पोस्ट्स

रियल चक दे इंडिया..!

इमेज
   शाहरुख खान यांनी अभिनय केलेला 'चक दे इंडिया', हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा क्रीडा चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात भारतीय महिला हॉकी संघाने मिळवलेल्या एका काल्पनिक विजयाची कथा मांडण्यात आली आहे.सध्या बिहारमध्ये सुरु असलेल्या  महिला आशियाई हॉकी  चॅम्पियनशिप भारतीय महिला संघ मिळवत असलेल्या यशामुळे ती रिल कथा रियल झाली असे म्हणता येण्यासारखी स्थिती आहे.साखळी पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी होत असून हा मजकुर लिहण्यापर्यत खेळवण्यात आलेल्या ५सामन्यात भारताने सर्वच्या सर्व पाच सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या आणि फार मोठ्या फरकाने धुळ चारली आहे मलेशिया विरुद्ध ४-० दक्षिण कोरिया  ३-२ ,थायलंड १३-० ,चीन ३-०, तर जपान विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात३-०या फरकाने आपण सामने जिंकल्याने अंतीम फेरीत आपले स्थान निश्चित झाले आहे.     आपल्याकडे सध्या निवडणुका सुरू असल्याने या गोष्टीला खूपच कमी जवळपास नाहीच म्हणता येईल अशी प्रसिध्दी देण्यात आली आहे. मात्र ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत महत्तवाची आहे. एकेक...

महाराष्ट्रातील सांस्कृतिक देवाघेवाण स्पष्ट करणारा दिवाळी अंक 'भवताल'

इमेज
आपल्या महाराष्ट्राला मोठा समृध्द सांस्कृतिक वारसा मिळाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध होणारे आणि बौद्धीक फराळ म्हणून सर्वांना परिचीत असलेले 'दिवाळी अंक' हे या समृध्द सांस्कृतिक परंपरेतील एक महत्तवाचा घटक, ज्याला शतकोत्तर वर्षाची समृध्द परंपरा आहे. आज विविध विषयावर दिवाळी अंक निघत आहेत.कोव्हिड साथरोगामुळे मंदावलेल्या अर्थकारणामुळे ते दोन वर्ष दिवाळी अंकाची परंपरा रोडावली असली तरी ते दोन वर्ष सोडल्यास पुन्हा एकदा ही परंपरा मोठ्या जोमाने पुन्हा एकदा सुरु झाली आहे 2024 या वर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे अनेक विषयावर  दिवाळी अंक निघाले आहेत.त्यापैकी एक उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून प्रसिद्ध असलेला 'भवताल' हा दिवाळी अंक मी नुकताच वाचला.           नेहमीप्रमाणे भवतालचा हा अंक देखील संग्रही ठेवावा,असाच झाला आहे.प्रत्येकवेळी एक पर्यावरणाशी संबंधीत संकल्पना घेवून, त्यावर आधारीत सुमारे 150 पानाचा अंक काढणारे,  लोकसत्ताचे माजी वरीष्ठ उपसंपादक अभिजित घोरपडे यांची यावेळची संकल्पना देखील अनोखी आहे. महाराष्ट्रातील 'सांस्कृतिक देवाणघेवाण' या पर्यावरणाच्या वि...

राजकारणाचे मर्म उलगडवून सांगणारी कादंबरी 'मुबई दिनांक'

इमेज
                १६ नोव्हेंबर १९७९ ही   फक्त एक तारीख नहिये.   आपल्या मराठीतील ज्याला ऑल टाइम ग्रेट सिनेमा म्हणता येईल अश्या ' सिहासन ' या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची ती तारीख आहे .   आपल्या चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट दिगर्शक निर्माते असलेल्या जब्बार   पटेल यांची कलाकृती असलेला हा चित्रपट आज त्याला निर्माण होऊन ४५ वर्षे अर्थात २५ वर्षाची एक पिढी या हिशेबाने दोन पिढ्याच्या कालावधी होत असला असला तरी   कालसुसंगत वाटतो , कंटाळवाणा होत नाही. यातच त्याचे महत्त्व   अधोरेखित होते. चित्रपट यशस्वी होण्यामागे चित्रपटात अभिनय करणारे कलाकार जितके महत्वाचे असतात तितकीच महत्वाची असते चित्रपटाची पटकथा.   चित्रपटाची   पटकथा सशक्त होणार का . यामध्ये पटकथा लिहणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच किंबहुना कणभर जास्तच महत्त्वाची असते पटकथा. ज्या   कथा कादंबरीवर आधारित आहे त्याचे सशक्त असणे   सिंहासन हा चित्रपट ज्या दोन कांदबरीवर आधारित आहे त्या देखील तितक्याच सशक्त असल्याने चित्रपट जवळपास पन्नाशीत आला तरी आपल्याला खिळवून ठ...

मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणाऱ्या नॅनो टेक्नॉलॉजीची साविस्तर माहिती देणारे पुस्तक, 'नॅनोदय'

इमेज
            आपल्या सर्वांचेच आयुष्य गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बदलले आहेत १९९० ते २००० या दहा वर्षाच्या  आसपास जन्मलेल्या माझ्यासारख्याव्यक्तींचे  आयुष्य त्यांच्या पालकांपेक्षा पुर्णतः वेगळे ठरले  या बदलला या काळात अत्यंत झपाट्याने  झालेली  तंत्रज्ञनातील प्रगती असे ठराविक साच्याचे उत्तर देता येते असले तरी अधिक सविस्तरपणे आणि बिनचूकपाने उत्तर देयचे झाल्यास या मागे या मागे  नॅनो टेक्नॉलॉजी आणि आता आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग होऊ घातलेली कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) यामुळे आपले जीवन मागच्या पिढीच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे हे नाकारून चालणार नाही .तंत्रज्ञानातील प्रगतीपेक्षा नॅनो टेक्नॉलॉजी  आणि कृत्रिम बुद्धिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजिनयस )  या डाँग गोष्टीमुळे आपले जीवन मोठ्या प्रमाणात बदलले आहे त्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) हे क्षेत्र अजूनही बाल्यावस्थेत आहे असे म्हण्टले तरी चालू शकते कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) यामध्...

