हे.पण घडत होतं!

गेल्या काही दिवसापासून नवी मुंबई परीसराात आईनचततघडवून आणलेल्या हत्येच्या बातम्यांना आपण परीचीत असालच . माञ जगातच काय आपल्या भारतातच अनेक महत्वाचा घटना त्यावेळी घडत होत्या. आणी घडत आहेय ज्याचे अत्यंत दुरगामी परीणाम होणार आहेत . भारताच्या ईशान्य भागात असणार्या "मणीपुर " या राज्यात घडणार्या घटनाही याच मालीकेतील आहेत . आणी या घटना कधी घडता आहेत .तर मणीपुर च्या उत्तरेला असणार्या नागालँड राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असताना हे घडत आहे . मणीपुर या राज्याशी उर्वरीत भारताशी संबध येतो तो प्रामुख्याने नागालँड मधून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचा माध्यमातून .मागे काही वर्षापुर्वी नागालँड मध्ये अशांतता निर्माण झाल्यावर पेट्रोलचे भाव सातव्या आसमानच्या सातव्या आसमानला पोहचले होते . तेथील रॉबीन हूड समजल्या जाणार्या व्यक्तीचे शव तेथील समाज शासनाकडे माडलेल्या मागण्या मान्य होण्यापर्यत स्विकारण्यास देखील तयार नव्हता .आता तेथील परीस्थिती निवळत आहे . तर याच मणीपुरच्या एका बाजूला असणार्या आसाम मध्ये गंभीर पुरस्थिती निर्माण होत आहे .आपल्याकडे अष्टभगीनी विषयी बातम्या तश्या कमीच येतात . या अष्टभगीनी आणी त्यांचा राजधान्या या आपल्यापैकी खुप कमी लोकांना माहिती असतात . त्यातला त्यात मेघालय बांगलादेशी घुसखोर आणी अरुणाचल प्रदेश चीनमुळे काहीसा चर्चेत असतो . बाकी ञिपूरा नागालँड मणीपूर मिझोराम सिक्कीम आसाम हे अत्यंत कमी चर्चेत असतात .आसामी भाषेत सुध्दा अखील भारतीय आसामी साहित्य संमेलन होते . असो आपण सध्या राबवत असलेल्या एँक्ट ईस्ट पॉलीसीमुळे या भागाला अनन्य साधारण महत्व आले आहे . आपल्या भारतात जे काही महत्वाचे तेल उत्पादक क्षेञ आहे त्यात आसाम मधील तेल उत्पादक क्षेञ महत्वाचे आहे (ज्येष्ट पञकार आणी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या हा तेल नावाचा ईतिहास आहे या पुस्तकात येथील तेलविहीर आशियातील पहिली तेल विहीर असल्याचा आणी जगात पहिली तेल विहीर खोदल्याचा नंतरच्या सातव्या वर्षी ही तेल विहीर खणल्याचा उल्लेख आहे) आपण करत असलेल्या आयातीमध्ये क्रुड तेलाचा क्रमांक पहिला (आणी दुसरा सोने )आहे तसे या विषयी खुप काही बोलता येवू शकते माञ समयभयास्तव थांबतो
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?