महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ...
महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ... हे शीर्षक वाचून तुम्ही काहीसे दुखावले गेले असण्याची दाट शक्यता आहे तरी लेखाच्या सुरुवातीलाच त्याबाबद्दल तुमची माफी मागून सांगतो,तुम्ही काहीही म्हणा ही आजची वस्तुस्थिती आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एस एस सी च्या मराठी भाषा विषयाने यावर जवळपास शिक्का मोर्तब केले आहे. तुम्ही म्हणाल मराठी विषयात ९४००० विद्यार्थी नापास होणे आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझणे चा अर्था अर्थी काही संबंध आहे का ? उगीच वडाची साला पिंपळाला जोडून रडायला का सुरुवात करायची ?
त्यातही दुर्दैव म्हणजे सध्या मुलाना शिकताना ताण येऊ नये यासठी कृती पुस्तिका भरण्यात येते. तसेच तोंडी परीक्षा देखील असते तोंडी परीक्षा जरी बाहेरचा शिक्षक घेत असला तरी तू माझ्या विद्यार्थ्यांना खूप मार्क दे मी तुझ्यया विद्यार्थ्यंना खूप मार्क देतो असं व्यवहार असल्याने तोंडी परीक्षेतच मुले पास होऊन गेलेली असतात .कृती पुस्तिका म्हणजे फक्त गाळलेल्या जागा भरणे असते अस्या स्थितीत जर राज्य भाषेत राज्य बोर्डाचा
परीक्षेत एकूण परीक्षेला बसलेल्या मुलांपैकी ८ टक्के नापास होत असतील ती भाषा अवघड स्थितीतून जात आहे हेच सिद्ध होतेयकविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्वातंत्र्य देवतेची विनवणी या कवितेत सांगितल्याप्रमाणे भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे हे बघितल्यास हे वाक्य पण महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ... असे देखील म्हणू शकतो आणि दुःख तेच आहे



टिप्पण्या