक. शिक्षण तज्ञांच्या मते कोणताही विषय मातृभाषेत समजल्यास अधिक उत्तम ठरते.  आपल्या मराठी भाषिकांच्या सुदैवाने  नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव सुद्धा नसलेल्या घोटी  या गावातील मधुश्री प्रकाशन आपली ही अडचण दूर करते. मधुश्री प्रकाशनाच्यातर्फे कश्मीर अँड कश्मीरी पंडित  या  मूळच्या इंग्रजी भाषेतील   पुस्तकाचा मराठीत अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला आहे या अनुवादित पुस्तकांमळे आपणास काश्मिरी पंडित हा विषय सहजतेने आणि सखोलतेने समजतो. नाशिक मधील महत्वाची सांस्कृतिक संस्था असलेल्या सावनाच्...

चरित्र भारताच्या अद्वितीय पंतप्रधानांचे ,नरसिंहालोकन'

इमेज
            पी व्ही. नरसिंहराव.  स्वातंत्र्योत्तर भारताचा वाटचालीचा आढावा आपण जर पंतप्रधानानुसार घेण्याचे ठरवल्यास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे नाव . स्वतः पंतप्रधान होण्याच्या आधीचे सरकार बहुमत नसल्यामुळे कोसळले  असताना, स्वतःचे अल्पमतातील सरकार देशावर मोठ्या  प्रमाणात बदल होतील  असा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आधीपेक्षा पूर्णतः विरुद्ध  निर्णय  घेऊन तो अमलात आणणे तसेच देशातील धार्मिक विद्वेष कडेलोटाच्या स्थितीवर जाऊन पोहोचला असताना ती स्थिती नियंत्रणात आणणे य सारखे  महत्वाचे निर्णय घेत   पूर्ण  पाच चालवण्याचा भीम पराक्रम करणारे पंप्रधान म्हणून आज आपण त्यांना ओळखतो . पी व्ही नरसिंहराव हे काँग्रेसचे नेहरू गांधी परिवार सोडून झालेले पहिले पंतप्रधान होय.त्य्नाच्याच कार्यकाळात आपण मुक्त अर्थव्यवसंस्थेचे धोरण स्वीकारले. भारताच्या इतिहासातील काळा अध्याय असलेला बाबरी मशिदीचे पडणे मुबंईत बॉम्बस्फोट होणे या घटना देखील त्यांच्याच कार्यकाळातील इतकी सारी आव्हाने असताना त्यांना स्वतःच्या काँग्रेस पक्षातील नेत्याच्या प...

२०२५ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

इमेज
   अंधाऱ्या    रात्री   आपण    आकाशाकडे   नजर   टाकल्यास   आपणास   आकाशाचे   नयनरम्य   विलोभनीय   दर्शन   होते  .  ज्याचे   आपल्या    सर्वांनाच   प्रचंड   आकर्षण   असते     आपण   आकाशाचे   निरीक्षण   करत   असताना   जर   एखादा   खगोलीय   अविष्कार   आकाशात   दिसत   असेल   तर   मग   सोन्याहून   पिवळे  .  या   २०२५   वर्षात   सुद्धा   अश्या   काही   घटना   आहेत   ज्यावेळी   आकाशाचे   दर्शन   करणे   अत्यंत   ऊत्तम   आहे  .  चला   तर   जाणून   घेउया   या   विषयी  .   या   खगोलीयघटनांचे   आपण   सूर्यग्रहण  ,  चंद्रग्रहण  ,  उल्का   वर्षाव  .,  धूमकेतूचे   दर्शन  ,   सूर्यमालिकेतील   ग्रहांचे ...

प्राचीन युगातील महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक, 'मुस्लिमपुर्व महाराष्ट्र'

इमेज
आपल्या महाराष्ट्र शैक्षणिक बोर्डामार्फत विविध इयत्तांमध्ये  कोणता इतिहास शिकवला जातो एक नजर टाकली तर एक गोष्ट आपणास चटकन आढळून येते ती म्हणजे नर्मदेच्या उत्तरेकडील भागातील इतिहासाचे अधिकचे प्रमाण. उतर भारताचा इतिहास शिकवताना देखील मध्ययुगीन इतिहास अधिक प्रमाणात असतो.त्यामुळे आपण जिथे रहातो त्या महाराष्ट्राचा त्यातही प्राचीन युगाबाबत आपणे काहीसे अनभिज्ञ राहतो. याबाबत माहिती करुन घेण्यासाठी शालेय पुस्तकाच्या बाहेरच्या पुस्तकांचा आपणास आधार घ्यावा लागतो. या अवांतर पुस्तकांमधील महत्त्वाची माहितीपुर्ण पुस्तके म्हणून दैनिक केसरीचे १९३० ते १९४० या दरम्यान ८वर्षे संपादक असलेल्या वासुदेव कृष्ण भावे यांनी लिहलेल्या महाराष्ट्राचा इतिहासावरील पुस्तकांचा समावेश करावाच लागेल. भावे यांनी मुस्लिम आक्रमणपुर्व कालखंडातील महाराष्ट्रावर दोन खंडात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळच्या महाराष्ट्रावर आणि पेशवेकालीन महाराष्ट्रावर प्रत्येकी एका खंडात  पुस्तके लिहली आहेत‌. त्यातील पेशवेकालीन महाराष्ट्रावरील पुस्तक आणि मुस्लिम आक्रमकांच्या आधीच्या महाराष्ट्रावरील पुस्तके  मी नुकतेच वाचली....

