पोस्ट्स

कर्तृत्व सिद्ध करायला सांगणारे गाणे, 'आकाशी झेप घेरे पाखरा'

इमेज
दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे वेळ साधारणत: रात्रीच्या नऊच्या आसपसाची. पुणे शहरातील मंडई या भागातून दत्तवाडीतून जाण्यासाठी बस मध्ये प्रवास करत होतो. बस मध्ये एक सत्तर वर्षाचे आजोबा सुद्धा प्रवास करत होते माझ्याबरोबर. आजोबांनी त्यांच्या मोबाईलवर गाणी लावली होती  अर्थात आजोबांचे वय बघता त्यांनी हेडफोन न लावता स्पीकरवर  फोन ठेवत गाणे सुरू केले होते त्यामुळे ते गाणे मला पण ऐकू आले गाण्याचे बोल होते 'आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याच्या पिंजरा' . माझा प्रवास दहा मिनीटात संपला. मात्र  अत्यंत व्यापक अर्थ आणि सुंदर गेयता असलेल्या  या गाण्यामुळे सुरु झालेली माझी विचार प्रक्रिया अजून सुरूच आहे.  १९७६ साली आलेल्या 'आराम हराम है', या मराठी चित्रपटातील हे गाणे. चित्रपटाचे नाव जरी हिंदी वाटत असले तरी चित्रपट मराठी आहे तो देखील १९७६ साली ही गोष्ट विशेष आहे. सुमारे दोन वर्षापुर्वी मराठी चित्रपटांची नावे विनाकारण इंग्रजीत ठेवली जातात,असी टिका केली जात होती.त्या पार्श्वभुमीवर आजपासून ५० वर्षापूर्वी हिंदीशी साध्यर्म साधणारे नाव मराठी चित्रपटाला देणे एक वेगळेच म्हणाय...

प्रसिद्ध पुस्तकांचे वाचन आणि मी (माझे वाचन भाग क्रमांक ६)

इमेज
मी मोठ्या प्रमाणात पुस्तके वाचतो, हे समजल्यावर सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तीशी माझी जूजबी ओळख असते,अश्या व्यक्ती मला तुम्ही राधेय वाचले असेल. ययाती वाचले असेल. पानिपत वाचले असेल, असे प्रश्न विचारतात. माझे सर्वसाधारण असे निरीक्षण आहे की या व्यक्ती ज्या पुस्तकांची नावे घेतात ती नावे सुप्रसिद्ध पुस्तके या वर्गवारी मोडणारीच असतात. तसेच या पुस्तकांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणता येऊ शकते ते म्हणजे ही सर्व पुस्तके काही मोजके अपवाद वगळता कादंबरी या प्रकारातील असतात. कादंबरी खेरीज अन्य साहित्यप्रकार जसे नाटक, काव्यसंग्रह, प्रवासवर्णने, चरित्र, कथासंग्रह, किंवा ना. सि.फडके यांनी जो साहित्यप्रकार मराठीत मोठ्या प्रमाणात रूजवला तो साहित्यप्रकार अर्थात ललित निबंध लेखन या प्रकारातील पुस्तके नसतात. नाही म्हणायला काही चरित्र आत्मचरित्र असतात. मात्र त्यांची संख्या फारच नगण्य असते‌‌. मुख्य भर हा कादंबरीवरच असतो. या व्यक्तींशी थोडा जास्त संवाद साधला की या व्यक्तींचे वाचन काहीसे कमी असल्याचे माझे निरीक्षण असते. माझ्या अनुभव हा त्रिकाल बाधित सत्य आहे असे मुळीच म्हणता येणार नाही याची मला पूर्ण जाणीव आह...

महाराष्ट्रात एकत्रीतपणे होणाऱ्या निवडणूक या एक देश निवडणूकीची सुरवात ?

इमेज
महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाकांक्षी निवडणूक सुधारणा म्हणून ज्या गोष्टीकडे बघितले जाते, ती गोष्ट म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन ही प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका बघता जवळपास  सर्वच जिल्हा परिषदा  पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका यांच्या निवडणुका जर मुदतपूर्व झाल्या नाहीत, तर पुढल्या पाच वर्षांनीच एकत्रितच होतील. त्यामुळे हाच मुद्दा अन्य राज्यात राबवत नरेंद्र मोदी सरकारने वन नेशन वन इलेक्शन या आपल्या या आपल्या सुधारणा कार्यक्रमाला अप्रत्यरित्या सुरुवात केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रत्यक्षात पाहता, सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेनुसार होत आहेत, असे म्हणता येणार नाही.  सोशल मीडिया होणाऱ्या चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दा हा दुर्लक्षीला जातोय, किंबहुना असा काही मुद्दा आहे, हेच अनेकां...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक 7

इमेज
हा मजकूर वाचताना तूमच्यापैकी अनेकांच्या मनात माझ्यावषयी एकच ओळख ठळकपणे पुढे आली असेल मी प्रामुख्याने एसटी बसच्या माध्यमातून केलेल्या माझ्या सोलो ट्रिप्स. आजपर्यंत पूर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता, जिथे जिथे आपली एसटी पोहोचते, त्या महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक कानाकोपऱ्यात मी अनेकदा भटकंती केली आहे. या प्रवासात नुसती ठिकाणेच नाही, तर माणसे, संस्कृती, अनुभव आणि आठवणी यांचाही साठा जमा झाला. या प्रवासादरम्यान मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. त्यातील काही अनुभव मी यापूर्वी तुमच्याशी शेअर केले आहेतच. मात्र अजूनही काही अनुभव असे आहेत, जे आतापर्यंत सांगायचे राहून गेले होते.तेच न सांगितलेले, वेगळे आणि लक्षात राहिलेले अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचे हे लेखन मी फिरायला जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातो त्यापैकी काही ठिकाणी एसटीची एक पेक्षा जास्त बसस्टँड असतात.त्यामुळे  बसचे व्यवस्थापन करायला एसटी प्रशासन करायला सोपे जाते तसेच  माझ्या सारख्या फिरणाऱ्या व्यक्तीला हे विविध प्रकारचे अनुभव देणारे ठरते. गावात आल्यावर जर पूढे जायचे असल्यास कोणत्...

