पोस्ट्स

भारताचे अशांत शेजार आणि लोकशाही

इमेज
            आपल्या भारतात पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे सर्व वातावरण ढवळून निघाले असताना भारताच्या शेजारी असणाऱ्या नेपाळ आणि म्यानमार या दोन देशातील वातावरणसुद्धा लोकशाहीच्या दोन वेगवेगळ्या आंदोलनामुळे ढवळून निघत आहे . नेपाळमध्ये सध्याची वर्तमान गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था मोडीत काढत  संविधानिक राजेशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे तर म्यानमार या शेजारील देशामध्ये सध्याची वर्तमान असणारी लष्करशाही पद्यच्युत करून लोकशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी करण्यात आलेल्या चळवणीने  निर्णायक स्वरूप गाठले आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ख्याती असलेल्या आपल्या भारताच्या शेजारील या दोन देशामध्ये लोकशाहीविषयक या आंदोलनाने एक आश्चर्यकारक स्थिती जगात निर्माण केली आहे          नेपाळमध्ये सध्या भारतासारखीच गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था आहे ज्यामध्ये देशाचा प्रमुख हा लोकांमार्फत अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो . मात्र हि व्यवस्था मोडीत काढत देशात इंग्लड सारखी घटनादत्त राजेशाही व्यवस्था...

असे बनले आपले संविधान

इमेज
मित्रानो, आपले भारतीय संविधान जगातील एक उत्कुष्ट संविधान आहे .  देशातील प्रशासन व्यवस्था कशी असेल ? याचा स्पष्ट उल्लेख असणारे आपले संविधान जगातील अश्या प्रकारचे एकमात्र संविधान म्हणून आपल्या संविधांकडे बघितले जाते . प्रशासन व्यवस्थेसारख्या अनेक गोष्टी आपल्या संविधानात अतिशय विस्तृतपणे सांगितल्या आहेत . आपल्या संविधानाचे हे एक वैशिष्ट्यच आहे . हे संविधान जरी अधिकृतपणे 1946 डिसॅबर 9 रोजी तयार होण्यास सुरवात होऊन 1949 नोव्हेंबर 26 रोजी तयार झालेले असले तरी आपल्या संविधानाची प्रक्रिया या दिवसांतच झाली असे मानणे भाबडेपणाचे ठरेल . सन 1773 च्या रेग्युलेटरी ऍक्ट पासून वेळोवेळी भारतीय प्रशासन व्यवस्थेत विविध बदल करण्यात आले , ज्याचे प्रतिबिब आपणास आपल्या संविधानात दिसते . आपल्या संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत 1773, च्या रेगुलेटींग ऍक्ट बरोबर   1784 च्या पिट्स ऍक्ट ,  1813, चा चार्टड ऍक्ट 1833 चा चार्टड ऍक्ट   1833 च्या चार्टड   ऍक्ट    . 1853 च्या चा...