पोस्ट्स

वाच ग घूमा ...काय मी वाचू ?( माझे वाचन भाग५)

इमेज
  मला अनेकाकडून बऱ्याचवेळा एक प्रश्न विचारला जातो ? अजिंक्य मला वाचायला एखादे पुस्तक सुचव. तू इतकी पुस्तके वाचतो तुला माहिती असेलच. मला हा प्रश्न विचारला की माझाच त्याला प्रतीप्रश्न विचारतो तूला कोणती पुस्तके वाचायला आवडतात,?कथासंग्रह, कादबरी, काव्यसंग्रह, नाटके, माहितीपर की ना.सी फडके यानी मराठीत मोठ्या प्रमाणात आणलेला निबंंध हा प्रकार? माझ्या या प्रश्नावर जर समोरच्या व्यक्तीने त्याचा आवडता प्रकार सांगितला आणि त्याविषयी माझ्याकडे माहीती असेल तर मी त्याला पुस्तक सुचवतो. मात्र ज्यांचे वाचन मुळातच कमी आहे अशी व्यक्ती माझ्या प्रश्नाने गडबडते. ती म्हणते माझे असे काही ठरलेले नाहीये.मग मला त्याला सांगावे लागते,समोर येईल ते वाच.सतत वाचले की तूला समजेल तूला काय वाचायला आवडते.एकदा प्रकार समजला की पुन्हा माझ्याकडे ये.मी तूला पुस्तके सुचवतो. मी आतापर्यत जी पुस्तके वाचली आहेत, त्यावेळी आलेल्या अनुभवानुसार  किंवा पुस्तके वाचणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती ऐकल्या  आहेत त्यानुसार सांगतोय वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आवडीच्या विषयावरची पुस्तके सुरवातीच्या काळात मिळणे आवश्यक ठरते‌.जर त्यावे...

खगोलशास्त्रातील काही बेसिक कंसेप्ट सहजसोप्या भाषेत स्पष्ट करणारे पुस्तक 'स्पेस ट्रॅव्हल'

इमेज
  रात्री प्रवास करताना, मानवी वस्तीपासून दुर, जिथे लाईटची अडचण नाहीये,अस्या ठिकाणी आपण प्रवासादरम्यान थांबलो आणि वर आकाशात बघीतले तर आपणास असंख्य तारे ग्रह,उपग्रह दिसतात. आपल्या मनुष्याला याचे पार अश्मयुगापासून आकर्षण. मात्र विसाव्या शतकाच्या शेवटच्या पन्नास वर्षात मनुष्याचे याविषयीचे गुढ बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी झाले त्याला कारणामुळे होते या काळात झालेली प्रगती.  जगातील सर्वात श्रीमंत असणारा एलोंड मास यांच्या स्पेस एक्स या कंपनीत मार्फत काही प्रमाणात सुरू करण्यात आलेली अवकाश पर्यटन हे या प्रगतीचेच सध्याचे स्वरूप किंवा भारताचे आदित्य एलवन मिशन असो तर गणयान मिशन असो ही सुद्धा याचेच काही उदाहरणे. हा प्रवास कसा झाला याची कहाणी मोठी रंजक आहे आणि आपल्याला ही माहिती करून घ्यायची असेल तर मराठी ज्ञानभाषा हवी यासाठी मराठीमध्ये अनेक विषयांवर माहितीपूर्ण तरी रंजक भाषेत पुस्तके लिहणाऱ्या अच्युत गोडबोले यांनी लिहिलेले ट्रॅव्हल हे पुस्तक आपणास उपयोगी ठरते मी काही दिवसापूर्वीच हे पुस्तक वाचले.  या पुस्तकात ३२३ पानातून १२ प्रकरणाद्धारे पृथ्वीचे वातावरण नक्की कुठे संपते,आणि अंतराळ सुरु ...

