पोस्ट्स

युगास्त आणि युगारंभ एकाच वेळेस

इमेज
                    नुकत्याच आपल्या सर्वांच्या लाडक्या एसटी विषयी दोन बातम्या वाचनात आल्या .एक बातमी सुखद धक्क्का देणारी होती , मात्र दुसरी काहीशी मन हेलावून सोडणारी होती . आपल्या भारतात अनेक गोष्टी प्रथमतः महाराष्ट्रात घडतात . आणि नंतर सर्व भारतात त्याचे अनुकरण होते . याची साक्ष देणारी पहिली सुखद घटना होती ती म्हणजे आजपासून सुमारे ३६ वर्षांपूर्वी भारतात सर्वप्रथम राज्य परिवहन मंडळाकडून आरामदायी सेवा आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून पुरवण्यात आल्यानंतर इतिहासाची पुनर्वार्ती होत  आपले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ इलेट्रीक वाहन चालवणारे भारतातील पहिले  राज्य परिवहन महामंडळ ठरले आहे . नुकत्याचं राजस्थानात तयार झालेल्या या बसेसचे महाराष्ट्रात आगमन झाले . काही चाचण्या नंतर या गाड्या आपल्या सेवेत दाखल होतील . या गाड्यांचे शिवाई असे नामकरण करण्यात आले आहे .   ह्या बसची काही वैशिष्ट्ये काही वैशिष्ट्य पुढील प्रमाणे असतील  .  वाहनाची लांबी १२ मी असून रुंदी २.६ मी असून उंची ३.६ मी इतकी आहे. . ...

गणेशाची साडेतीन पीठे

इमेज
. आपल्या महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे म्हंटली की प्रामुख्याने   देवीची शक्तिपीठे आठवली जातात . मात्र आपल्या महाराष्ट्रात गणपतीची देखील शक्ती पीठे आहेत . सध्याच्या गणेशोत्सवाच्या   काळात त्यांची माहिती करून घेउया . या साडेतीन गणपतीच्या दर्शनाने मोठे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे . भगवान गणपतीने मयूरेश्वराच्या वध केला असता त्याचे शरीर ज्या ज्या ठिकाणी पडले   त्या त्या   ठिकाणी ही पुण्यक्षेत्रे निर्माण झाली अशी कथा सांगितली जाते .                                मोरगाव - ' भूस्वानंदपूर ' म्हणजेच आजचे प्रचलित ' मोरगाव '. गाणपत्य सांप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव . या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे . ब्रम्ह , विष्णू , महेश , सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ॐकार स्वरूपी गणेशाची तिथे स्थापना केली . उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूर याच...