भारतीय बुद्धिबळ क्षेत्राची वर्षाखेर गोड!

इमेज
  बुद्धिबळ प्रौढ पुरुष गटात क्लासिकल (पारंपारीक) पद्धतीने खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत सर्वात कमी वयात विश्वविजेतेपद मिळवण्याचा भीम पराक्रम ग्रँड मास्टर डी.गुकेश यांनी करून काहीच दिवस होत नाही. तोच भारतीय बुद्धिबळप्रेमींना आनंद देणारी अजून एक बातमी २९डिसेंबर रोजी येवून धडकल्याने, भारतीयांना अक्षरश:आकाश‌ ठेंगणे झाले.‌भारतीय प्रमाणवेळेनुसार २७ते २९ डिसेंबर या दरम्यान रात्री साडेबारा ते पहाटे चार या वेळात न्युयॉर्क येथे खेळवण्यात (न्युयॉर्कच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार २६ते २८डिसेंबर दुपारी अडीच वाजता )आलेल्या जागतिक  प्रौढ रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा महिला गटात भारताची क्रमांक एकची खेळाडू ग्रँडमास्टर कोनेरु हंपी यांनी विजेतेपद मिळवत रॅपिडचे विश्वविजेतेपद पटकावल्याची,हीच ही बातमी.   तूम्हाला हे वाचून प्रश्न पडला असेल हे काय? गुकेश तर आताच विश्वविजेता झाला आता हे काय ? नविन.तर सांगतो जागतिक स्तरावर बुद्धिबळ स्पर्धा गटात खेळवण्यात येतात या गटाचे वयानुसार ३गट पडतात .12 वर्षाखालील खेळाडू ज्या गटात खेळतात त्यास सब ज्युनियर गट म्हणतात. खेळाडु 12 वर्षापेक्षा मोठा मात्र 19 वर्षा...

सिंहावलोकन,२०२४ :भारत आणि जागतिक परिषदा

इमेज
      नविन वर्ष २०२५सुरु होण्यास आता अत्यंत मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. नविन वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना सरत्या वर्षात आपली काय कय मिळवले, काय काय गमावले याचा आढावा घेतल्यास नविन वर्षात या वर्षात केलेल्या चूका आपण टाळू शकतो‌ जो न्याय वैयक्तिक स्तरावर लागू होतो तोच न्याय मोठ्या स्तरावर विचार केल्यास आपल्या भारत देशाला देखील लागू होतो.देशाचे जवाबदार नागरिक म्हणून आपणास या बाबी माहिती असणे आवश्यक आहे.चला तर जाणून घेवू भारताचा जागतिक परीषदांमधील सहभाग कोणत्या प्रकारचा राहिला.       या वर्षी  भारत प्रामुख्याने वार्षिक भारत -रशिया समिट ,आशियान समिट, ब्रिक्स समिट शांघाय को ऑपरेशन समिट, क्वाड समिट ,इंडो आशियान समिट, इंडो जी.सी.सी समिट, यु.एन.जी.ए., कॉप २९ या प्रमुख परिषदांमध्ये सहभागी झाला. या वर्षी जूलै महिन्यात २२वी भारत रशिया वार्षिक परीषद रशियाची राजधानी मास्कोला झाली.या परीषदेत पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांच्यात विविध द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली.द्विपक्षीय मुद्यांमध्ये संरक्षण, ...

सिंहावलोकन भारत आणि जग (शेजारील देश वगळून )

इमेज
आता नवीन वर्ष सुरु होण्यास एका आठवड्या पेक्षा कमी वेळ राहिला आहे पुढील वर्षात आपण या वर्षात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपल्या बाबत या वर्षात काय काय झाले याची उजळणी करणे आवश्यक. जी बाब वैयक्तिक आयुष्यात लागू होते,तीच बाब देशासाठी सुद्धा लागू होते.देशाची नविन वर्षात अधिक प्रगती होण्यासाठी देशाची विविध क्षेत्रातील सरत्या वर्षातील कामगिरी जवाबदार नागरिक या नात्याने आपणास माहिती असणे अत्यावश्यक चला तर जाणून घेवूया त्याविषयी.या लेखात मी भारताचे शेजारील देश वगळून अन्य देशांबरोबर भारताचे राजनैतिक संबंध कसे राहिले ?याविषयी सांगणार आहे‌?         तर मित्रांनो, शेजारील देश वगळता अन्य जगाचा विचार करता पश्चिम आशियातील देश हा एक महत्तवाचा घटक आहे.या देशातील कतार या देशाबरोबरचे संबंधात मधूरता आली वर्षाची अखेर होताना, कुवेत देशाकडून  त्यांचा सर्वोच्च नागरी, ' विसम मुबारक अल कबीर' हा पुरस्कार मोदींना देण्यात आला. आखाती देशांनी व्यापारवृढीसाठी गल्फ कंट्री कार्पोरेशन  या नावाने संस्था स्थापन केली आहे.जीला संक्षिप्त स्वरूपात जी.सी.सी. म्हणतात.या जी.सी...