पोस्ट्स

कोण बघतो कश्यासाठी चित्रपट

इमेज
कोण मेले कोणासाठी रक्त ओकुन ? " या पक्तींचे एक अजरामर मराठी  गाणे आहे त्याच धर्तीवर कोण बघतो कशासाठी चिञपट ?असे म्हणावे अशा किशा  नुकताच माझ्या मिञांचा कट्ट्यावर घडला    तर त्याचे असे झाले की कट्ट्यावर खुप दिवसात चिञपट बघीतला नसल्याने सर्व जण मिळून चिञपटाला जाण्याचे ठरले मग कोणता चिञपट बघायला जायचे यावर चर्चा सुरु झाली माझ्या एका मिञाने थोडा गंभीर विषयावर असणाऱ्या चिञपटाला जावू असे सुचवले यावर दुसरऱ्या एका मिञाने आपण आधीच समस्येने ञासलो असताना परत टेशंन वाढवणाऱ्या गोष्टी का करायचा अशा मुद्दा मांडला त्यापेक्षा गमतीदार विषयाचा चिञपट बघण्याला प्राधान्य देणे महत्ववाचे असल्याचे सांगीतले तुम्हाला काय वाटते ?  धर्तीवर    चिञपट कोणत्या कारणासाठी बघायचे फक्त निव्वळ करमणूकीसाठी की ज्ञानवर्धक करमणूकीसाठी ? या माध्यमाचा समाजावर प्रचंड प्रमाणात परीणाम होतो आणि या माध्यमावर बाजारपेठेचा प्रचंड प्रभाव असतो जी आपण कोणते चिञपट बघतो यावर अवलूंबन असते              फक्त निव्वळ करमणुक महत्ववाची की ज्ञानवर्धक करमणूक ...

सदैव चिरतरुण असणारा चित्रपट, 'सिंहासन'

इमेज
आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत मोठा आशय असलेले अनेक चित्रपट आहेत.दोघी, नितळ, देउळ, देउळबंद, दहावी फ, सामना ,सरकारनामा ही त्यातील काही मोजकी उदाहरणे. मराठी चित्रपटसृष्टीने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर आधारीत चित्रपट दिले आहेत. पत्रकारीतेचा विचार करता  हार्ड  बीट समजल्या जाणाऱ्या राजकारणावर आधारीत चित्रपट मराठीत आहेत. सरकारनामा, सिंहासन ही त्यातील प्रमुख उदाहरण म्हणता येईल  सिंहासन हा चित्रपट तर समस्त भारतीय भाषेतील उत्कृष्ट  चित्रपट म्हणता येईल.16 नोव्हेंबर 1979 रोजी रसिकांसाठी खुला झालेला  या  चित्रपटाला 46 वर्ष पूर्ण होतील मात्र आजदेखील या चित्रपटाचे कथानक रटाळ कालबाह्य वाटत नाही . किंबहुना आज आपण बातम्यांमध्ये ज्या राजकारणाच्या बातम्या बघतो ,त्याचे नाट्य रूपांतरण वाटावे इतका सजीवपणा या चित्रपटात जाणवतो ,     हा चित्रपट त्याच्या पहिल्या दृश्यापासून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो  सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुबई (त्यावेळचे  व्हिटोरीया टर्मिनस ) च्या परिसर त्याच्या पहिल्या दृश्यात दाखवला आहे जो सुरवातीला लॉंग  शॉर्ट  फोकस ...

