पोस्ट्स

माळराने", या दुर्लक्षीत पर्यावरण घटकाला समर्पित दिवाळी अंक "भवताल"

इमेज
          आपल्या महाराष्ट्राला मोठा सांस्कृतिक परंपरांचा वारसा लाभलेला आहे . या परंपरा खुपचं विलोभनीय देखील आहेत . काही परंपरा तर फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही आढळतात . दिवाळीला खाद्य फराळाबरोबर बौद्धिकफराळ देणारे खास दिवाळी निमित्त देणारे दिवाळी अंक हे फक्त महाराष्ट्रातच आढळणाऱ्या   परंपरेचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल . सुरवातीला फक्त कथा कविता असे साहित्य असणारे दिवाळी अंक आता या   कथा कवितांखेरीज अनेक माहितीपुर्ण लेखांनी भरलेली असतात . ही माहिती विविध क्षेत्रांची असते . एका विशिष्ट क्षेत्रांची सखोलपणे माहिती देणारे दिवाळी अंक देखील अनेक आहेत . एका विशिष्ट विषयाला धरून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकात " भवताल "  हा आपल्या लेखांमुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . त्यांचा 2023 चा अंक मी नुकताच वाचला .       गेल्या १०वर्षापासून पर्यावरणाशी सबंधित एक संकल्पना घेवून प्रकाशित होणाऱ्या या दिवाळी अंकाची या वर्षाची संकल्पना आहे , माळराने ....

भारत ऑस्ट्रेलिया मैत्री चिरायू होवो

इमेज
                  क्रिकेटमध्ये   ५० ओव्हरच्या पुरुष विश्वचषकात ऑस्टेलियाने भारताला धूळ चारली , मात्र हे होऊन काहीच तास होत नाहीत तोच पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया भारतात   एकदा चर्चेत आले . काही तासांच्या अवधीत दुसऱ्यांदा चर्चेत आलेल्या या घटनेत मात्र खेळाडू नव्हे तर राजनैतिक व्यक्ती कारणीभूत होत्या . निमित्य होते भारताने आयोजित केलेली भारत ऑस्ट्रेलिया 2 +2 मिटींग्स . ज्यात भारतातर्फे भारताचे सरंक्षण मंत्री राजनाथसिंग आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी प्रतिनिधित्व केले तर ऑस्ट्रियातर्फे त्यांचे सरंक्षणमंत्री जे ऑस्टरलियाचे उपपंतप्रधान देखील आहेत असे रिचर्ड मार्ल्स आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनी प्रतिनिधित्व केले २० आणि २१ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत ही   बैठक पार पडली हि या प्रकारची   ऑस्ट्रेलियाबाबरोबरची दुसरी मिटींग्स होती या आधीची मिटींग्स २०२१ साली झाली होती  ...