पोस्ट्स

नात्यातील ढोंगीपणा उघड करणारे गाणे

इमेज
      आपल्या भारतातील चित्रपटांतील महत्तवाचा भाग म्हणजे त्यातील गाणी. जगात इतर भागातील चित्रपटांमध्ये गाणी शक्यतो आढळत नाही. भारतीय चित्रपटांत प्रामुख्याने आढळणाऱ्या या गाण्यातून मानवी जीवनाच्या सर्वच अंगाना स्पर्श केलेला आढळतो.  या गण्यातून ज्या प्रकारे मानवी आयुष्यातील रंजकता, सकारात्मक बाजू दाखवण्यात येते त्याचप्रमाणे मानवी आयुष्यातील दाहकता कटु सत्य मानवी आयुष्यातील वास्तविकता देखील तितक्याच प्रभावीपणे दाखवण्यात भारतीय चित्रपटातील गीते यशस्वी झालेली दिसतात.      याच मानवी आयुष्यातील कटू बाजू दाखवणारे एक प्रसिद्ध गाणे म्हणजे श्रेष्ठत्तम  बॉलीवूड चित्रपट निर्माते,दिग्दर्शक, अभिनेते  गुरुदत्त निर्मित  प्यासा या चित्रपटातील 'ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है!' हे गाणे .तसे बघायला गेलो तर प्यासी मधील सर्वच गाणी मानवी आयुष्यातील ऋणात्मक बाजू आपल्या समोर आणत असली तरी मला 'ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या हे' हे गाणे विशेष मनाला भावते.     मानवी नाते मुख्यत: स्वार्थावर अवलूंबन असतात.त्यात जिव्हाळा ममत्व ...

मानवी आयुष्यातील छंदाचे महत्त्व स्पष्ट करणारा चित्रपट,' जब वी मेट'

इमेज
चित्रपट हे मोठे सशक्त माध्यम आहे‌.मनोरंजनाबरोबर चित्रपटातून मोठा संदेश देता येतो, आणि तो देण्यात येतो देखील. निव्वळ टाईमपास फालतू प्रेमकथांचे चित्रपट म्हणून ज्या बॉलिवूडचा उल्लेख होतो ते देखील याला अपवाद नाहीये. बॉलिवूडच्या चित्रपटातून जीवनाविषयक अनेक बाबी आपणास समजतात. याच मालिकेतील  जीवनाबाबत मोठे शिक्षण देणारा एक उत्कृष्ट  चित्रपट म्हणून 25 ऑक्टोबर 2007 रोजी प्रदर्शित झालेला 'जब वी मेट' कडे बघता येईल.         स्वत:च्या निर्णयाची जवाबदारी स्वत:कडे  कोणत्या प्रकारे घेयची‌.ते निर्णय फसले  तरी त्याबाबत दुसऱ्याला  दोष न देता त्याही स्थितीत स्वतः अपयशाची  जबाबदारी घेत, त्याला हसत हसत सामोरे  कसे जायचे.आयुष्यात छंदाचे महत्त्व काय असते? हे महत्त्वाचे संदेश या चित्रपटातून देण्यात आले आहेत.       मनुष्य त्याच्या रोजच्या जगण्यात कितीही व्यस्त असला तरी मनुष्याने त्याच्या छंदासाठी काही वेळ काढला पाहिजे.छंदामुळे वेळ वाया जात नाही, तर व्यक्तीस रोजच्या जगण्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विशेष बळ मि...

पुन्हा एकदा संतोष माने!

