सिंहावलोकन भारत आणि भारताचे शेजारी देश
ग्रेनीयर कॅलेंडर २०२५ सुरु होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे हा कालावधी नव्या वर्षाचे नियोजन करण्याच्या म्हणता येईल . नव्या वर्षाचे नियोजन अचूक व्हावे यासाठी आपण सरत्या वर्षाच्या आरंभी कोठे होतो ?या सरत्या वर्षात आपली प्रगती कोठे झाली .?कोठे प्रगती झाली नाही ? हे माहिती असणे आवश्यक आहे .हे सर्व कळण्याच्या उत्तम मार्ग म्हणजे सरत्या वर्षाचे अवलोकन करणे जी गोष्ट व्यक्तीला लागू होते तीच गोष्ट देशाला देखील लागू होते भारताचे जवाबदार नागरिक या नात्याने आपल्या भारताबाबत आपणास या गोष्टी आपणस माहिती असणे आवश्यक आहे जर आपणास या गोष्टी माहिती असल्यास आपण लोकप्रतिनिधींना त्याबाबत डब्बावा करू शकतो चला तर जाणून घेउया या सरत्या २०२४ वर्षात भारत आणि भारताच्या शेजारील देशाबरोबर संबंध कसे राहिले ?
या सरत्या वर्षात भारताच्या शेजारील बहुतेक सर्व देशात निवडणुका झाल्या .मार्च महिन्याच्या सुरवातीला बांगलादेशात निवडणुका झाल्या बांगलादेशात सत्ताधिकारी अवामी लीग पुन्हा सत्तेत आला . या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे विरोधी पक्षाकडून बहिष्कार टाकण्यात आल्या . प्रमुख विरोधी पक्ष नसताना झालेल्या या निवडणुकीत सत्ताधिकारी अवामी लीग सत्तेत आला या देसधाच्या नेत्या शेख हसीना यांनी पंतप्रधान पदी येताच पहिल्यांदा चीनचा दौरा केला स्वातंत्र्यसैनिकांना किती आरक्षण देयचे या मुद्यावरून सुरु झालेल्या आंदोलनाला हिसंक वळण लागले त्यामुळे त्यांना देश सोडावा लागला त्यानंतर झालेल्या अराजकतेमध्ये मोहमद युनूस याना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नेमण्यात आले या अराजकते बांगलादेशात होणाऱ्या हिंदू धर्मियांवर होणाऱ्या अत्याचारामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध मोठ्या प्रमाणात ताणले गेले आपल्या भारतात विविध ठिकाणी बांगलादेशात होणाऱ्या अत्याचाराविरोध निषेध मोर्चे निघाले
श्रीलंकेचा विचार केला असता तिथे अधयाक्षपदाच्या निवडणूक झाल्या दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात र्थिक गर्तेत सापडल्याने चर्चेत आलेल्या श्रीलंकेच्या निवडणूक त्या देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. या निवडणुकीत अनुरा कुमार दिसनायके हे राष्ट्रपती निवडणून आल्यावर त्यांनी भारताबरोबर माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, आणि दळणवलं आणि विविध क्षेत्रात करार केले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष बिमस्टेक या संघटनेच्या परराष्ट्र मंत्री स्तरावरील चर्चेसाठी भारतात आले मालदीवच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आपण भारताशी वैर पत्करून मोठी चूक केली आहे याची उपरती झाल्याने मॉडॆब्व कडून चीनबाबत अंतर राखत भारताशी मैत्री करण्यावर मालदीवचा पर्यटन राहिला .
पाकिस्तानचा विचार करता मागील वर्षापमाणेच याही वर्षी संबंध राहिले शांघाय को ऑपरेशन या संघटनेच्या परराष्ट्र मंत्री स्तरीय परिषदेसाठी आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हे पाकिस्तानात जर का ? यावरून बरीच चर्चा झाली अखेर फक्त परिषदेसाठी जाणार पाकिस्तानशी कोणत्याही स्थितीत द्विपक्षीय चर्चा होणार नाही असे जाहीर करत आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर पाकिस्तानला गेले वर्षाच्या अखेरीस चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला भारत पाकिस्तानमध्ये जाणार कि नाही यावरून बराच गदारोळ झाला अखेर भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही हे स्पष्ट झाले अफगाणिस्तानचा विचार करता भारताने अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीला अद्याप मान्यता दिलेली आंही मात्र मानवतेच्या दृष्टिकोनातून अफगाणिस्तानला मदत म्हणून औषधे आणि अन्नधान्याची इराणमार्गे मदत करण्याचे धोरण सुरूच राहिले
चीनबाबत बोलायचे झाल्यास एप्रिल महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत भारत चीन संबंध सातत्याने माध्यमात चर्चेत राहील भारत ची सीमावादाबाबत आपले प्रर्ष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलेल्या विधानबाबत तसेचएप्रिल महिन्यात परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत भारत चीन सीमावादाबाबत केलेल्या दाव्यामुळे आणि राष्ट्रे सुरक्षा सल्लगार अजित डोवाल यांनी केलेल्या चीन दौऱ्यामुळे चीन सातत्याने चर्चेत राहिला चीनने भारतीय घुसखोरी केल्याचाचे प्रकरण या वर्षात घडले नाही वर्षाच्या अखेरीस चीन गलवान खोऱ्याच्या घुसखोरीच्या घटनेच्या आधीची स्थिती आणण्याबाबत चर्चा झाली या वर्षात शांघाय कॉ ऑपरेशन ब्रिक्स या सारख्या परिषदमध्ये भारत आणि चीन यांचे प्रतिनिधी समोरासमोर आले मात्र दोन्ही देश खास चर्चेसाठीएकमेकांच्या देशात जाण्याचे जाण्याचे प्रकार यावर्षी घडले नाहीत
नेपाळ आणि भूतानचा विचार करता, भूतानबाबत काही घडामोडी घडल्या नाहीत नेपाळमध्ये सत्तानंतरण होऊन पुष्ककमल प्रचंड पंत्रप्रधान झाले त्यांनी सत्तेची सूत्रे सांभाळल्यानंतर त्यांनी पहिला दौरा चीनचा केला आपल्या नकाशाद्वारे भारताची खोडी काढण्याचे नेपाळ;ने या वर्षी दोन ते तीन प्रकार केले मात्र ते फारसे चर्चेत आले नाही एकंदरीत भारतासाठी हे वर्ष महत्त्वाचेच ठरले


टिप्पण्या