पोस्ट्स

पश्चिम आशियातील बदलती सत्ता समीकरणे आणि भारत

इमेज
शुक्रवार १० मार्च २०२३ हा दिवस जागतिक राजकारणाच्या विचार करता अत्यंत वादळी ठरला कारण .पश्चिम आशियातील हाडवैरी असणाऱ्या इराण आणि सौदी अरेबिया या दोन देशांमध्ये चीनच्या मध्यस्तीने काही प्रमाणत मैत्रीचे संबंध स्थापन होण्याची पश्चिम आशियातील  सत्ताकारणाचे समीकरणे मोठ्या प्रमाणत बदल्याची क्षमता असणारी  घटना या दिवशी घडली एकेकाळी अमेरिकेचा पश्चिम आशियातील घनिष्ठ मित्रदेश म्हणून ज्यास ओळखले जात होते मात्र सध्या संबंधात काहीशी कटुता आली आहे असा  सौदी अरेबिया आणि १९७९पासून अमेरिकेचा हाडवैर असलेल्या इराण यांनी अमेरिकेचा वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या चीनच्या मदतीने मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास सुरवात केल्याची ती घटना आहे इराण आणि सौदी अरेबिया या दोन देशांमध्ये  इस्लामी जगताचा नेता कोण होणार?  तसेच इराणची संस्कृती श्रेष्ठ कि सौदी अरेबियाची संस्कृती श्रेष्ठ या सारख्या अनेक बाबतीत स्पर्धा असल्याने  आणि जगात एकमेव शिया मुस्लिम बांधव  बहुसंख्य असलेल्या इराकमध्ये  सौदी अरेबिया या देशात  अल्पसंख्याक असलेल्या शिया मुस्लिम बांधवांवर...

भारत ऑस्ट्रेलिया मधुरतेकडून अधिक मधुरतेकडे

इमेज
सध्या ऑस्टेलियाचे पंतप्रधान   अँथनी अल्बानीज चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत . या दौऱ्यात ते विविध विषयांवर भारताशी करार करत पूर्वी असणारे भारत आणि ऑस्टेलिया यांच्यातील मधुर संबंध अधिकच मधुर करतील . भारताचे माजी पंतप्रधान   पी व्ही नरसिंह यांनी सुरु केलेल्या लुक ईस्ट पॉलिसीचा पुढील टप्पा अर्थात ऍक्ट ईस्ट पॉलिसी   अंतर्गत भारत सध्या आपल्या पूर्वेकडील सदस्यांशीसंबंध वाढवण्यावर भर देत आहे त्या अंतर्गत या घडामोडी अभ्यासाव्या लागतील . या लुक ईस्ट पॉलिसीमधील घडामोडी बघितल्यास   गेल्या दीड ते दोन वर्षात भारताने पूर्वेकडील देशांमध्ये ऑस्टेलियाया या देशाशी संबंध वाढवण्यावर विशेष भर दिलेला दिसत आहे    २०२१मध्ये ऑस्टेलियाने भारताला Talisman Sabre या युद्ध अभ्यासात सहभागी करावे असे सूतोवाच केले   . हा युद्ध अभ्यास ऑस्ट्रोलीया   आणि अमेरिकेकडून संयुक्तरित्या आयोजित करण्यात येतो . या युद्ध अभ्यासात जमिनीवरील आणि पाण्यावरील तसेच हवाई तिन्ही प्रका...