टोल नाका जीव वाचण्याचे साधन मे २७, २०१६

दिनांक 25 मे रोजी  पहाटे मुंबई  पुणे एक्सप्रेस हायवेवर पुण्यातील नामवंत बांधकाम व्यवसाईक दि एस कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात झाला त्यात त्यांचा चालकाचा जागीच मृत्यू झाला .याच महामार्गावर भक्ती बर्वे आनंद अभ्यंकर यांचा मृत्यू झाला होता (आज भारतात सर्वाधिक मृत्यू हे हार्टफेल आणि रस्ते अपघात या दोन कारणाने होत आहेत . ) या अपघातामागे रस्त्याचा उभारणीतील दोषांचा उहापोह माध्यमांव्दारे होत आहेत . रस्ते उभारणीतील हे दोष दुरुस्त होतीलच पण त्याला काही कालावधी द्यावाच लागेल लगेच करायचे उपाय लक्षात घेतल्यास आपणास टोल नाक्याचे महत्व दूर्लक्षून चालणार नाही ,आपणास दोन टोल नाक्यातील अंतर माहिती असतेच ते अंतर सूरक्षीत पणे पार करण्यासाठी किती वेळ लागेल हेही आपण सांगू शकतो . समजा तो कालावधी य आहे आता आपल्याला एकच करायचे .ते म्हणजे एका टोलनाक्यावरुन दूसर्या टोरलनाक्यावर जाण्यासाठी क्ष रुपये टोल  असेल तर य कालावधीत पोहचणार्या वाहनांना टोल मधून काही प्रमाणात सवलत द्यायची तर य कालावधी पेक्षा कमी काळात हे अंतर पार करण्यार्या वाहनांना क्ष या रक्कमेच्या चार ते पाच पट टोल भरायला लावल्यास लोक आपसूकच हळू चालवतील टोलच्या पावतीवर वेळ असतेच त्यामुळे हे काम सहज सोपे आहे असे मला वाटते
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?