भारताच्या वैभवशाली वारश्याची ओळख करुन देणारे पुस्तक, 'सिंधू -हरवलेली संस्कृती'
आपल्या भारताला आदिम काळापासून मोठा वैभवशाली वारसा मिळालेला आहे. आहे.मानवाला लेखन कला अवगत नव्हती त्या म्हणजेच इतिहासकारांचा मते pre history काळ असो किंवा मानवाला लेखनकला अवगत होती मात्र अद्याप तीचा उलगडा मानवाला झालेला नाही अस्या कालखंडात अर्थात proto hostory कालखंड असो किंवा इतिहासकारांच्या मते ज्याला history peroid (ज्याचे accient ,mideverial, modern असे तीन भाग पडतात) म्हणतात त्या कालखंडातील असो या सर्वच कालखंडात भारताला वैभवशाली वारसा मिळाल्याचे इतिहासाच्या शास्त्रीय पद्धतीने संशोधनातून वारंवार सिद्ध झाले आहे.याच विस्तीर्ण कालखंडातील एक महत्तवाचा टप्पा म्हणजे सिंधु सरस्वती संस्कृतीचा कालखंड होय. आपल्या दुर्दैवाने भारताच्या या प्राचीन वारस्याची माहिती देणाऱ्या पुस्तकाची आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वानवा आहे.मात्र काळकुट्ट अंधारात मिणमिणती पणती मोठ्या प्रमाणात उजेड निर्माण करते त्याचप्रमाणे हा अभाव दुर करण्याचे काम सनय प्रकाशनतर्फे प्रकाशित अनुवादीत पुस्तक 'सिंधू हरवलेली संस्कृती' हे पुस्तक काही प्रमाणत करते .
या पुस्तकात 240 पानांमधून 12प्रकरणांमधून या संस्कृतीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.ज्यात या संस्कृतीच्या अधिकृत शोध लागण्याचे मानण्यात येते त्या 1923 चा रेल्वेमार्ग तयार करण्याचा घटनेच्या आधीपासून या ठिकाणाबाबतची विविध तज्ञ्ज व्यक्तींची मते काय होती.मोहोंनजारो आणि या संस्कृतीचे अवशेष सापडलेल्या अन्य ठिकाणी आतपर्यतच्या उत्खनातून काय सापडले आहे.? या संस्कृतीचे समाज जीवन, व्यापारी जीवन कसे होते? या संस्कृतीच्या धार्मिक कल्पना काय असू शकतात.?सिंधु सरस्वती संस्कृतीचा बाहेरील जगाशी कोणत्या प्रकारे आणि कोणत्या माध्यमातून संपर्क होता, ही संस्कृती कोणत्या कारणाने नष्ट झाली? या संस्कृतीचा
विकास कोणत्या कालखंडात आणि कस्या प्रकारे झाला? तीच्या लिपीच्या कितपत उलगडा झाला आहे,?उलगडा करण्यातील अडचणी आणि सुगम बाजू कोणत्या ? या सांस्कृतिक विविध बाबींचा हिंदू धर्मातील बाबींवर कोणत्या प्रकारे प्रभाव आहे.?सिंधू संस्कृतीने आपल्यासाठी कोणता वारसा ठेवला आहे याचा प्रामुख्याने समावेश करता येईल.
विकास कोणत्या कालखंडात आणि कस्या प्रकारे झाला? तीच्या लिपीच्या कितपत उलगडा झाला आहे,?उलगडा करण्यातील अडचणी आणि सुगम बाजू कोणत्या ? या सांस्कृतिक विविध बाबींचा हिंदू धर्मातील बाबींवर कोणत्या प्रकारे प्रभाव आहे.?सिंधू संस्कृतीने आपल्यासाठी कोणता वारसा ठेवला आहे याचा प्रामुख्याने समावेश करता येईल.
मी वाचले तो मुळच्या इंग्रजी पुस्तकाचा शीतल भांगरे यांनी केलेला मराठीतील अनुवाद होता.मी मराठीत अनुवादीत झालेली काही पुस्तके वाचली आहेत,त्या अनुभवावर सांगतोय,या पुस्तकाची भाषा खुपशी बोजड, कृत्रिम वाटते. पुस्तक माहितीपुर्ण असल्याने देखील भाषा अशी असू शकते मात्र या भाषेमुळे पुस्तक वाचताना काहीसे कंटाळवाणे होते.वाचताना वाचकाला खिळवून ठेवण्यात पुस्तक काहीसे कमी पडते असे माझे निरीक्षण आहे.मात्र पुस्तकात ठिक ठिकाणी गरजेनुसार सिंधू सरस्वती संस्कृतीतील अवशेषांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.त्यामुळे विषय समजायला मदत होते.अन्य अनुवादीत पुस्तकांप्रमाणे अनुवादकाचे मनोगत ही गोष्ट या पुस्तकात आढळत नाही. पुस्तकाच्या सुरवातील देण्यात आलेल्या कालानुक्रमामुळे सिंधू सरस्वती संस्कृतीचा विकास कधी झाला ,तिचा शोध कधी लागला ,या दरम्यान त्या प्रदेशात मोठ्या कोणत्या घटना घडल्या हे समजते.
सिंधू सरस्वती संस्कृतीमध्ये सांडपाण्याची भुमिगत व्यवस्था उत्तम होती, तसेच मोठे रुंद रस्ते असल्याचे पुरावे सापडले आहेत.दुर्देवाने आज याच प्रदेशात मोडणाऱ्या आपल्या भारतात याची उणीव आहे.या उणीवांवर मात करायची आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्यावरुन जाहिरपणे सांगावे लागल्याचे आपणास आठवत असेलचं, जे आपणासाठी भुषणावह नाहीये.तरी हा कलंक दुर होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नामध्ये आपल्याला या प्राचीन वारस्याची मोठी मदत होवू शकते मात्र त्यासाठी आपल्याला त्याची माहिती असणे आवश्यक आहे.आणि त्यासाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.



टिप्पण्या