८० तासाला एक

इमेज
८० तासाला एक हा दर आहे २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाचा. गेल्या वर्षी तब्बल ११० मराठी चित्रपट प्रदर्शित झाले.मात्र या ११० चित्रपटांनी किती कमाई केली, याची माहिती घेतली असता समोर येणारे चित्र खुपच विदारक आहे.या मराठी चित्रपटांची एकत्रीत कमाई आहे, फक्त ९९ कोटी रूपये‌. सरासरी एका चित्रपटाची कमाई येते ९० लाख रूपये. सुमारे १० कोटी मराठी भाषिक असलेल्या महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीचे हे कटू वास्तव आहे. २०२५ वर्षात प्रदर्शित झालेल्या सर्व मराठी चित्रपटांच्या एकत्रीत कमाईला महाराष्ट्राचा लोकसंख्येने भागले असता समोर येणारे चित्र भीषण हा शब्द हास्यास्पद वाटावा असे आहे.महाराष्ट्रातील जनतेने २०२५ वर्षात  मराठी चित्रपटावर खर्च केलेली रक्कम आहे तब्बल १० रूपये प्रती व्यक्ती. एक कप चहाच्या किंमती एव्हढी रक्कम खर्च करण्याचे मोठे औदार्य महाराष्ट्रातील मराठी जनतेने दाखवले आहे. मराठी चित्रपटांनी यावेळी एकत्रीत मिळवलेल्या कमाईला चित्रपटाच्या संख्येने भागले असता चित्रपटाचे जे सरासरी उत्पन मिळते ते आहे ९०लाख रुपये. पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये ६५० ते १३०० स्...

संवादाची नवी परीभाषा उलगडणारा चित्रपट 'पुष्पक'

इमेज
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे.मनुष्याला दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधायला आवडते. संवाद साधायला मनुष्य त्याला निसर्गाकडून मिळालेल्या अनोख्या अस्या स्वरयंत्रातून विविध आवाज काढतो. या आवाजातून भाषा तयार होते आणि मनुष्य या भाषेच्याद्वारे संवाद साधतो,असे समाजशास्त्रज्ञ नेहमी सांगतात. मात्र भाषाद्वारेच संवाद साधता येतो का, की भाषेशिवाय देखील अन्य संवादाची माध्यमे आहेत याचा अभ्यास करता समोर येणारे चित्र मोठे मनोरंजक आहे‌, आणि या मनोरंजक विश्वाची ओळख होते,ती बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेते असलेल्या कमल हसन यांनी १९८७ साली भुमिका केलेल्या 'पुष्पक' या चित्रपटामुळे. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते सिंगीतम् श्रीनिवास राव, तर सिंगीतम् श्रीनिवास राव आणि श्रृंगार नागराज या दोघांनी मिळून त्याची निर्मिती केली होती. कमल हसन यांनी हिरोची तर हिरोईनच्या भुमिकेछ अमला अक्किनेनी होत्या. अन्य प्रमुख कलाकारांचा विचार करता रमेश, फरीदा जलाल, प्रताप पोतन, लोकनाथ, पी. एल. नारायण, रम्या  आदींनी यात भुमिका केल्या होत्या   बंगळूरूमध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटात एक देखील संवाद ना...

असे अधिकारी न झालेलेच बरे

इमेज
पुणे शहरात नविन वर्षाची सुरवात झाली ती आंदोलनाने. महाराष्ट्र पोलिस दलात भावी अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन तयारी करणाऱ्या उमेदवारांनी त्यासाठी होणाऱ्या परीक्षेला बसण्यासाठी  वयोमर्यादेत वाढ करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले. या पुर्णत: चूकीच्या गोष्टीसाठी सुरू झालेल्या आंदोलकांना त्यांची योग्य जागा दाखवत राज्य सरकारने त्यांचा मागण्यांना वाटाण्याचा अक्षता दाखवल्या,जे योग्यच आहे. जाहिरात उशीरा आल्यामुळे काही जणांची वयोमर्यादा उलटून गेली आहे, असे अत्यंत हास्यापद कारण आंदोलकांनी दिले होते‌. ज्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची किमान आवश्यकता ही पदवी आहे.जी वयाच्या २१ व्या वर्षी फार फार उशीरा म्हटले तर २३ वर्षाचे झाल्यावर मिळून जाते.तीला ३०/३२ वय एव्हढे वय ही अंतीम मुदत असताना या भावी अधिकाऱ्यांना त्यात १ वर्षाची वाढ हवी होती. समजा मास्टर ड्रिग्री मिळाल्यावर त्यांनी या परीक्षेचा विचार केला तर ते २३ किंवा २५ व्या ते या परिक्षेचा अभ्यास सुरू करतील. आता हा अभ्यास सुरु केल्यावर अंतीम वयोमर्यादा होणेपर्यत जी ५ ते ७ वर्षे काही उदाहरणात तर तब्बल ९ वर्ष मिळतात. त्यात त्यांना अरे हे मला जम...