एका दुर्देवी प्रेम त्रिकोणाचा समग्र वेध घेणारे पुस्तक ' व्यस्त ओढीचा त्रिकोण'

इमेज
            आपल्या बॉलिवूडमध्ये अनेक प्रेम कहाण्या प्रसिद्ध आहेत. यातील काही कहाण्या या आनंदायी आहेत . तर काही प्रेम कहाण्यांना मात्र दुर्दैवाची कारुण्याची छाया आहे . या दुःखाची पार्श्वभूमी असलेल्या प्रेम कहाण्यांमध्ये अग्रक्रमामाने नाव येते ते , गुरुदत्त  गीता दत्त आणि वहिदा रेहमान. या जोडीचे . एकीवर नितांत प्रेम असून देखील व्यावसायिक कारणास्तव  जवळ आलेल्या  एका दुसऱ्या व्यक्तिमत्वामुळे अक्षरशः कोंडीत सापडलेल्या गुरुदत्त यांचा या दुर्दवी मृत्यू  या प्रेम कहाणीत झाला . त्यांच्या मृत्यूमुळे आपण एका प्रतिभावंत, कामाप्रती अत्यंत निष्ठावान असेलेल्या, प्रयोगशील,  मात्र मनस्वी हळव्या अश्या अत्यंत हुशार असलेल्या एका ससिने अभिनेत्यासह सिने दिग्दर्शक सिने निर्मेत्यास सिने दिग्दर्शकास आपण तयां अकाली गमावलं . आपल्या बॉलीववूडची खूप मोठ्या प्रमाणात हानी यामुळे झाली त्यांचे एक्ली निधन झाले नसते तर आपण आतापर्यंत आपल्यापासून दूर असलेली ऑस्करची बाहुली अनेकदा पटकावली असती याबाबत कोणाशी शंका नसावी .  गुरुदत्त यांच्या या अकाली जाण्याविषयी अनेकदा अ...

जपानच्या कार्यसंस्कृतीतून देशाची ओळख करून देणारे पुस्तक 'जपान'

इमेज
                              जेव्हा आपण कोणतेही कारण असो आपला प्रदेश सोडुन दुसऱ्या देशात जातो , तेव्हा नवीन प्रदेश आपल्याशी विविध प्रकारे संवाद साधत असतो . तेथील पर्यटनस्थळे आपण ज्या प्रदेशात आलोय , त्या प्रदेशाचा ऐतिहासिक वारसा तसेच त्या प्रदेशावर निसर्गाने केलेली उधळण सांगत असतात , तर आपल्या वास्तवात आपल्या ज्या लोकांशी संपर्क येतो ते लोक त्या लोकांची परदेशी लोकांविषयीची भावना , तेथील कार्यसंस्कृती , तेथील समाजजीवनातील व्यक्तींचे स्थान , त्यांची स्वत : च्या प्रदेशाविषयीची भावना तसेच दुसऱ्या ज्या प्रदेशातून आपण आलेलो असतो , त्या प्रदेशाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता याविषयी माहिती देत असतात . या संवादातून आपणास त्या प्रदेशाची मोठ्या प्रमाणात माहिती मिळते . या माहितीमुळे आपले त्या प्रदेशाशी आपली नाळ देखील जोडली जावू शकते असी नाळ जोडली गेल्यास आपण सातत्याने त्या प्रदेशात जावू इच्छितो , तेथील लोकांशी आपली मैत्री द...

नशिबाला दोष न देता, विजयश्री खेचून आणणारी प्रेरणादायी व्यक्तीमत्वे

इमेज
जगी सर्व  सुखी कोण आहे ? विचारी मना तूच शोधून पाहे अशी विचारणा  करत समर्थ रामदास स्वामी जगात कोणीच पूर्णतः सुखी नसतो प्रत्येकास काहींना काही दुःख असते (अगदी मुकेश अंबानी याच्या मुलाला असाध्य असा आजार आहे ) फक्त आपण त्या दुःखाला कोणत्या प्रकारे सामोरे जातो . याला मह्त्वाचे असते असा सल्ला देतात जगताना  स्वतःचे दुःख कुरवाळत बसण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करत अरे याच्या तुलनेत माझे दुःख काहीच नाही असे मानून समाधानी राहावे . हा  जीवन जगण्याच्या सर्वोत्तम उपाय असल्याची शिकवण अनेक मोटिव्हशन स्पीकर देताना बघतो . मात्र  अनेकदा बहुतांश माणसे याकडे दुर्लक्ष करत आपल्याला काय मिळाले आहे याचा विचार न करता आपल्याला काय मिळाले नाही याचा विचार करत दुखी होतात मात्र जगात प्रत्येक गोष्टीला प्रति गोष्ट अस्तित्वात असतेच जसे हिवाळ्याच्या  कडाक्याच्या थंडीला उन्हाळ्या रणरणते ऊन असते जन्मला मृत्यू ही  प्रतिगोष्ट  असणे हे याचे उत्तम उदाहरण आहे . तोच नियम याला देखील लागू होतो काही व्यक्ती आपल्याला  असणाऱ्या अडचणींबाबत काहीही त्रास व्यक्त ना करता त्यास आनंदान...