भारतीयांना आपल्या प्राचीन वैभवशाली वारस्याची जाणीव करून देणारे पुस्तक 'सहा सोनेरी पाने'

इमेज
  मानसशास्त्रात व्यक्ती स्वतःच्या विषयी जो काही विचार करते, त्यानुसार तिचे व्यक्तिमत्त्व घडते, असा एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार जर व्यक्तीने स्वतः विषयी नकारात्मकच विचार केला तर व्यक्तीचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि व्यक्तीमध्ये काही कारण नसताना स्वतः कमीपणा घेऊन दुसऱ्याला, त्याची त्या प्रकारची योग्यता नसताना देखील, मोठेपणा देतो. “मी कायमच हरण्यासाठीच जन्म झालेला आहे. मी पूर्वी कधीही जिंकलो नव्हतो; भविष्यात देखील जिंकू शकणार नाही” असे त्या व्यक्तीला वाटायला लागते. व्यक्तीला कायम त्याची चूकच सांगितल्या, त्याच्या चांगल्या बाबींची जाणीवच त्याला करून दिली नाही तर व्यक्तीमध्ये या प्रकारची मानसिक विकृती निर्माण होते, असे या सिद्धांताबाबत मानसशास्त्रज्ञ सांगतात. त्यावेळी त्या व्यक्तीला त्याच्या पूर्वायुष्यातील सकारात्मक बाबी सांगाव्या लागतात. कोणताही समाज हा व्यक्तींचा समूहच असतो. जर एखाद्या व्यक्तीसमूहातील बहुसंख्य व्यक्तींना असे न्यूनगंडाने ग्रासले तर तो समाज एकत्रितपणे नकारात्मक विचार करायला लागतो. अशा वेळी या लेखाच्या सुरुवातीला व्यक्तीबाबत सांगितले तसेच या समाजाबाब...

शोध एक प्रगल्भ आणि विक्षिप्त व्यक्तिमत्त्वाचा 'प्यासा'

इमेज
काही व्यक्तिमत्त्वे मोठी विलक्षण असतात. त्यांच्या विषयी कितीतरी वेळा, कितीतरी वेळ बोलत राहिलो. लिहीत राहिलो तरी दरवेळी त्यांच्याविषयी काय लिहायचे ,काय बोलायचे याचा विचार केला तर दरवेळी कोणतातरी वेगळा मुद्दा , व्यक्तिमत्त्वातील आतापर्यंत फारशा चर्चित ना गेलेला पैलू आपणस गवसतो . आणि आपल्याला या  व्यक्तिमत्त्वाची पूर्ण माहिती झाली आहे.असे वाटत असताना आपणाला या व्यक्तीची पुरेशी माहिती नाही याची जाणीव होते. आज ३० नोव्हेंबर २०२५ रोजी  रात्री साडेदहाच्या सुमारास हा मजकूर लिहीत असताताना  ज्यांचे निधन होऊनच ६० वर्ष झाली आहेत, तरी   ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय बॉलिवूवंडचा इतिहासच लिहिता येणार नाही.  किंबहुना त्यांना  वगळून इतर सर्व व्यक्तींची माहिती लिहिली तरी त्या इतिहासाची किंमत सकाळी शौचास बसण्यासाठीचा कागद अशीच करावी लागेल असे बॉलिवूवडमधील सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक, सिने निर्माते, सिने अभिनेते, सिने दिग्दर्शक असा सर्वच क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या वसंतकुमार शिवशंकर पदुकोण उपाख्य गुरुदत्त यांचा समावेश  अश्याच काही विलक्षण व्यक्तिमत्वांमध्ये करावा लागेल....

मानसशास्त्राची सर्व बाजूने सविस्तर आणि रंजक पद्धतीने माहिती देणारे पुस्तक 'मनात'

इमेज
  मानसशास्त्र , आपल्या शरीरातील सर्वात विस्मयकारी अवयवव असलेल्या मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. काही अपवाद वगळता प्रामुख्याने कला शाखेच्या विद्यर्थ्यांनी शिकण्याचा विषय म्हणजे मानसशास्त्र . आता काही परिस्थिती वेगाने बदलतीये, अनेक हुशार विद्यार्थी ठरवून कला शाखेत प्रवेश घेत आहेत. मात्र पूर्वी ज्याला इतर कुठे प्रवेश मिळाला नाही, अश्या विद्यार्थ्यांनी पदवी मिळवण्यासासाठी कुठे प्रवेश घ्यावा तर कला शाखेत. आणि अश्या कला शाखेतील एक विषय म्हणजे मानसशात्र . मुळात  हा विषय ज्या शाखेत प्रामुख्याने शिकवला जातो ती शाखाच दुर्लक्षित त्यामुळे विषयाकडे सुद्धा दुर्लक्ष होणे आलेच. मात्र आपल्या सर्व हालचालीवर , वर्तनावर, अन्य लोकांशी असलेल्या नातेसंबंधावर भावनांवर, पर्यायाने आपल्या संपूर्ण आयुष्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारा महत्वाचा घटक म्हणजे मानसशास्त्र  हि जाणीव सध्या मोठ्या प्रमाणात विकसित होत असल्याने सध्या विविध आस्थापनात नोकरी भरती करणाऱ्या व्यक्ती आपण ज्यांना भरती करून घेत आहोत र्त्यांची मानसिक स्थिती काय आहे ? हे विविध चाचण्यांतून समजून घेत आहेत.  त्यामुळे आपल्या सर्वाना मान...

