पोस्ट्स

सिंहावलोकन,२०२४ :भारत आणि जागतिक परिषदा

इमेज
      नविन वर्ष २०२५सुरु होण्यास आता अत्यंत मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. नविन वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना सरत्या वर्षात आपली काय कय मिळवले, काय काय गमावले याचा आढावा घेतल्यास नविन वर्षात या वर्षात केलेल्या चूका आपण टाळू शकतो‌ जो न्याय वैयक्तिक स्तरावर लागू होतो तोच न्याय मोठ्या स्तरावर विचार केल्यास आपल्या भारत देशाला देखील लागू होतो.देशाचे जवाबदार नागरिक म्हणून आपणास या बाबी माहिती असणे आवश्यक आहे.चला तर जाणून घेवू भारताचा जागतिक परीषदांमधील सहभाग कोणत्या प्रकारचा राहिला.       या वर्षी  भारत प्रामुख्याने वार्षिक भारत -रशिया समिट ,आशियान समिट, ब्रिक्स समिट शांघाय को ऑपरेशन समिट, क्वाड समिट ,इंडो आशियान समिट, इंडो जी.सी.सी समिट, यु.एन.जी.ए., कॉप २९ या प्रमुख परिषदांमध्ये सहभागी झाला. या वर्षी जूलै महिन्यात २२वी भारत रशिया वार्षिक परीषद रशियाची राजधानी मास्कोला झाली.या परीषदेत पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांच्यात विविध द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली.द्विपक्षीय मुद्यांमध्ये संरक्षण, ...

सिंहावलोकन भारत आणि जग (शेजारील देश वगळून )

इमेज
आता नवीन वर्ष सुरु होण्यास एका आठवड्या पेक्षा कमी वेळ राहिला आहे पुढील वर्षात आपण या वर्षात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपल्या बाबत या वर्षात काय काय झाले याची उजळणी करणे आवश्यक. जी बाब वैयक्तिक आयुष्यात लागू होते,तीच बाब देशासाठी सुद्धा लागू होते.देशाची नविन वर्षात अधिक प्रगती होण्यासाठी देशाची विविध क्षेत्रातील सरत्या वर्षातील कामगिरी जवाबदार नागरिक या नात्याने आपणास माहिती असणे अत्यावश्यक चला तर जाणून घेवूया त्याविषयी.या लेखात मी भारताचे शेजारील देश वगळून अन्य देशांबरोबर भारताचे राजनैतिक संबंध कसे राहिले ?याविषयी सांगणार आहे‌?         तर मित्रांनो, शेजारील देश वगळता अन्य जगाचा विचार करता पश्चिम आशियातील देश हा एक महत्तवाचा घटक आहे.या देशातील कतार या देशाबरोबरचे संबंधात मधूरता आली वर्षाची अखेर होताना, कुवेत देशाकडून  त्यांचा सर्वोच्च नागरी, ' विसम मुबारक अल कबीर' हा पुरस्कार मोदींना देण्यात आला. आखाती देशांनी व्यापारवृढीसाठी गल्फ कंट्री कार्पोरेशन  या नावाने संस्था स्थापन केली आहे.जीला संक्षिप्त स्वरूपात जी.सी.सी. म्हणतात.या जी.सी...

