पाउले चालती धोक्याची वाट!

सर्वप्रथम आंतराष्ट्रिय डावखुर्या दिनानिमित्त सर्व डावखुर्यांना शुभेच्छा आणी संवेदनशील मनाचे मराठीतील मान्यवर कवी ज्यांचा रेल्वेरूळावर म्रुत्यू झाला ते बालकवी आणी प्रख्यात राज्यकरणी पञकार साहित्यीक वर्तमानापासून 10हजार वर्षे मागे आणी पुढे ज्यांची सत्ता चाले असे आचार्य अञे यांना त्याचा जयंती निमित्य मानाचा मुजरा 
असो तर सांगायचा मुद्दा असा की 11 आणी 12आॉगस्टला चीनने त्यांचा चलनाचे अवमूल्यांकन केले . जे गेल्या 28वर्षातले सर्वात मोठे अवमुल्यन आहे .चीनने त्याचा कडील सोने बाजारात आणले आहेच . चीनचा शेअर बाजार ही मोठ्या प्रमाणात कोसळला होताच .जिसटी त्याचा निर्धारीत वेळी म्हणजेच 1एप्रिल 2016 ला लागू होतो का ? या बाबत मी तरी साशंक आहे . युरोपातील ग्रीसचे संकट पुर्णपणे दूर झालेले नाही . भारतातील औद्योगिक द्रुष्ट्रा महत्वाचा समजल्या जाणार्या महाराष्ट्रातील काही भागावर दुष्काळ आहे . ज्यामुळे अवलंबीत लोकसंख्येचा विचार केला असता प्रचंड माञ उत्पादनाचा विचार केला असता अर्थव्यवस्थेत नगण्य ठरणार्या शेती या घटकावर अनिष्ट परीणाम होणार . राजस्थान सारख्या कमी पर्जन्यमानाचा प्रदेशात पूर हा (हवामानातील ईष्ट की अनिष्ट बदल ते तूम्ही ठरवा ) आपल्यावर परीणाम करणार हे नक्की . महाराष्ट्रातील औद्योगीक द्रूष्ट्या महत्वाचा समजल्या जाणार्या नाशकातील एका बहुराष्ट्रीय कंपनीतील संपान दिवसाचा भाषेत नव्वदी ओलांडली आहे . संपाची बाब न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिक भाष्य नाही . अर्थव्यवस्थेचा नियंञणांबाबतीत
अर्थमंञालय आणी रिझर्व बँक यात मस्त ढुसुब ढूसुब चालू आहे .आणी मराठी व्रुत वाहीन्या काय करत आहे ते आपण सर्व जाणताच .टायट्यानिक नावाचा इंग्रजी चिञपटात शोभून दिसेल अशी परीस्थीती आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये .त्यात ज्या प्रमाणे जहाज पूर्णपणे बूडून जावू स्तर वाद्ये वाजवली जात होती अगदी तशीच स्थिती सध्या दिसत आहे . मेक इन इंडीया आणी मेक इन महाराष्ट्र करण्यासाठी कोणता देश सध्या तयार होइल हा प्रश्नच आहे . यूनाटेड स्टेटस आॉफ अमेरीकेत नोव्हेंबर 2016 मध्ये अध्यक्षपदाचा निवडणूका आहेत .सर्व प्रकारची सरकारे निवडणूक काळात कशी वागतात हे जगजाहीर आहेच .तेव्हा तेथून भारताला माझ्यामते फारशी आशा नाही . युरोप आताच कशाबशा उभा राहतो आहे . आणी ज्याचा सुंभचा पिळच मुळी दहशतवाद आहे . आणी भारतात दहशतवाद पसरवणे हा ज्याचा पिंडच आहे . तो भारताचा शेजारी सध्या फारच जोमात आलाय . त्याचामुळे आमचे नाशिक पोलीस आणी ठिकठिकाणाहून आलेले पोलीस बंदोबस्ताबरोबरच चेंगराचेंगरी न होण्याची काळजी घेण्याचा दूहेरी संकटात सापडुन प्रचंड तणावात आहे .असो अफगाणीस्तान मधून नाटो सैन्य गेल्याने आणी विषारी सापाचा समुळ नायनाट करण्यापेक्षा त्याचा चांगला विषारी साप आणी वाईट विषारी असे वर्गीकरण केल्याने त्या शेजार्याला अजून चेव आला आहे . या विषयी खुप काही बोलता येवू शकते माञ तूर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत रामराम
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?