मानवी भूगोलाच्या दुर्लक्षित उपशाखेला अर्थात वाहतूक भूगोल ला समर्पित दिवाळी अंक 'भवताल'

इमेज
 आपल्याकडे शहाणपण ज्या कारणाने येते, त्यामध्ये केल्याने देशांतरण या  घटकाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.  आपल्या मराठीत मीना प्रभू, पु. ल . देशपांडे या सारख्या काही लेखकांनी त्याच्या प्रवासाची वर्णने लिहून त्यांना भेट देताना काय काय अनुभव आले आहेत. हे सांगितले आहेच.  मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रात समावेश होणाऱ्या कल्याण, पनवेल आदी क्षेत्रातून रोज हजारो नागरिक मुख्य मुंबई शहरात येतच असतात, आपल्याकडे धार्मिक हेतू मनात ठेवून ज्या यात्रा आयोजित करण्यात येत असतात . त्यामध्ये आपणास मोठ्या प्रमाणात प्रवास देखील करावा लागतो. असे असून देखील भूगोलाच्या दोन मुख्य शाखांपैकी एक असलेल्या मानवी भूगोलाची एक उपशाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'वाहतूक भूगोल या विषयात त्याचा समावेश करून आपण या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र ज्याप्रमाणे  जेव्हा मोठ्या प्रमाणात अंधार असतो तेव्हा मिणमिणती पणती मोठ्या प्रमाणात उजेड करत असते.  त्या प्रमाणे  वाहतूक भूगोल या विषयवार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात असताना गेल्या कित्येक वर्षांपासून पर्यावरण  या...

पुरुषांसाठी महिला किती आवश्यक आहे, हे स्पष्ट करणारे गाणे, 'इसलिये लडकिया, लडकोंसे...

इमेज
आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम गाणी आहेत. काही गाणी त्याला दिलेल्या संगीतामुळे उत्तम या प्रकारात मोडतात. काही गाणी ती ज्या पार्श्वभुमीवर चित्रीत झालेली आहेत, त्यामुळे काही गाणी छान वाटतात. तर काही गाणी त्यातून देण्यात आलेल्या संदेशामुळे सर्वोत्तम श्रेणीत मोडतात.या सर्वोत्तम श्रेणीत मोडणारे एक गाणे म्हणजे, २००४ मे मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम तूम' या चित्रपटातील एक गाणे‌. पुरुषांच्या आयुष्यातील महिलांचे महत्त्व अधोरेखित करणारे 'इसलिये लडकीया लडकोंसे नही होती,हे गाणे. जतीन -ललित या सुप्रसिद्ध जोडीने संगीतबद्ध केलेले आणि अलका यागनिक- शान यांनी आवाज दिलेले हे गाणे, चित्रीत झाले आहे, राणी मुखर्जी आणि सैफ अली खान वर. अभिनयाच्या क्षेत्रात महत्त्वाचा मानल्या गेलेल्या आवाजात दोष असून देखील त्यावर मात करत एकेकाळी बॉलिवूडमध्ये स्वत: चे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून राखी मुखर्जी ओळखल्या जातात. त्यावर स्वतंत्र्यपणे लिहता येऊ शकते, मात्र तूर्तास इतकेच. सहा मिनीटे इतक्या मोठ्या कालावधीचे गाणे परदेशात चित्रीत झाले आहे‌. सुरवातीला सैफ महिला किती त्रासदायक आहेत‌. महिला प...