सिंहावलोकन भारत आणि भारताचे शेजारी देश

इमेज
    ग्रेनीयर कॅलेंडर २०२५ सुरु होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे हा कालावधी नव्या वर्षाचे नियोजन करण्याच्या म्हणता येईल . नव्या वर्षाचे नियोजन अचूक  व्हावे यासाठी आपण सरत्या वर्षाच्या आरंभी कोठे होतो ?या सरत्या वर्षात आपली प्रगती कोठे झाली .?कोठे प्रगती झाली नाही  ? हे माहिती असणे आवश्यक आहे .हे सर्व कळण्याच्या उत्तम मार्ग म्हणजे सरत्या वर्षाचे अवलोकन करणे जी गोष्ट व्यक्तीला लागू होते तीच गोष्ट देशाला देखील लागू होते भारताचे जवाबदार नागरिक या नात्याने आपल्या भारताबाबत आपणास या गोष्टी आपणस माहिती असणे आवश्यक आहे जर आपणास या गोष्टी माहिती असल्यास आपण लोकप्रतिनिधींना त्याबाबत डब्बावा करू शकतो चला तर जाणून घेउया या सरत्या २०२४ वर्षात भारत आणि भारताच्या शेजारील देशाबरोबर संबंध कसे राहिले ?             या सरत्या वर्षात भारताच्या शेजारील बहुतेक सर्व देशात निवडणुका झाल्या .मार्च महिन्याच्या सुरवातीला बांगलादेशात निवडणुका झाल्या  बांगलादेशात सत्ताधिकारी अवामी लीग पुन्हा सत्तेत आला  . या निवडणुकीत मोठ्या प्...

सिंहावलोकन २०२४: जागतिक घडामोडी

इमेज
नविन ग्रेनियर वर्ष २०२५ सुरु होण्यास आता आठवड्यापेक्षा कमी वेळ शिल्लक राहिला आहे.त्या अर्थाने हे दिवस सरत्या वर्षाचा आढावा घेण्याचे आहे.हा आढावा क्षेत्र निहाय घेतल्यास उत्तम ठरेल असे मला वाटल्याने मी तो क्षेत्रनिहाय घेत आहेत.या लेखात आपण जागतिक घडामोडी बघूया . सरते वर्ष जागतिक स्तरावर अत्यंत वादळी ठरले .हे वर्ष निवडणूक वर्ष म्हणावे का?इतक्या निवडणूका या सरत्या वर्षात झाल्या           युनाटेड किंग्डम या देशात सत्तांतरण होवून लेबर पार्टिचे सरकार आले कॉन्झरेटिव्ह पक्षाचा अत्यंत दणदणीत पराभव झाला.अमेरिकेत अपेक्षेप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी निवडुन आले.बांगलादेशमध्ये अवामी लिग पक्षाने सत्ता तसीच ठेवली.मात्र आरक्षण किमान कमी करावे या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पंतप्रधान शेख हसिना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला पाकिस्तानात तेथील संसदेच्या निवडणूका झाल्या,ज्यात पाकिस्तान पिपल्य पार्टीचे शहाबाज शरीफ पंतप्रधान झाले. नेपाळमध्ये भारत विरोधी समजणारे पुष्पकमल प्रचंड पंतप्रधानपदी निवडले गेले.निवडल्यावर त्यांनी नेपाळचा पंतप्रधानाने सर्...

आजच्या तंत्रज्ञानाची सविस्तर ओळख करुन देणारे पुस्तक, 'अर्टिफिशियल इंटेलिजियन्स'

इमेज
      सध्या आपल्यापैकी अनेकांचा दिवस ए.‌आय. हा शद्ब कूठेना कुठे ऐकल्याशिवाय जात नसेल .ए.आय.ने ने जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रात प्रवेश केल्याचे चित्र आपणास दिसतयं. आता ए.आय.अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजियन्स, हे तंत्रज्ञान मुळात काय आहे? हे तंत्रज्ञान कोणत्या प्रकारे काम करते,? यंत्रामध्ये कोणते घटक असले म्हणजे आपण ए.आय.चा वापर करत असलेले यंत्र वापरतोय असे म्हणू शकतो. आपल्याला होतोयं त्या पेक्षा वेगळा असा ए.आय.चा उपयोग इतर व्यक्तींना होत असेल का? ए.आय. तंत्रज्ञानाचा विकास कधीपासून सुरू झाला, आतापर्यत ए.आयच्या विकासातील टप्पे कोणते?भविष्यातील ए.आय.ची वाटचाल कशी असेल.?यामुळे कोणते सामाजिक प्रश्न निर्माण होतील? त्यावर कोणते उपाय करता येईल ? भविष्यातील धोके ओळखून आताच पाउले उचलायला सुरवात झाली आहे?या सारखे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने आपल्या मनात येत असतील. मनात आलेल्या या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करात असाल त्यात काही प्रश्नांची उत्तरे मिळाली देखील असतील.मला देखील यासारखे काही प्रश्न पडले होते.त्याची उत्तरे शोधताना मला एक खजिना गवसला.या खजिन्यामुळ...

