निखळ आनंद देणारे पुस्तक,' माझा बायकोचा नवरा'
विनोदाचे मानवी जिवनातील स्थान अत्यंत महत्तवाचे आहे. जिवंतपणी जाळते,तीला चिंता म्हणतात. मनुष्याने चिंतेपासून दुर राहण्यासाठी आनंदी राहिले पाहिजे.संकटे येतात आणि जातात.मानवाने आनंदी राहिले तर या संकाटाचा तो सहजतेने तोंड देवू शकतो. या प्रकराची विधाने आपण अनेकदा वाचतो ,ऐकतो. आनंदी राहण्यासाठी अनेक उपाय योजता येतात.त्यात अनेक व्यक्तींकडून वापरण्यात आलेला उपाय म्हणजे, विनोदी साहित्य वाचणे.आपल्या मराठीला मोठ्या प्रमाणात विनोदी साहित्याचा वारसा आहे.पु.ल.देशपांडे, व.पु.काळे,
चि.वि.जोशी अस्या अनेक लेखकांनी विनोदाला एका उत्तम उंचीवर नेवुन ठेवला आहे.याच परंपरेतील एक पुस्तक म्हणजे नाशिकचे ज्येष्ठ साहित्यीक नरेश महाजन सरांनी लिहलेले आणि शद्बमल्हार प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तक माझा बायकोचा नवरा'हे पुस्तक. मी नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय 'सार्वजनिक वाचनालय नाशिक' अर्थात सावानाच्या मदतीने नुकतेच वाचले.
160 पानी या पुस्तकात 13 विनोदी कथा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.विनोद म्हटला की टिव्हीवरील कार्यक्रमांमुळे सध्याचा काळात आपल्यासमोर सहजतेने येणारे चित्र अर्थात भाषेची पातळी घसरणे, पुरषांनी महिला वर्गाचे कपडे घालणे याचा लवलेषशी या कथांमध्ये आढळत नाही.तर असे न करताही सहजतेने रोजच्या आयुष्यात घडणारे प्रसंगही कोणत्या सहजतेने विनोद निर्मितीचा दृष्टीने खुलवता येतात,याचे दर्शन आपणाला नरेश
महाजन सरांच्या या कथांमधून होते.
महाजन सरांच्या या कथांमधून होते.
सध्या नाशिक परीसरात अनेकदा घडणाऱ्या वन्यप्राण्याचा मानवी वस्तीतील प्रवेशावर पहिली कथा आधारीत आहे.यामुळे घडणाऱ्या गमती जमंती,आणि मानवी स्वाभाव हे कथेचे बीज आहे.त्यानंतरच्या कथांचा विचार करता, दहावी परिक्षेचे पर्यवेक्षण, आदेश बांडेकर यांच्या होम मिनीस्टर या कार्यक्रमात प्रवेश मिळण्यासाठी महिलांची झुंबड, मृत पत्नीचे भुत दिसणे, कथा, लेखकाच्या एका छोट्यासा गावातील मुलाखत,तंटामुक्ती अभियानात यश मिळावे या प्रयत्नात गावकरीच कसा अडथळा होतात, राजकीय पक्षांच्या साठेमारीत एक व्यक्ती कोणत्या पद्धतीने स्वत:चा फायदा करुन घेते,एका प्रसिद्ध व्यक्तीची हत्या कोणी केली,याचा पोलीसी तपास आदी अनेक प्रसंगावर आधारीत कथा या कथासंग्रहात आहे.ज्या वाचकाला पुस्तक वाचताना खिळवून ठेवतात.
पुस्तकातील प्रत्येक कथेतील प्रसंग लेखक नरेश महाजन सरांनी मोठ्या सहजतेने कथेत गुंफले आहेत.ज्यामुळे कथा मोठ्या प्रमाणात वाचणीयझाल्या आहेत..कोणतीही कथा वाचताना कंटाळवणी होत,कथा अर्ध्यावर सोडून पुढची कथा वाचण्याची इच्छाच होत नाही.
पुस्तक वाचल्यावर कोणत्याही व्यक्तीचा तणाव सहजतेने पळून जाईल,यात शंका नसावी, तणावरहित आयुष्य जगल्यास आपले आयुष्य वाढते.तर मग जास्त वर्ष जगण्यासाठी वाचणार ना हे पुस्तक!


टिप्पण्या