माझे आवडते लेखक (माझे वाचन भाग4)

इमेज
मला अनेकजण अजिंक्य तूझा आवडता लेखक कोण ? असा प्रश्न सातत्याने विचारतात, त्या व्यक्तींना सविस्तर उत्तर देण्यासाठी आजचे लेखन . तर माझे आवडते लेखक आहेत. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर आणि मराठी  ज्ञान भाषा व्हावी यासाठी झटणारे आणि मराठीत विविध विषयांवर माहितीपुर्ण असी 55पुस्तके लिहणारे अच्युत गोडबोले.        हो मला गिरीश कुबेर आवडतात‌. आपल्या मराठी संत वाड़मयातील सुप्रसिद्ध वचन 'उत्तमाची ते घ्यावे, मिळमिळत ते टाकून द्यावे,' हे वचन  मी अंगीकारत गिरीश कुबेर यांची देशांतर्गत मते बाजूला सारत त्यांच्यातील अर्थशास्त्रज्ञ आणि पश्चिमी आशियाविषयीचा अभ्यास यामुळे मला गिरीश कुबेर आवडतात‌.अच्युत गोडबोले यांच्याविषयी एका वाक्यात बोलायचे झाल्यास, मला ज्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात.त्याच प्रकारची पुस्तके अच्युत गोडबोले लिहीत असल्याने ते माझ्या आवडत्या दोन लेखकांपैकी एक झाले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाला विविध कांगोरे असतात. व्यक्तीचा एखादा पैलू आपल्याला आवडत नसला, तरी त्यावरुन व्यक्तीला न्यायालयातील पिंजऱ्यात उभे करणे सर्वथा अयोग्यच.हे आपण गिरीश ...

मनोव्यापाराची इत्यंभुत माहिती देणारे पुस्तक मनोकल्लोळ भाग 2

इमेज
मन, आपल्या मानवाच्या सर्व व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारा मात्र सहजतेने न दाखवता येणारा शरीराचा भाग .आपण जे हसतो रडतो, चिडतो, दुसऱ्याशी व्यवहार करतो, निराश होतो, ते आपल्या मनामुळे.आपल्या व्यक्तीमत्वाचा बराच मोठा भाग नियंत्रीत केलेल्या मनाविषयी आपल्याला खुप कमी माहिती असते, असे एक सर्व्हेक्षण नुकतेच प्रसिद्ध झाले होते. आपल्याला मनाविषयी असलेल्या माहितीत शास्त्रीय  ठोस आधारावर माहितीपेक्षा ऐकिव, बिनबुडाच्या माहितीचाच भरणा अधिक असल्याचे या सर्व्हेक्षणातून आढळून आले होते.तर या मनाविषयी अचूक माहिती करुन घेण्यासाठी काय करावे ,तर या ठिकाणी आपल्या मदतीला येते, अच्युत गोडबोल आणि निलांबरी जोशी यांनी लिहलेले मनकल्लोळ भाग 1 आणि मनकल्लोळ भाग 2. त्यातील मनकल्लोळ भाग 1 मी या आधीच वाचले होते.तेव्हापासून याचा दुसरा भाग कधी वाचतो असे मला झाले होते.सा.वा.ना. या नाशिकमधील सर्वात जुन्या सांस्कृतिक संस्थेच्या सहकार्यामुळे माझी ही इच्छा नुकतीच पुर्ण झाली.          पहिल्या भागाप्रमाणेच दुसरा भाग देखील माहितीने परीपुर्ण आहे.पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागात विविध उदाहरणे ...