मुळातून नैसर्गिकशास्त्र शिकवणारे पुस्तक, 'किमयागार'

इमेज
  आपल्याकडे वारंवार मराठी भाषा टिकली पाहिजे,असा घोष लावला जातो. मात्र सध्याचा २१व्या शतकात  भाषा  किती जुनी आहे.तीला अभिजात दर्जा आहे का? यापेक्षा त्या भाषेत किती ज्ञाननिर्मिती होते.यावरच भाषा वाढणार आहे. हा महत्तवाचा मुद्दा मराठी भाषा हितचिंतकांकडुन दुर्लक्षिला जातो. फारच थोड्या व्यक्ती मराठी भाषा ज्ञानवर्धक होण्यासाठी प्रयत्नशील राहतात.या मोजक्या व्यक्तीमध्ये समाविष्ट होणारे नाव म्हणजे 'अच्युत गोडबोले'. आतापर्यत अच्युत गोडबोले यांनी मराठी भाषेत आतापर्यत विविध विषयांवर सविस्तर माहिती देणारी पुस्तके लिहली आहेत.जी सर्वच्या सर्व बेस्ट सेलर ठरली आहेत. त्यातीलच एक असलेले 'किमयागार' हे पुस्तक मी ंनाशिकमधील सर्वात जूने सार्वजनिक वाचनालय असलेल्या 'सावाना'च्या मदतीने वाचले. मनूष्य कोणत्याही जाती,धर्माचा आस्तिक अथवा नास्तिक असो, त्याच्या आयुष्यावर परिणाण करणाऱ्या 'नैसर्गिक शास्त्रांच्या भौतिकशास्त्र (फिजिक्स ),रसायनशास्त्र (केमिस्टी) पृथ्वी विज्ञान (अर्थ सायन्स), जीवशास्त्र (बायोलॉजी) या शाखांची ओळख करून देण्यात आली आहे.                ...

खर खुर आत्मचरीत्र .... स्मृतिचीन्हे

इमेज
आपल्या मराठीत आत्मचरित्रांची मोठी परंपरा आहे. मात्र बहुसंख्य आत्मचरित्रात स्वत:चे दोष मान्य करा सोडाच,आपल्यात मुळात नसणारे चांगले गुण स्वत:ला चिकटवलेले दिसतात.फारच कमी आत्मचरित्रात आपले खरे आयुष्य रेखाटलेले स्पटपणे जाणवते.संख्येने मोजके असलेल्या या आत्मचरित्रात ठळकपणे आपले लक्ष्य वेधून घेते, लक्ष्मीबाई टिळक यांचे आत्मचरित्र ' स्मृतिचिन्हे'. कोणतेही भाषिक पांडित्य न दाखवता सहजसोप्या मराठीत सुद्धा किती सकस लिहता येते, हे बघायचे असल्यास या आत्मचरित्राखेरीज दुसरे पुस्तक मराठीत सापडणे, काहीसे अवघडच म्हणता येईल.आपण आपलेच आत्मचरित्र तर वाचत नाही ना, असे वाटावे इतका सत्यपणा या ५९१ पानांच्या पुस्तकात पदोपदी जाणवतो. जगात कोणीही सुपर ह्युमन म्हणून जन्माला येत नाहीत.आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या अडचणी आपणास अनुभवायला येतात,त्याच प्रकारच्या अडचणी अनुभव मोठमोठ्या व्यक्तींना देखील येतात. मात्र या अडचणीतून मार्ग काढताना त्यांनी वेगळे मार्ग अवलंबल्यामुळे किंवा अनुभवातून आपल्यापेक्षा अधिक चांगला अनुभव गाठीसी धरल्यामुळे त्या व्यक्ती महान होतात, हे आपणास या पुस्तकाच्या वाचनातून समजते. ल...