मनोव्यापाराची इत्यंभुत माहिती देणारे पुस्तक मनोकल्लोळ भाग 2


मन, आपल्या मानवाच्या सर्व व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारा मात्र सहजतेने न दाखवता येणारा शरीराचा भाग .आपण जे हसतो रडतो, चिडतो, दुसऱ्याशी व्यवहार करतो, निराश होतो, ते आपल्या मनामुळे.आपल्या व्यक्तीमत्वाचा बराच मोठा भाग नियंत्रीत केलेल्या मनाविषयी आपल्याला खुप कमी माहिती असते, असे एक सर्व्हेक्षण नुकतेच प्रसिद्ध झाले होते. आपल्याला मनाविषयी असलेल्या माहितीत शास्त्रीय  ठोस आधारावर माहितीपेक्षा ऐकिव, बिनबुडाच्या माहितीचाच भरणा अधिक असल्याचे या सर्व्हेक्षणातून आढळून आले होते.तर या मनाविषयी अचूक माहिती करुन घेण्यासाठी काय करावे ,तर या ठिकाणी आपल्या मदतीला येते, अच्युत गोडबोल आणि निलांबरी जोशी यांनी लिहलेले मनकल्लोळ भाग 1 आणि मनकल्लोळ भाग 2. त्यातील मनकल्लोळ भाग 1 मी या आधीच वाचले होते.तेव्हापासून याचा दुसरा भाग कधी वाचतो असे मला झाले होते.सा.वा.ना. या नाशिकमधील सर्वात जुन्या सांस्कृतिक संस्थेच्या सहकार्यामुळे माझी ही इच्छा नुकतीच पुर्ण झाली.
         पहिल्या भागाप्रमाणेच दुसरा भाग देखील माहितीने परीपुर्ण आहे.पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागात विविध उदाहरणे देवून अनेक संकल्पना, संज्ञा अत्यंत सोप्या सहज समजणाऱ्या. भाषेमध्ये स्पष्ट केलेले आहेत. काहीजण पहिला भाग वाचण्याच्या ऐवजी थेट दुसरा भाग वाचू शकतात, हे लक्षात घेऊन, पहिल्या भागात असणाऱ्या काही संकल्पना जसे मानसशास्त्रीय उपचारांच्या इतिहास, सी.बी.टी. सारख्या काही महत्त्वाचा उपचार पद्धती या पहिल्या दोन प्रकरणात स्पष्ट करण्यात आलेले आहेत अर्थात पहिल्या भागाच्या संकल्पना सविस्तरपणे विस्तृत माहिती देऊन स्पष्ट केलेले आहेत मात्र या दुसऱ्या भागात या संकल्पनांची तोंड ओळख करून देण्यात आलेली आहे.
     पहिल्या भागाप्रमाणेच याही भागात काही काही मानसिक विकारांची आजारांची माहिती आठ प्रकरणाद्वारे करून देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये स्क्रीझोफेनिया, मूड  डीसऑर्डर, पर्सनालिटी डीसऑर्डर, अतिरीक्त ताणतणावामुळे उद्भवणाऱ्या मानसिक व्याधी, न्युरो डेव्हलपमेट डीसऑर्डर,न्युरो कॉग्नेटिव्ह 
डीसऑर्डर यांची माहिती देण्यात आलेली आहे.
या माहितीत या आजारांवर पुर्वी झालेले संशोधन, हे आजार होण्याची कारणे, यावर कोणते वैद्यकीय उपचार करण्यात येतात.या आजरांवर आधारीत चित्रपट , तसेच अन्य साहित्य निर्मिती यांची माहिती देण्यात आलेली आहे
सध्याच्या इंटरनेटवर सर्च केल्यावर धबधबा कोसळावा,या पद्धतीने माहितीचा महापूर येत असण्याचा काळात, निव्वळ माहिती आणि  ज्ञान यातील फरक विश्वासात घेवून बिनचूक, सदोष परीपुर्ण माहिती जी ज्ञानाकडे झूकत आहे, ती मिळवण्याचा मार्ग म्हणून आपण या पुस्तकाकडे बघू शकतो‌.ज्यांना मानसशास्त्रातील 'म'सुद्धा माहिती नाही,त्यांना योग्य मार्ग या पुस्तकाच्या वाचनातून मिळू शकतो. तस बघायला गेलो तर हे मानसशास्त्राचा विद्यापीठाच्या क्रमिक अभ्यासक्रमाला नेमलेले पुस्तक नाही.मात्र तरीसुद्धा विद्यापीठाच्या स्तरावर मानससशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या  विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होवू शकतो‌
कोणत्याही रुग्णात सुरवातीला उपचार दिल्यास त्याचा आजार चटकन बरा होतो.आजार बळावत नाही.
सध्या मानसिक रूग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय, त्या पार्श्वभुमीवर मानसिक आजारांची मुलभुत माहिती होण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक किमान एकदा वाचायलाच हवे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास