आकडेवारी भोवळ आणणारी

       
   आपल्या भारतात लोकसंख्येचा विचार करुन सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या दहा शहरांची यादी केली असता त्यामध्ये पुणे  शहराचा (कँम्प आणि पिंपरी चिंचवड  परिसर वगळून )क्रमांक सन 2011 च्या अहवालानुसार आठवा आहे . त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार पुणे शहराची संख्या  (कँम्प आणि पिंपरी चिंचवड  परिसर वगळून ) ही 31 लाख आहे . हे सांगायचे कारण की ,दिनांक 19 ऑगस्ट 2020 रोजी केंद्र सरकारची एक संस्था असलेल्या CMIE मार्फत जुलै महिन्यात बेरोजगार झालेल्या व्यक्तींची प्रसिद्ध झालेली संख्या . CMIE मार्फत प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार देशभरात जुलै महिन्यात  व्हाईट कॉलर रोजगार काम करणाऱ्या  50 लाख व्यक्तीच्या नोकऱ्या गेल्या आहेत . समस्त लोकडाऊनचा विचार करता हा आकडा संपूर्ण मुंबई महानगर रिजनल डेव्हलमेंट  ऑथॉरिटी (MMRDA) क्षेत्रातील एकूण लोकसंख्येएव्हढा अर्थात  पावणे दोन कोटी आहे . (मुंबई देशातील 3 ऱ्या क्रमांकाचे शहर आहे . हे आपण लक्षात घेतले पाहिजे ) . CEMIS मार्फत प्रसिद्ध प्रसिद्ध झालेली ही आकडेवारी संघटित क्षेत्रातील आहे , असंघटित क्षेत्रातील व्यक्तींचा विचार करता यातील धोका सहज लक्षात येईल . 
                        देशभरात रोजगाराचे इतके मोठे संकट उभे असताना देखील भारतातील इंग्रजी भाषेतील वृत्तवाहिन्या एका अभिनेत्याचा मृत्यूवर तासन तास चर्चा करत आहे . लोकशाहीच्या 4 स्तंभापैकी एक असणाऱ्या एका स्तंभाची  देशातील महत्वाच्या प्रश्नाबाबतची अशी भूमिका खरोखरीच विचार करायला  लावणारी आहे दुर्दैवाने दुसरा महत्वाचा स्तंभ असणाऱ्या विधिमंडळाकडून देखील हा लेख लिहीत असण्याचा वेळेपर्यंत जुलै महिन्याचा या आकडेवारीबाबत कोणतेच अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही . 
            चॅनेल न्यूज एशिया या सिंगापूर येथील वृत्तवहिनीच्या वृतानुसार भारताची अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर अपेक्षित असणाऱ्या दरापेक्षा कमी असणार आहे . मात्र या बाबत आपणाकडून काही करण्यात येत असल्याचे मला तरी दिसत नाहीये . एकेकाळी सर्वाधिक ऑस्कर जिंकणाऱ्या टायटॅनिक या चित्रपटातील दृश्याप्रमाणे जहाज बुडत असताना देखील वाद्य वाजवणाऱ्या वाद्यवृंदाची आठवण आल्याशिवाय हे चित्र बघून आल्याशिवाय राहत नाही . चित्रपटात ते सर्व लोक मृत्युमुखी पडलेले दाखवलेले आहेत तसे भारतीयांचे ना होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?