जागतिक पुस्तक दिन विशेष

इमेज
    आज 23 एप्रिल अर्थात  जागतिक पुस्तक दिन, त्यानिमित्ताने सर्व पुस्तक प्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा इंग्रजी साहित्यातील एक महान साहित्यीक शेक्सपियर  याचा स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आज या साहित्यकाराची जयंती(Birth anniversary ) आणि पुण्यस्मरण (Death anniversary )दिवस सुध्दा    आजकाल पुस्तकाची परीभाषा अनेकार्थाने बदललली आहे. आता आता पर्यत मराठी भाषेत न आढळणारा आँडिओ बूक हा प्रकार आता मराठीत चांगलाच रुळला आहे.अनेक अँप त्यासाठी वापरली जात आहे.येत्या काही दिवसात प्रिंट आँन डिमांड मुळे पारंपारीक पुस्तकाची दूकानांचे स्वरुप पुर्णतः बदलून जाईल, मात्र पुस्तकाचे महत्व कमी होणे अशक्य. मध्यंतरी समाजमाध्यमांवर बराच रुळलेला मात्र कायदेशीर नसणारा प्रकार म्हणजे पुस्तकाचा पिडीएफ फाईल, हे सुद्धा पुस्तकाचे एक  साधनच म्हणता येवू शकते. माझ्या माहितीत असे दोन नियतकालीके आहेत, जी मला खुद्द प्रकाशकाकडूनच व्हाँटसप मार्फतच येतात, असो. किंडल सारख्या पुस्तकांविषयीच्या गँझेटमुळे वाचताना आपल्या डोळ्याला सोइस्कर होईल, असा प्रकाश ठेवता येतो, तसेच वाचताना...

कांदे पोहे

इमेज
कांदे पोहे, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या अति परीचयातील पदार्थ. विवाह जूळवतांना  पुर्वी हमखास केला जाणारा पदार्थ. तर माझ्या सारख्या मुळच्या नाशिकमधील मात्र शिक्षण आणि नोकरीच्या निमित्त्याने पुण्यातील पेठांमध्ये बरेच काळ वास्तव्य केलेल्या व्यक्तींचा रोजच्या जगण्याची सुरवात करणारा पदार्थ. सहजतेने पाच मिनीटात तयार होणारा हा पदार्थ .सध्या बाजारात कांद्यांचे आणि शेगदाण्याचे भाव किती आहेत याचा बातम्या न बघता, बाजारात न जाता अत्यंत खराखुरा वृत्तांत सादर करणारा खाद्यपदार्थ म्हणजे कांदेपोहे. आपल्या चित्रपटसृष्टीत, साहित्य विश्वात कांदेपोहे हा मोठा विषय आहे.सनई चौघडे या मराठी चित्रपटात तर आयुष्य म्हणजे कढईतील करपलेले कांदेपोहे  असे सांगत, कांदे पोह्यांना आयुष्यातील भल्याबुऱ्या प्रसंगाशी जोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात कधीही नाश्त्यासाठी मिळणारा पदार्थ म्हणजे कांदेपोहे.        तर गरमागरम कांदेपोहे आणि त्यावर  लिंबू पिळल्यावर असे कांदेपोहे खाणे हणजे रस्त्यावरचे स्वर्गसुख म्हणता येईल. मात्र काही कारणाने आपल्या महाराष्ट्रात सध्या या कांदा पोह्यांची वाट ल...

तुम्ही शिकवाल हो‌ हिंदी !

इमेज
                                  नुकताच आपल्या राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी हि भाषा एक विषय शिकवण्यास सुरवात करण्यात येणार असल्याचा, निर्णय घेतल्याचे एव्हाना तुम्हाला आता माहिती झाले असेलच. . या विषयावर आता वेगवेगळ्या अंगाने चर्चा सुरु आहे ज्यात उत्तरेतील राज्ये त्रिभाषा सूत्र स्वीकारतात का ?  भाषावार प्रांत  रचनेचा मूळ हेतू काय  ? हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा आहे का ?  ऊत्तर भारतीयांच्यी सोइ करण्यासाठी ही खेळी आहे . दक्षिणेकडील राज्यात अशा निर्णय घेऊन दाखवा , अश्या विविध उपविषयांच्या आधारे करण्यात येणारे दावे प्रतिदावे आरोप प्रतिआरोप करण्यात येत आहेत .मात्र या सर्व गदारोळात एका महत्वाच्या मुद्द्यावर मात्र फारच कमी बोलले जात आहे . किमान माझे तरी तसे निरीक्षण आहे तो म्हणजे ज्या मुलांना हिंदी भाषा शिकवण्याबाबत हे सर्व आकांडतांडव सुरु आहे त्यांच्या भावविश्वाचा !                               ...