इमेज
.    ती नेहमीप्रमाणे पुण्यातील एक सकाळ होती सुट्टीचा दिवस नसल्याने सर्वजण कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले होते मात्र काय त्यांच्यावर ओढवणार आहे याची त्यांना काहीही कल्पना नव्हती. त्यावेळी अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या ठिकाण असणाऱ्या स्वारगेट परिसरात एका एसटी बस ड्रायव्हरने बस भरधाव पणे बस चालवत नऊ जणांना मृत्युमुखी पाडले तर किमान 30 जणांना गंभीरित्या जखमी केली  आज ही  घटना संतोष  माने प्रकरण या नावाने प्रसिद्ध आहे. ही घटना घडली 25 जानेवारी 2012 रोजी त्यानंतर या प्रकरणातील आरोपी संतोष माने यांच्यावर पुणे सत्र न्यायालय मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात खटला चालला . पुणे सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी संतोष माने यांना फाशीची शिक्षा सुनावली मात्र सर्वोच्च न्यायालयाने ते हे कृत्य करताना तणावात होते असे निरीक्षण नोंदवात त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. आज संतोष माने येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय . संतोष माने यांनी वरिष्ठांचा जाचाल कंटाळून हे कृत्य केले होते मात्र आज हे वरिष्ठ शांतपणे आपल्या घरात बसले असतील.आणि संतो...

डिजीटल कचराय् नम:

इमेज
सध्याचा अति जलद दळणवळणाचा काळात, आपल्याकडे एका विशिष्ठ प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत असतो.कचरा आणि दळणवळण ,चमकलात ना? कचराचा आणि दळणवळणाचा काय संबंध ,आपण काहीतरीच वाचत नाही ना, असे आपणास वाटू शकते.तर सांगतो हा आहे डिजीटल कचरा.आपल्या मोबाईल मेमरीतील नको असणारे मात्र डिलीट न केलेले व्हिडीओ, फोटो, व्हाटसप सारख्या सोशल मिडीयाचा वरील बऱ्याच दिवसात न उघडलेले ग्रुप यातून हा कचरा निर्माण होतो. हे सर्व निर्माण होण्यासाठी प्रगत दळणवळ मोठी सहाय्यक भूमिका बजावते हे आपण जाणताच.या प्रगत दळणवळणामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात काढण्यात आलेला व्हिडिओ किंवा फोटो क्षणार्धात आपल्या मोबाईल मेमरीचा भाग होतो.आणि डिजीटल कचऱ्याच्या निर्मितीस भाग होतो.त्याचप्रमाणे सोशल मिडीयातील गेल्या कित्येक दिवसात न उघडलेले विविध ग्रुप देखील डिजिटल कचऱ्याच्या निर्मितीत मोठा हातभार लावतात.जरी ठराविक कालावधीनंतर मेसेज डिलीट करण्याची सोय असली तरी तूम्ही disapring हे फिचर्स वापरल्याने हा मेसेज डिलीट झाला आहे हे दाखवत त्या मेसेजची आठवण आपणास करत हे मेसेज डिजीटल  कचऱ्याची निर्मिती करत आपला फोन विनाकारण हळू करतात ...

बदलत्या तंत्रज्ञानाची सखोल सविस्तर माहिती देणारे पुस्तक 'इंडस्टी 4.0

इमेज
सध्याचे जग तंत्रज्ञानाचे आहे. आता जगात तूमच्या शारिरीक शक्तीपेक्षा अधिक महत्व तंत्रज्ञानाचे आहे हे आपण रोजच्या जगण्यात पदोपदी अनुभवतोच, या सातत्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगात आपण मागे पडू नये यासाठी आपण सर्वच जण आपल्यापरीने प्रयत्नशील देखील असतो .मी देखील या प्रयत्नात असताना मला एक खजिना गवसला तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेल्या आय.बी एम.सारख्या प्रख्यात कंपनीत काही काळ कार्यरत असणारे डॉ .भुषण केळकर सरांनी लिहलेले इंडस्ट्री 4.0 हे पुस्तक.       केळकर सरांच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाने पुस्तकाला परीपुर्ण केले आहेच हे सांगायला नकोच. सरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी.केल्यामुळे डॉ.भूषण केळकर सरांचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रेष्ठत्व वेगळे सांगायलाच नको. डॉ.भूषण केळकर सरांनी लोकमतच्या ऑक्सिजन या तरुणाईसाठीच्या पुरवण्यांसाठी लिहलेल्या लेखांचे पुस्तकस्वरुपात पुनर्प्रकाशन म्हणजे हे पुस्तक .डॉ.भुषण केळकर सरांच्या त्या लेखमालिकेला त्यावेळी संपुर्ण महाराष्ट्रातील लेख...

शनी ग्रहाविषयी या बाबी आपणास माहिती आहेत ना !

इमेज
शनी नाव ऐकताच अनेकांना धडकी भरणारा ग्रह. साडेसातीमुळे ज्योतिषशास्त्रात प्रसिद्ध असलेला ग्रह. मात्र हा शनी ग्रह खुपच रंजक आहे‌. गेल्या काही दिवसांमध्ये  खगोलशास्त्राचा विचार करता दोन गोष्टीमुळे हा ग्रह विशेष चर्चेत आलायं. त्या गोष्टी आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन           तर मित्रांनो साडेसाती वगळता शनी म्हटल्यावर जी गोष्ट लगेच समोर येते,ती म्हणजे त्याचे कडे. शनीखेरीज गुरु, युरेनस, नेपच्युन या ग्रहांना देखील कडे असले तरी कडी असलेला ग्रह म्हटल्यावर नाव समोर येते ते शनीचेच.माझे खगोलशास्त्रप्रेमी मित्र आहेत ते जेव्हा जाहीर आकाशदर्शनाचे कार्यक्रम करतात तेव्हा लोक त्यांना शनीच्या कडी दुर्बिणीतून दाखवा असी मागणी करत असतात. ही कडी निर्माण होण्याचा दोन शक्यता सांगितल्या जातात.त्यातील पहिली म्हणजे काही कारणाने लाखो वर्षापुर्वी शनीचा एका उपग्रह काही अज्ञात कारणाने खुपच जवळ आला त्यामुळे त्या उपग्रहावरील शनीचे गुरुत्वाकर्षण मोठ्या प्रमाणात वाढले या वाढलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्या उपग्रहाचे तूकडे झाले जे आपण शनीच्या कड्याचा रुपात बघत आहोत.एखादा खगोलीय...

एसटी महामंडळाची उलट गंगा!

इमेज
    सध्या आपल्या भारतातील सर्वच सार्वजनिक बसवाहतूक महामंडळे  प्रवाश्यांना अधिकाधीक उत्तम सेवा कोणत्या प्रकारे देता येईल,यासाठी प्रयत्नशील आहेत.राजस्थान, उत्तर प्रदेश सारख्या गरीब राज्यांचे  महामंडळ सुद्धा या स्पर्धेत मागे नाहीये.मात्र म्हणतात ना, प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो तसा या नियमाला एक अपवाद आहे.आपले महाराष्ट्र एसटी महामंडळ. आपले महामंडळ घडाळ्याचे काटे मागे फिरवत आपणास 2008 सालची अनुभुती देण्यासाठी पुढे सरसरावले आहे. महामंडळाने 4मार्च रोजी पुर्णत: तयार असलेल्या  बसची खरेदीची ऑर्डर देण्यासाठी काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. तर मित्रांनो  आपल्या भारतात सार्वजनिक बसवाहतूक व्यवस्थेत सर्वप्रथम 2×2 या पद्धतीची आसने बसवून  प्रवाश्यांना आरामदायी प्रवाश्याची अनुभुती देणाऱ्या आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाने पुन्हा एकदा 3×2 बसेस चालवण्याचे ठरवले आहे‌.4 मार्चच्या काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. तसेच आता  हवेच्या दाबाने उघडणारे न्युमटिक दरवाजे ही बसेससाठी सर्वसामान्य बाब झाली असताना, या बसेससाठी पुर्वीप्रमाणे खटकीच...