२०२२ -२३ च्या अर्थसंकल्पात रेल्वेचा विचार करता महाराष्ट्राला काय मिळाले ?

         

        नुकताच आपल्या भारताचा आर्थिक वर्ष २०२२-२३ चा अर्थसंकल्पात जाहीर झाला.  सन २०१६ साली १९२३ पासून सुरु असणारी प्रक्रिया खंडित झाली आणि रेल्वे अर्थसंकल्प मूळ अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला , ज्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात होणाऱ्या विविध घोषणा थांबल्या.  ज्यामध्ये येणाऱ्या वर्षात सुरु होणाऱ्या प्रवाशी रेल्वेगाड्या , रेल्वेतर्फे होणारे विविध विकासकामे जसे नव्या मार्गाची निर्मिती , अस्तित्वात असणाऱ्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण तिहेरीकरण  , गेज बदलणे, डिझेल मार्गाचे विद्युतीकरण वगैरे .आज ज्या प्रमाणे पूर्वी  इतर मंत्रालयाच्याबाबत  तरतुदी घोषित केल्या जात  असत त्याच प्रमाणे रेल्वेबाबतच्या तरतुदी घोषित केल्या जातात.  मात्र त्यामुळे प्रत्येक गोष्टीला किती खर्च आला या विषयी सविस्तर माहिती अर्थसंकल्पाच्यावेळी मिळत नाही रेल्वे मंत्रालयाकडून अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर काही दिवसानी  याबाबत विभागनिहाय माहिती प्रसिद्ध करण्यात येते जसे की मध्य रेल्वेच्या अंतर्गत पुढील कामांसाठी इतके रुपये राखून ठेवले आहेत दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत पुढील कामासाठी इतके रुपये राखून ठेवले आहेत वैगेरे . रेल्वेच्या भाषेत याला पिंक बुक म्हणतात आर्थिक वर्ष २०२२-२३ चा विचार करता महाराष्ट्रासाठी खूप गोष्टी ठेवल्याचे या पिंकबुकमधून दिसते चला तर जाणून घेऊया या तरतुदी 
                महाराष्ट्राचा विचार करता  पुणे हे पूर्ण प्रशासकीय विभाग,नाशिक प्रशासकीय विभागातील नंदुरबार जिल्हा सोडून संपूर्ण नाशिक प्रशासकीय विभाग   अमरावती प्रशासकीय विभागातील यवतमाळ हा जिल्हा सोडून संपूर्ण अमरावती प्रशाकीय विभाग , नांदेड प्रशासकीय विभागातील लातूर जिल्हा आणि नागपूर  प्रशासकीय विभागातील पश्चिम भागातील जिल्ह्यांचा समावेश होतो महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग मध्य रेल्वेच्या अंतर्गत येते . त्यामुळे त्या तरतुदी पहिल्यांदा बघूया या भागात रेल्वेच्या पिंक बुकमध्ये एकूण ४५ कामांचा सहभाग आहे ज्यामध्ये कल्याण कर्जत इगतपुरी कसारा ,इगपुरी भुसावळ  विविध भागात रेल्वेच्या मार्गाचे तिहेरीकरण चौपदरकीरण काही
मार्गवर विविध पुलांचे कामांसह पुणे मोरगाव मार्गे अहमदनगर , मोरगाव जेजुरी चांदुर बाजार अमरावती अहमदनगर नेवासा , लातूर गुलबर्गा नाशिक रोड शिर्डी , औरंगाबाद ते पुणतांबा औरंगाबाद ते भुसावळ आदी विविध मार्गांसाठी  सर्वेक्षण आणि प्रारंभिक अभियांत्रिकी कामे यांचा समावेश आहे मध्य रेल्वेसाठी या अंदाजपत्रकात ६२९१० हजार कामांची तरतूद केली आहे जी मागच्या वर्षी केलेल्या ५१३४० हजार रुपयांपेक्षा अधिक आहेत मध्यप्रदेशच्य्या काही भागांचा  समावेश असणाऱ्या मध्य रेल्वेच्या एकूण कामाचा विचार करता महाराष्ट्राच्यासाठीच बहुसंख्य कामे आहेत 
           लातूर जिल्ह्याचा अपवाद वगळता संपूर्ण मराठवाडा आणि  विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यतील काही भागांचा  समावेश होणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या रेल्वेचा सर्वात जास्त भर तेलंगण राज्यवार दिसत आहे या रेल्वेत समाविष्ट होणाऱ्या हैद्राबाद कर्नाटक (आपल्या महाराष्ट्रासारख्या निजामाच्या राजवटीत येणारा कर्नाटकाचा भाग ) आणि मराठवाड्याबाबत दुजाभाव केल्याचे दिसत आहे या विभागात एकूण ४७ कामाचा समावेश करण्यात आलेली आहेत त्यातील फक्त ६ कामे महाराष्ट्राशी संबंधित आहे बल्लारशा ते  आदीलाबाद,  नांदेड ते बिदर या दोन नव्या मार्गाच्या उभारण्याबाबत सर्वक्षण करणेमी  परभणी परळी या रेल्वेमार्गागाचे दुदुपदरीकरण  करणे,  पूर्ण रेल्वे जंक्शनला बायपास लाईन उभारणे,  बल्लारशा आणि काजीपेठ या रेल्वेमार्गावर चौथी मार्गिका उभारणे, तसेच अकोला पूर्ण रेल्वेमार्गाला पूर्णता जंक्शनला मनमाड लाईनला जोडणे  हीच कामे मला दिसली  
      मुंबईचा काही भाग पालघर नंदुरबार हे दोन जिल्हे असणाऱ्या पश्चिम रेल्वेत महाराष्ट्राच्या वाट्याला एकाच काम आले आहे नंदुरबार ते उमरपाडा या ११० किमीच्या अंतरासाठी सर्वेक्षण हे एकच काम मला महाराष्ट्रासाठी दिसले 
प्रामुख्याने कर्नाटक राज्याचा समावेश असणाऱ्या दक्षिण पश्चिम रेल्वेभागासाठी धारवाड कोल्हापूर या रेल्वेमार्गाचा विचार करण्यात आला आहे प्रामुख्याने मध्य प्रदेशमध्ये विस्तार असणाऱ्या पश्चिम मध्य रेल्वेमध्ये इटारशी हे
भुसावळ या रेल्वेमार्गावर रेल्वेची तिसरी मार्गिका टाकण्यात येणार आहे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग भंडारा गोंदिया गडचिरोल हे पूर्ण ज्जीळे आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या समावेश असणाऱ्या पूर्ण मध्ये रेल्वेबाबत मला माहिती मिळू शकली नाहीमहाराष्ट्रातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या कोकण रेल्वेचा कारभार रेल्वे मंत्रालयाळकडून न बघता केंद्राकडून स्वतंत्रपणे बघण्यात येतो त्यामुळे ती माहिती मिळू शकलेली नाही  
हे बघता महाराष्ट्राला रेल्वेकडून बरेच काही देण्यात आले असले तरी अजून बरेच काही देण्याची गरज आहे हेच खरे  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?