सिंहावलोकन भारत आणि जग (शेजारील देश वगळून )
आता नवीन वर्ष सुरु होण्यास एका आठवड्या पेक्षा कमी वेळ राहिला आहे पुढील वर्षात आपण या वर्षात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपल्या बाबत या वर्षात काय काय झाले याची उजळणी करणे आवश्यक. जी बाब वैयक्तिक आयुष्यात लागू होते,तीच बाब देशासाठी सुद्धा लागू होते.देशाची नविन वर्षात अधिक प्रगती होण्यासाठी देशाची विविध क्षेत्रातील सरत्या वर्षातील कामगिरी जवाबदार नागरिक या नात्याने आपणास माहिती असणे अत्यावश्यक चला तर जाणून घेवूया त्याविषयी.या लेखात मी भारताचे शेजारील देश वगळून अन्य देशांबरोबर भारताचे राजनैतिक संबंध कसे राहिले ?याविषयी सांगणार आहे?
तर मित्रांनो, शेजारील देश वगळता अन्य जगाचा विचार करता पश्चिम आशियातील देश हा एक महत्तवाचा घटक आहे.या देशातील कतार या देशाबरोबरचे संबंधात मधूरता आली वर्षाची अखेर होताना, कुवेत देशाकडून त्यांचा सर्वोच्च नागरी, ' विसम मुबारक अल कबीर' हा पुरस्कार मोदींना देण्यात आला. आखाती देशांनी व्यापारवृढीसाठी गल्फ कंट्री कार्पोरेशन या नावाने संस्था स्थापन केली आहे.जीला संक्षिप्त स्वरूपात जी.सी.सी. म्हणतात.या जी.सी.सीशी भारताचे संबंध अतिशय व्यापक आहेत आपले परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर हे दुसऱ्या इंडो जी.सी.सी बैठकीसठी रियाधला गेले. भारताकडून अफगाणिस्तानला होणारा अन्न आणि औषध पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी इराणबरोबर करार करण्यात आले तसेच रशियातून कॉककस पर्वतांचा अडथळा पार करत तूर्किये इराक या देशांच्या मार्गे एक रेल्वेगाडी या वर्षी एक इराणचा चाबहार बंदरात आली.पुढे या बंदरातून माल घेवून एक जहाज मुंबईत सुद्धा आले.
या वर्षी दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील आणि अर्जेटिंना या देशांबरोबर भारतात जॉईंट कमिशन मीटिंगचे भारतात आयोजन करण्यात येते.कोणत्याही दोन देशांचा राजनैतिक संबंधात कमिशन मीटिंगचे अनन्य साधारण महत्व आहे. भारताच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचा अभ्यास करता भारताच्या पुर्णत: पलिकडे असणाऱ्या दक्षिण अमेरिका खंडातील देशांबरोबर कमी संबंध आल्याचे दिसते.यात सुधारणा करण्याचे प्रयत्न यावेळी भारताकडून करण्यात आला.
उत्तर अमेरिका खंडाचा विचार करता, यातील कॅनडा देशबरोबरखलिस्तान दहशतवाद्याची हत्या या विषयावरुन आपले संबंध तणावाचे राहिले. अमेरिकेन अध्यक्षपदाच्या निवडणूकीत भारतीय वंशाचे नागरिक आणि हिंदू धर्म हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला येत्या जानेवारीत सत्ता सांभाळणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाच्या अनेक नागरिकांना संधी दिली आहे.
आफ्रिका खंडाचा विचार करता मध्य आफ्रिकेतील देशांना विविध कारणास्तव भारताने याही वर्षी भरीव मदत केली.युरोप खंडाचा विचार करता, पश्चिमी युरोपीय देशांबरोबर आणि पुर्व युरोपीय देशांबरोबर भारताचे संबंध उत्तम राहिले .
भारताचा पुर्वेकडील बंगालचा उपसागरापासुन ऑस्ट्रेलियाच्या पुर्व किनाऱ्याच्याच्या बाजूने अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया,पोर्टलँड न्यु मेस्किको या राज्यांचा किनारपट्टीचा विचार करता होणाऱ्या मोठ्या भुभागाला इंडो पॅसिफिक म्हणतात.जागतिक राजकारणात हा प्रदेश आता अत्यंत महत्तवाचा आहे.यापुढील आंतरराष्ट्रीय राजकारण या प्रदेशाभोवती केद्रीत होईल असे बोलले जाते.या प्रदेशातील महत्तवाचे देश असलेल्या जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांबरोबर भारताचे संबंध अधिक मधूर झाले. आपले परराष्ट्रमंत्र्यांनी क्वाड या देशाचा तसेच सिंगापूर थायलंड या दोन देशांचा यशस्वी दौरा केला आपल्या राष्ट्रपती यांनी याच भागातील पपुआ न्यु गिनी , न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशाचा दौरा केला या प्रकारचा दौरा करणाऱ्या त्या भारताचा पहिल्याच राष्ट्रपती होत्या.
एकंदरीत भारतासाठी हे वर्ष वादळीच ठरले
टिप्पण्या