पोस्ट्स

पूर्व आणि पश्चिमेचा सेतू भारत

इमेज
           सध्या जगाचे राजकारण वेगाने बदलत आहे जागतिक राजकारणात मोठे मोठे गृप स्थापन होण्याऐवजी अनेक लहान लहान गृप स्थापन होत आहे फक्त ४ ते ५ देशांच्या सुद्धा एका गृप बनत आहे . पूर्वीप्रमाणेच याही जागतिक राजकारणाच्या बदलत्या  स्थितीत भारताचे जागतिक राजकारणातील स्थान दिवसोंदिवस अधिक महत्त्वाचे होत आहे ,१४ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी इस्राईलमध्ये सुरु असणाऱ्या आय  यु टू  या  गृपच्या अधिवेशनामध्ये  ऑनलाईन माध्यंमांद्वारे साधलेला संवाद हेच स्पष्ट करत आहे . इंडिया ,इस्राईल , यूएस ( अमेरिका ) आणि युएई (दुबई शारजा ,अबुधावी ही प्रसिद्ध शहरे असणारा देश )  या चार  सहभागी देशांच्या अद्याक्षरांवरून या गटाला आय टू  यु टू  हे  नाव देण्यात आले आहे  यातील  टू  हा शब्द २ हा अंक दर्शवतो . (इंगजीत दोनला टू म्हणतात ) तर आय हे अक्षर इंडिया आणि इस्राईल या दोन देशांचे प्रतिनिधित्व करते या दोन्ही देशांचे इंग्रजी स्पेलिंग आय या अक्षरापासून सुरु होते म्हणून आय २ तर यु हे अक्षर यूएस आणि...

विश्वाच्या बाल्यावस्थेतील फोटो टिपला मानवाने

इमेज
    १२ जुलै २०२२ हा दिनांक जगाच्या इतिहासात सुवर्णक्षणांनी लिहला जाईल कारण या दिवशी मानवाने आपल्या सभोवताली अथांग पसरलेल्या विश्वाच्या बाल्यावस्थेतील फोटो टिपला आहे नासा या संक्षिप्त रूपाने प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात नॅशनल अरनेटिक्स अँड स्पेस एजन्सीकडून संचालित करण्यात येणाऱ्या जेम्स टेलिस्कोपने   छायाचित्र टिपले आहे   सदर फोटोमुळे आजपासून १३ अब्ज वर्षांपूर्वी किंवा विश्वाचा जन्म झाल्यनंतरचा   ८० कोटी वर्षानंतर विश्व कसे होते . याचा उलगडा होणार आहे . विश्वाचे सध्याचे वय बघता ८० कोटी वर्ष म्हणजे विश्वाचा बाल्यावस्थेतील हे फोटो म्हणायला हवेत      जेम्स टेलिस्कोप पृथ्वीपासून १५ लाख अंतरावरून आपल्या सभोवताली पसरलेल्या विश्वाचे निरीक्षण करणारी दुर्बीण आहे १००० कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा जास्ती खर्च , तब्बल २० वर्षांचा कालावधी बनवण्यासाठी तर १० , ००० पेक्षा जास्त वैज्ञानिक , अभियंते यांच्या अथक परिश्रमातून जेम...