नमो प्रशासनाचे हे बदल आपणास माहिती आहे का ?
नुकताच मी पुण्याहून नाशिकला प्रवास केला . प्रवासातील सहप्रवासी गपिष्ट होता , त्याच्याशी विविध विषयावर मनोसोक्त गप्पा रंगल्या . त्याच्यात मोदी सरकारची विविध क्षेत्रातील कामगिरी आणि त्यांनी अवलंबल्या सुधारणा हा विषय देखील होता . बोलण्याच्या ओघात त्या सह प्रवाश्याने नमो सरकारतर्फे प्रस्तावित असणाऱ्या मात्र माध्यमांद्वारे फारश्या चर्चेत नसणाऱ्या गोष्टींबाबबत देखील भाष्य केले . या माध्यमात न आलेल्या गोष्टी प्रामुख्याने वनांशी संबंधित होत्या .
त्या प्रवाश्याने सांगितले की , नमो सरकारतर्फे लवकरच भारतीय वन कायद्यांअंतर्गत सुधारणा करण्यात येणार आहेत. ज्यामुळे वनात राहणाऱ्या लोकांच्या अनेक हक्कांवर गदा येणार आहे . भारतीय वनहक्क नीती २००६ आणि पेसा या कायद्यावण्ये देण्यात येणाऱ्या अनेक हक्कांना त्यामुळे वनवासींना मुकावे लागणार आहे . सरकार जरी भारतीय वन हक्क कायद्यांत बदल करत असले तरी , जरी या कायद्याची आधारशीला म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल त्या भारतीय वननिती २०१४ बाबत सरकारची भूमिका अद्याप संदिग्ध आहे . ती वननिती अद्याप सरकारने जाहीर केलेली नाही . वननिती जाहीर न करता सरकाने उडी घेत कायद्याचा मसुद्याला हात घालणे गैर असल्याचे त्याने सांगितले .या नव्या प्रस्तावित बदलांमुळे नोकरशहांना अधिकचे अधिकार देखील मिळणार असून हा बदल वनवासी लोकांच्या केवळ आर्थिक नव्हे तर सांस्कृतिक जीवनावर देखील घाला घालणारा असणारा आहे . आजमितीला
भारताच्या एकूण लोकसंख्येच्या १० % लोकसंख्या ही वनात राहते . त्यावर हा घाला असणार आहे . इतक्या मोठ्या प्रमाणात हा बदल करणारा हा निर्यय असून देखील यावर माध्यमात काहीही चर्चा करण्यात आलेली नाही . मोदी सरकारने त्यांचा मागील कार्यकाळाच्या अखेरच्या टप्यात हा प्रस्ताव राज्यांच्या मान्यतेसाठी तसेच त्यांना अपेक्षित असणारे बदल सुचवण्यासाठी पाठवला खरा ,मात्र तो पर्यंत लोकसभेचे रणसिंग फुंकले गेले होते . त्यामुळे त्यावर अपेक्षित अशी चर्चा न झाल्याचे त्याने सांगितले . . नाशिक पुणे रस्ता सुधारल्याने त्याचा कडून इतकीच माहिती मिळून आमचा प्रवास त्या वेळेपर्यंत संपला . मात्र तो अल्पविराम होता, न की पूर्ण विराम मी त्यांचा दूरध्वनी नंबर घेतला आहे . या कायद्याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी

टिप्पण्या